बहुतांश लहान मुलांना मोबाईल बघत बसण्याची सवय असते. काही अपवाद सोडले तर घरोघरीच्या आईबाबांची हीच तक्रार आहे की आमचे मूल खूप जास्त मोबाईल पाहाते. वाढत्या वयात मुलांच्या हातात माेबाईल दिल्याचे कित्येक दुष्परिणाम आता आपण अनुभवत आहोत. अगदी एक ते दिड वर्षांच्या मुलांनाही तुम्ही खूप मोबाईल दाखवत असाल तर त्याचा परिणाम त्याच्या आकलन शक्तीवर, बोलण्याच्या क्षमतेवर होत आहे. हे सगळं टाळायचं असेल तर सगळ्यात आधी मुलांचं मोबाईल पाहाणं कमी करायला हवं (how to keep kids away from mobile?). त्यासाठी नेमकं काय करता येऊ शकतं ते पाहूया..(tips to reduce mobile addiction in kids)
मुलांची मोबाईल पाहण्याची सवय कशी कमी करावी?
मुलांची मोबाईल पाहण्याची सवय कमी करायची असेल तर पालक म्हणून तुम्हालाही थोडा संयम ठेवावा लागेल. कारण अगदी कालपर्यंत ४- ५ तास मोबाईल बघत बसण्याची सवय असणारं मुल आज एकदम एका तासावरच येईल असं नाही. हे प्रमाण हळूहळू कमी करावं लागेल.
आता मोबाईल पाहाणं बंद म्हणून एकदम मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊ नका. कारण तुम्ही जेवढा जोरात फोन त्याच्याकडून ओढून घ्याल तेवढ्याच ताकदीने मुलं हट्ट करतात. त्यामुळे त्याच्यासमोर असं काही वेगळं आकर्षण निर्माण करा की मुलं आपोआपच मोबाईल सोडून दुसरीकडे जातील.
मोबाईलची सवय कमी करायची असेल तर पालकांना मुलांसाठी थोडा वेळ काढणं खूप गरजेचं आहे. मुलांशी गप्पा मारा. त्यांना एखादी रंजक गोष्ट सांगा किंवा त्यांच्या आवडीच्या विषयांची आणखी माहिती त्यांना द्या. त्यांना तुमच्यासोबत मदतीला घ्या. काही मुलांना स्वयंपाकात लुडबूड करायला आवडतं.
गणपती विसर्जनाच्या नैवेद्यात शेवयाच्या खिरीचा मोठा मान! बघा खास रेसिपी- खीर होईल स्वादिष्ट
पण पसारा होतो म्हणून पालक नाही म्हणतात. मुलांची लूडबूड काही दिवस सहन करा. त्यांना गार्डनिंग करायला शिकवा, बागेत घेऊन जा किंवा मैदानावर जाऊन किंवा अंगणात जाऊन तुम्ही त्यांच्याशी एखादा मैदानी खेळ खेळा. मुलांच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवा, त्यांना एकत्रितपणे मोबाईलशिवाय धमाल कशी करायची असते ते सांगा.. असे काही वेगवेगळे प्रयोग काही दिवस नेमाने करून पाहा. हळूहळू त्यांचं मोबाईल पाहणं नक्कीच बरंच कमी होईल.