हल्ली काही मोजके अपवाद सोडले तर बऱ्याच लहान मुलांच्या बाबतीत असं दिसून येतं की त्यांना एकाजागी बसून व्यवस्थित जेवण करण्याची अजिबातच सवय नसते. आवडीचे पदार्थ दिसले तरच ते पोटभर जेवतात नाहीतर मग सरळ भूक नाही म्हणून मोकळे होतात. काही मुलं तर शाळेतला डबाही तसाच वापस आणतात. असं जर मुलांनी नेहमीच केलं तर त्यांना पुरेसं पोषण मिळत नाही. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतो आणि मग ते अशक्त दिसतात (3 tips for developing proper eating habits in children). म्हणूनच मुलांना कमी वयातच खाण्यापिण्याची योग्य शिस्त लावणं खूप गरजेचं आहे. ती कशी लावावी याविषयी या काही खास टिप्स.(how to improve eating habits in kids?)
मुलांना व्यवस्थित जेवण करण्याची सवय कशी लावावी?
१. भूक लागल्याशिवाय देऊ नका
काही पालक असे असतात जे मुलांना घडाळ्याच्या वेळा पाहून खायला देतात. यामध्ये मुलांना भूक लागली आहे की नाही हा विषय नसतो. असं फक्त वेळ झाली म्हणून खायला देणं टाळा.
४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग नेहमीच बहरलेली राहतील..
५ ते ६ वर्षांनंतर मुलांनी स्वत:हून भूक लागली म्हणून खायला मागितलंच पाहिजे. त्यांनी मागितल्यावर खायला द्या. यामुळे त्यांना खरंच भूक लागलेली असेल आणि मग भूकेच्या नादात आवडत्या पदार्थांचाच हट्ट करणं ते हळूहळू सोडून देतील.
२. मुलांना पर्याय देऊ नका
मुलांनी अमूक एक पदार्थ नको असं म्हटलं की काही पालक स्वत:हून त्यांना इतर पदार्थांचा पर्याय देतात. 'अमूक' नको, मग 'तमूक' देऊ का? असं विचारतात. मुलांना असे पर्याय देणं टाळा.
बोअरवेलच्या पाण्यामुळे बादल्यांवर पांढरे डाग पडले? २ सोपे उपाय- ५ मिनिटांत बादली चकाचक
आज सगळ्यांसाठी हेच जेवण केलेलं आहे आणि तुलाही तेच खावं लागेल. तुला जे आवडतं ते आपण उद्या करूया असं त्यांना स्पष्टपणे सांगा. सुरुवातीला त्रास देतील, रडतील. पण हळूहळू त्यांनाही सवय होईल.
३. प्रत्येक पदार्थाचे महत्त्व समजावून सांगा
आपल्या पानात वाढलेले पदार्थ आपण का खायला हवे, आपण ते पदार्थ खाल्ल्याने आपल्या तब्येतीला कसा फायदा होऊ शकतो आणि नाही खाल्ले तर आपल्याला कसे त्रास होऊ शकतात,
गॅस शेगडीची फ्लेम पिवळट, लाल दिसणं तब्येतीसाठी घातक! 'या' आजारांचा धोका, बघा उपाय
हे मुलांना समजावून सांगा. आसपासची काही उदाहरणं द्या. यामुळे त्यांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचं महत्त्व कळेल आणि हळूहळू ते खाण्याची त्यांना सवय होईल.