सध्याच्या स्पर्धा युगात आपल्या मुलांनी कायम पुढे असायला हवं असं प्रत्येक पालकांना वाटतं. पण पालकांना कायम सतावणारी चिंता एकच असते की, मुलं एकाग्रतेने अभ्यास करतात परंतु, लगेच विसरतात.(child brain development) मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पालक मुलांच्या आहारापासून इतर सर्व गोष्टींची काळजी घेतात.(how to increase child focus) मोबाइल, टीव्ही आणि गेम सारख्या विविध गोष्टींमुळे मुलांच्या अभ्यासासह इतर गोष्टींवर परिणाम होतो. यामुळे नवीन कोणतीही गोष्ट शिकताना त्यांच्या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होताना पाहायला मिळतो.(tips to make kids smart) पण काही सोप्या सवयी मुलांना लावल्याने वाचलेलं त्यांच्या लक्षात राहिल आणि मुलं अभ्यासात अधिक हुशार होतील. (child intelligence improvement)
मुलांच्या सुरुवातीचा काळ हा मेंदूचा विकास वेगाने करतो. या काळात त्यांना चांगल्या प्रकारे मानसिक आणि शारीरिक क्रियाकलाप प्रदान केल्याने त्यांची स्मरणशक्ती वाढू शकते.(brain boosting food for kids) संशोधनात असं आढळून आलं की , कोडी सोडवणे, समस्या सोडवणे किंवा खेळल्यामुळे मुलांच्या कार्यरत स्मृती सुधारते.
मुलांचं मोबाइलचं व्यसन सोडवणाऱ्या ७ गोष्टी; मुलं मोबाइल हातातून खालीच ठेवत नसतील तर काय कराल?
1. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी त्यांनी चांगली आणि पुरेशा प्रमाणात झोप घ्यायला हवी. यामुळे नवीन शिकलेली माहिती टिकवून ठेवण्यास मदत होते. मेंदूच्या विकासासाठी पालकांनी मुलांच्या आहारात पोषणतत्वाचा समावेश करावा. ओमेगा- ३ फॅटी अॅसिडने समृद्ध असणारे पदार्थ त्यांना खाऊ घालावे. ताण आणि चिंता स्मरणशक्ती कमकुवत करतात. मुलांसाठी ध्यान आणि विश्रांती आवश्यक आहे.
2. पालकांनी मुलांसोबत जिगसॉ पझल्स, मेमरी कार्ड गेम्स, बुद्धिबळ सारखे खेळ खेळायला हवे. यामुळे त्याच्या मेंदू तीक्ष्ण होतो. हे गेम त्यांची दृश्य आणि श्रवण स्मरणशक्ती सुधारतात. शब्दांचे खेळ किंवा शब्दकोडे त्यांची स्मरणशक्ती मजबूत करतात.
3. खेळ आणि व्यायामामुळे मेंदूचे रक्ताभिसरण चांगले होते. नियमित व्यायाम केल्यामुळे मेंदूतील हिप्पोकॅम्पस मजबूत होतो. फुटबॉल आणि बास्केटबॉलसारखे खेळ मुलांना विचार करण्यास भाग पाडतात. नृत्य आणि मार्शल आर्ट्समधील गोष्टींमुळे स्मरणशक्ती सुधारते.
4. मुलांना योग किंवा ध्यान करायला बसावा. ज्यामुळे त्यांची एकाग्रता वाढेल.सर्वांगासन मेंदूमधील रक्ताभिसरण वाढवते. पद्मासन मज्जासंस्था शांत करते. भुजंगासन आणि पश्चिमोत्तानासन स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.