Join us

काही केल्या मुलं सकाळी अंथरुणातून लवकर उठत नाहीत? ? ५ टिप्स- मुलं उठून शाळेसाठी होतील रेडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2025 14:17 IST

How to Help Kids Who Struggle to Wake Up For School : How To Get Your Kids To School In The Morning Without Yelling : 5 ways to make school morning routines easier : 5 Ways to Wake Your Kids Up for School : सकाळी मुलांना शाळेसाठी उठवणे म्हणजे महाकठीण काम, फॉलो करा 'या' ५ टिप्स...

मुलांना सकाळी शाळेत जाण्यासाठी उठवणे म्हणजे पालकांसाठी एक मोठा टास्कच असतो. मुलांची शाळा सकाळच्या वेळी असली तर पालकांची तारांबळच उडते. काही केल्या मुलं सकाळी (How to Help Kids Who Struggle to Wake Up For School) पटकन अंथरुणातून उठायलाच मागत नाहीत. अशावेळी मुलांना उठवणे म्हणजे महाकठीण काम असते. सकाळच्या वेळी मुलांना झोपेतून असे उठवणे (5 Ways to Wake Your Kids Up for School) काहीवेळा पालकांना फारच जड जाते. अशावेळी उठायचे नाही म्हणून मुलं देखील हट्ट करतात. काहीवेळा तर मुलं अंथरुणातून उठायचे नाही किंवा शाळेत जायचे नाही म्हणून काही ना काही बहाणे करतात(How To Get Your Kids To School In The Morning Without Yelling).

मुलांना शाळेसाठी सकाळी उठवणे, त्यांची आंघोळ मग शाळेची तयारी यात फार वेळ जातो. त्यातही मुलांनी जर उठायला फार वेळ लावला तर मग पुढे सगळ्याच कामांना उशीर होतो. याचबरोबर, मुलांनी जर सकाळी उठायला उशीर केला तर त्यांना शाळेत जायला देखील उशीर होतो. अशावेळी मुलांचा हट्ट, रडारड सुरु होते, यामुळे मुलांना सकाळी झोपेतून उठवून शाळेसाठी तयार करणे म्हणजे पालकांच्या नाकीनऊ येतात. अशावेळी मुलांना सकाळी झोपेतून उठवण्यासाठी पालकांनी काही सोप्या ट्रिक्स (5 Ways to Wake Your Kids Up for School) फॉलो केल्या तर हे कठीण काम अगदी सोपे होऊ शकते. firsttimemom.official या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मुलांना सकाळी अंथरुणातून उठवण्यासाठी कोणत्या ५ टिप्स फॉलो कराव्यात याबद्दल अधिक माहिती दिली आहे.  मुलांना सकाळी न रडवता अंथरुणातून उठवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात ते पाहूयात.    

मुलांना सकाळी झोपेतून लवकर उठवण्यासाठी ५ टिप्स... 

१. मुलांना रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवसाचा मेन्यू सांगा :- तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही मुलांना रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवसाच्या ब्रेकफास्ट आणि दुपारच्या जेवणाचा मेन्यू आधीच सांगितला तर मुलं दुसऱ्या दिवशी अंथरुणातून लवकर उठून बसतील. खरंतर, मुलांना त्यांचा सकाळच्या ब्रेकफास्ट आणि दुपारच्या जेवणाचा मेन्यू जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. अशावेळी जर तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ उद्या टिफिनमध्ये देणार असल्याचे अगोदर सांगितले तर ते लवकर शाळेसाठी तयार होतात. 

२. झोपेचे एक निश्चित टाईमटेबल ठेवा :- मुलांच्या रात्रीच्या वेळच्या झोपेचे एक निश्चित टाईमटेबल ठेवा. रात्रीच्या झोपेची एक वेळ ठरवा आणि मुलं त्या वेळेत झोपतील याची पालकांनी खबरदारी घ्यावी. जर तुम्हाला तुमच्या मुलाने कोणताही हट्ट किंवा रडारड, किरकिर न करता सकाळी अंथरुणातून उठावे असे वाटत असेल तर त्याच्या झोपेचे एक फिक्स रुटीन ठरवा. असे केल्याने मुलांना पुरेशी आणि चांगली झोप मिळते. योग्य प्रमाणात पुरेशी झोप झाल्याने मूल सकाळी फ्रेश होऊन उठतात. 

टेबलफॅनची जाळी न काढता- हातही न लावता ५ मिनिटांत 'असा' करा स्वच्छ, फॅन दिसेल नव्यासारखा...

३. पालकांनी एक तास आधी उठा :- आपले मुलं उठण्याच्या किमान एक तासभर आधी पालकांनी उठले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलं उठण्याच्या एक तास आधी उठले पाहिजे. मुलं उठण्यापूर्वी जेवणाचा डबा, दूध, नाश्ता आणि ड्रेस, किंवा इतर शाळेची तयारी आधीच करून ठेवा. जेणेकरून जेव्हा मूल उठेल, तेव्हा तुम्ही त्याच्या जवळ उपस्थित असाल. असे केल्याने सकाळचा ताण बराच कमी होईल.

चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...

४. १५ मिनिटे अगोदर मुलांना जागे करण्यास सुरुवात करा :- प्रत्येक मुलाचा सकाळी उठण्याचा दिनक्रम वेगळा असतो. काही मुले एकदा उठवल्यावर लगेच उठतात किंवा हाक मारल्यावर लगेच उठतात. तर काही मुलं अंथरुणातून उठण्यास बराच वेळ लावतात. जर तुम्हाला माहित असेल की तुमच्या मुलाला उठण्यास वेळ लागतो तर तुम्ही त्याला १५ मिनिटे आधी उठवायला सुरुवात केली पाहिजे. यामुळे तो वेळेवर उठेल आणि उशीर होणार नाही. 

साडी नेसायची झंझटच विसरा, ना पिनअपची गरज ना मॅचिंग परकरचं टेंन्शन, व्हा २ मिनिटांत तयार...

५. गरजेच्या वस्तू हाताला लागतील अशाच ठेवा :- मुलांना सकाळी शाळेत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवा. अशा परिस्थितीत मुलाला तयार करण्याची वेळ आली की सर्व गोष्टी एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होतात. वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेण्याची गरज भासत नाही, परिणामी, वस्तू शोधण्यात जास्त वेळ जात नाही आणि पटकन तयारी होते.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं