बारावी- दहावीच्या मुलांचा परीक्षा सुरु झाल्या आहेत. परीक्षेचे नाव काढले की आजही अनेकांच्या पोटात गोळा येतो. पण आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.(exam stress in children) पहिला नंबर आलाच पाहिजे, शेजाऱ्याच्या मुलाला बघ किती गुण मिळाले, तुला अमूकमध्येच करिअर करायचे आहे. अशा अपेक्षांच्या ओझ्याखाली मुले दबली जातात. वर्षभर अभ्यास करूनही ऐन परीक्षेच्या वेळी मुलांची घाबरगुंडी उडते, हात-पाय थरथरतात आणि काही मुलांना तर रडू येते.(exam stress in children) ही फक्त भीती नसते तर ती त्यांच्या खांद्यावरील पालकांच्या प्रेशरची प्रतिक्रिया असते. मुलांना जेव्हा अभ्यासापेक्षा निकालाची भीती वाटू लागते, तेव्हा मुलांची मानसिक स्थिती खालवते. (parenting tips for exams)पालक म्हणून आपली जबाबदारी फक्त फी भरणे किंवा क्लास लावणं इथंपर्यंतच मर्यादित नाही. परीक्षेच्या तणावपूर्ण काळात मुलांचे मानसिक आरोग्य जपणं ही गरज आहे. मुलांचे पेपर सोपे जावेत आणि त्यांनी या परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे, यासाठी पालकांनी ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात.
आयब्रोजचे केस विरळ झाले-भुवयांना ना आकारउकार? 'हे' नॅचरल जेल लावा-भुवया होतील दाट सुंदर
1. अनेक पालक मुलांशी कायम मार्क्सबद्दल बोलत असतात. यामुळे मुलांच्या मनात कायम भीती निर्माण होते. कमी गुण मिळाले तर आई-बाबा रागवतील, मारतील. पण पालकांनी मुलांना अशावेळी कायम प्रोत्साहन करायला हवे. निकाल काहीही लागू देत, तू तुझे प्रयत्न करत राहा. पालकांचे प्रोत्साहन मिळाले की मुलांचे अर्धे टेन्शन कमी होते.
2. मुलांच्या अभ्यासाच्या वेळी घरातील वातावरण हलके-फुलके ठेवा. सतत अभ्यासाला बस, टीव्ही बंद कर. असा तगादा मुलांच्या मागे पालकांनी लावू नये. परीक्षेच्या काळात पालकांनी घरात शांतता ठेवायला हवी. मुलांना अभ्यासात मदत करा, त्यांना काही अडले तर समजावून सांगा.
3. त्यांचा मुलगा किती हुशार आहे. पहिला नंबर आला तर हवं ते देईन. अशी वाक्य मुलांना बोलू नका. या वाक्यांमुळे मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो. प्रत्येक मुलांची आकलनशक्ती आणि आवड वेगळी असते. दुसऱ्यांशी मुलांची तुलना केल्याने त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड तयार होतो. मुले याच गोष्टींचा सतत विचार करतात ज्यामुळे परीक्षेच्या दरम्यान त्यांना विसरायला होते.
4. अभ्यासाच्या नादात मुलं अनेकदा जेवण आणि पुरेशी झोप घेणं टाळतात. रिकाम्या पोटी किंवा अपुऱ्या झोपेमुळे मेंदू थकतो. ज्यामुळे चिडचिड वाढते. पालकांनी मुलांच्या आहारात हलका आणि पौष्टिक आहार ठेवावा. किमान ७ ते ८ तासांची झोप मिळेल याची काळजी घ्या. ज्यामुळे परीक्षेच्या वेळी त्यांनी फ्रेश वाटेल.
5. परीक्षा केंद्रावर जाताना मुलांना नीट लिही, चुका करु नकोस अशा सूचना देऊ नका. तू खूप छान अभ्यास केला आहे. पेपर छान जाईल असे सकारात्मक वाक्य मुलांच्या मनावर रुजवा. पालकांचा आत्मविश्वास आणि त्यांनी सांगितलेले शब्द मुलांचा आत्मविश्वास वाढवतात आणि भीतीवर त्यांना मात करता येते.
Web Summary : Exams cause stress for children due to pressure. Parents should encourage effort over marks, maintain a relaxed home environment, avoid comparisons, ensure proper rest and nutrition, and offer positive reinforcement to boost confidence.
Web Summary : परीक्षाएँ दबाव के कारण बच्चों में तनाव पैदा करती हैं। माता-पिता को अंकों से अधिक प्रयास को प्रोत्साहित करना चाहिए, घर का शांत वातावरण बनाए रखना चाहिए, तुलना से बचना चाहिए, उचित आराम और पोषण सुनिश्चित करना चाहिए, और आत्मविश्वास बढ़ाने के लिए सकारात्मक प्रोत्साहन देना चाहिए।