Join us

मुलं आईबाबांशी खोटं का बोलतात, गोष्टी का लपवतात? ५ गोष्टी करा, मुलांचं वागणं काही दिवसात बदलेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2025 15:17 IST

How To Handle Lying In Children : reasons why children lie, how to teach truthfulness : खोटं बोलण्याची वाईट सवय मुलांना लागली, वेळीच द्या लक्ष 'या' ५ गोष्टी करताच सुटेल ही सवय...

बरेचदा पालकांना जाणवतं की, आपलं मुलं खोटं बोलत आहे तसेच आपल्यापासून अगदी काही गोष्टी लपवत आहे.'माझी चूक नाहीये', 'मी नाही केलं' किंवा 'मला माहीत नाही' अशी वाक्ये बरेचदा लहान मुलांच्या तोंडू ऐकणे हे जवळजवळ प्रत्येक पालकांसाठी एक चिंतेचा विषय असतो. मुलं खोटं का बोलतात? ती घाबरून बोलतात, शिक्षा टाळण्यासाठी बोलतात, की आपले लक्ष वेधून घेण्यासाठी? यामागे कोणतंही कारण असलं तरी, खोटं (reasons why children lie, how to teach truthfulness) बोलण्याच्या सवयीला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे. ही वाईट सवय मुलांना लागल्यास, मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो(How To Handle Lying In Children).

मुलांची सतत खोटं बोलण्याची ही वाईट सवय, फक्त रागवून किंवा शिक्षा देऊन सहसा सुटत नाही. खोटं बोलणं थांबवण्यासाठी पालकांना मुलांसोबत सहानुभूतीपूर्वक वागावे लागते आणि त्यांच्यात सत्य बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. पालकांनी नेमकं काय करावं, घरात कसं वातावरण ठेवावं, ज्यामुळे मुलं त्यांच्यावर विश्वास ठेवून खुल्या मनाने सत्य बोलू शकतील? बाल मानसशास्त्रज्ञांनी सुचवलेल्या काही खास टिप्स पाहणार आहोत, ज्या पालकांना या नाजूक समस्येवर मात करण्यासाठी नक्कीच मदत करतील. 

मुलं जर वारंवार खोटं बोलतं असतील तर काय करावे? 

१. रागवण्याऐवजी आधी समजावून सांगा :- जेव्हा आपले मूल खोट बोलेल, तेव्हा सर्वातआधी रागावू नका. मुलांना समजावून सांगा की, सत्य बोलल्याने लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि खोटे बोलल्याने मात्र अडचणी वाढतात.

२. स्वतःचे उदाहरण द्या :- मुलं बहुतेकवेळा सर्वात जास्त गोष्टी आई-वडिलांनाच बघून शिकतात. जर तुम्ही स्वतः आपली चूक मान्य करून सत्य बोलत असाल, तर मूल देखील सत्य बोलू लागेल. मुलांना छोटी-छोटी उदाहरणे द्या, जसे की, “मी खरे बोलतो आणि सर्व काही ठीक झाले.” यामुळे मुलांना अनुभव येईल की, सत्य बोलणे हेच योग्य आहे.

मुलांना न मारता - ओरडता लागेल अभ्यासाची गोडी! ५ टिप्स - मुलं स्वतःहून अभ्यास करतील भराभर...  

३. खोटं बोलण्याचे नुकसान सांगा :- मुलांना सांगा की खोटे बोलल्याने काय-काय वाईट होऊ शकते. उदाहरणार्थ, जर मुलांनी एखादी वस्तू तोडली आणि खोटे बोलला, तर त्याला सांगा की, यामुळे लोकांचा तुझ्यावरील विश्वास तुटू शकतो आणि अडचण वाढू शकते. यामुळे मुलाला समजेल की खरे  बोलणे हेच उत्तम आहे.

४. खरं बोलल्यास कौतुक करा :- जेव्हा मूल खरं बोलेल, तेव्हा त्याचे कौतुक करा. तुम्ही असे म्हणू शकता, “तू खरं बोललास/बोललीस, खूप छान केलेस!” यामुळे मूल आनंदी होईल आणि भविष्यातही खरं बोलण्यास प्राधान्य देईल.

५. संवाद मोकळेपणाने होईल असे वातावरण ठेवा :- मुलांना असा विश्वास पटवून द्या की, ते तुमच्याशी कोणतीही गोष्ट न घाबरता अगदी बिनधास्तपणे बोलू शकतात. जेव्हा मुलाला हे माहीत असते की, तुम्ही राग किंवा चिडचिड न करता त्यांचे बोलणे व्यवस्थित शांतपणे ऐकून घेतात, तेव्हा ते खोटे बोलणार नाही. दररोज थोडा वेळ मुलांसोबत घालवा, त्याचे दिवसभरातील अनुभव ऐका आणि त्याला प्रश्न विचारा.

मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही ठेवू नयेत ६ गोष्टी! अभ्यासातून लक्ष होईल विचलित - मुलं अभ्यासाचा करतील कंटाळा... 

मुलांना खरे बोलण्याची सवय लावणे का आहे महत्वाचे ? 

मुलांना खरे बोलण्याची सवय लावणं हे केवळ नैतिकता शिकवण्यासाठीच नाही, तर मुलाला मानसिकरित्या मजबूत बनवण्यासाठी देखील आवश्यक आहे. जेव्हा मुलाला माहीत असतं की, तुम्ही त्याची प्रत्येक गोष्ट समजून घेता आणि योग्य दिशा दाखवता, तेव्हा ते मूल जास्त आत्मविश्वासी आणि जबाबदार बनते. नेहमी खरे बोलण्याची सवय लावल्याने मूल फक्त प्रामाणिकच बनत नाही, तर ते आपले निर्णय घेण्यामध्ये देखील मजबूत आणि आत्मविश्वासी बनते.

English
हिंदी सारांश
Web Title : Why kids lie to parents & hide things: 5 solutions.

Web Summary : Children lie due to fear or attention-seeking. To foster honesty, parents should explain the value of truth, set examples, discuss consequences of lying, praise truthfulness, and create open communication.
टॅग्स :पालकत्वलहान मुलं