Join us

हायपरअ‍ॅक्टिव्ह मूलं सांभाळताना पालकांची होते दमछाक ? ५ टिप्स - तज्ज्ञ देतात मोलाचा सल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2025 17:10 IST

Parenting How To Handle Hyperactive Children 5 Important Tips For Parents Stop Doing These Things : How to deal with a hyperactive child at home : 5 tips for managing ADHD in children : 5 Tips to Smartly Handle Hyperactive Kids : हायपरअ‍ॅक्टिव्ह मूलं सांभाळणे म्हणजे पालकांना नकोसे वाटते, यासाठी तज्ज्ञ देतात काही खास टिप्स..

प्रत्येक पालकांना आपलं मुलं हसतं - खेळतं आणि अ‍ॅक्टिव्ह असावं असच नेहमी वाटतं. यासाठी अनेक पालक प्रयत्नशील देखील असतात. परंतु आजकाल (5 Tips to Smartly Handle Hyperactive Kids) आपल्यापैकी बरेच पालक मूलं हायपरअ‍ॅक्टिव्ह असल्याने त्यांना सांभाळता - सांभाळता मेटाकुटीला येतात. मूलं हायपरअ‍ॅक्टिव्ह असणं हे चांगलं वाटत असलं तरी अशा मुलांना सांभाळणं (5 tips for managing ADHD in children) आई - वडिलांना दिवसेंदिवस कठीण होत जातं. काहीवेळा मुलांचं हायपरअ‍ॅक्टिव्ह (How to deal with a hyperactive child at home) असणं पालकांना अतिशय आवडतं, पण काहीवेळा अशी हायपरअ‍ॅक्टिव्ह मुलं पालकांच जगणं मुश्किल करतात. या एका कारणामुळे अशा हायपरअ‍ॅक्टिव्ह मुलांना पालक म्हणून सांभाळणं मुळीच सोपं नसतं(Parenting How To Handle Hyperactive Children 5 Important Tips For Parents Stop Doing These Things).

पालक म्हणून अशा हायपरअ‍ॅक्टिव्ह मुलांना सांभाळताना, त्यांना कंट्रोल करण्यासाठी पालकांना काहीवेळा ओरडावे लागते तर जोर - जबरदस्ती देखील करावी लागते. हायपरअ‍ॅक्टिव्ह मुलांकडे पालकांना विशेष लक्ष द्यावे लागते. हायपरअ‍ॅक्टिव्ह मुलांना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना वारंवार ओरडणे, मारणे अशा पालकांच्या कृतीमुळे मुलं सुधारतं नाही, उलट अधिकाधिक बिघडत जातात. यासाठीच, हायपरअ‍ॅक्टिव्ह मुलांना पालक म्हणून कसे सांभाळावे, त्यांना कसे समजवावे? त्यांना नियंत्रणात कसे ठेवावे याविषयी काही खास टीप तज्ज्ञांकडून समजून घेऊयात. 

मूलं हायपरअ‍ॅक्टिव्ह असणे म्हणजे नेमकं काय ? 

जेव्हा एखादे मूलं खूप धावते, एका जागी सेकंदभरही बसत नाही, वारंवार गोष्टींना स्पर्श करते, शांत राहत नाही आणि सतत काहीतरी हातात करायला हवं असत किंवा सतत काही ना काही करण्यात व्यस्त असतात, तेव्हा अशा मुलांना 'हायपरअ‍ॅक्टिव्ह' असे म्हटले जाते. या स्थितीला, ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) असे देखील म्हटले जाते. असे असले तरीही प्रत्येक चंचल मूलं हे हायपरअ‍ॅक्टिव्ह असेलच असे नाही.   

हायपरअ‍ॅक्टिव्ह मूलं सांभाळताना पालकांनी कोणत्या चुका करू नयेत ? 

१. काहीवेळा नातेवाईक आपल्या घरी येतात तेव्हा ते मुलांसाठी चिप्स, कोल्ड्रिंक्स किंवा चॉकलेट यासारखे पदार्थ आणतात. याचबरोबर, काहीवेळा पालक देखील मुलांना असे पदार्थ खायला देतात. पण हायपरअ‍ॅक्टिव्ह मुलांना चिप्स, कोल्ड्रिंक्स किंवा फास्ट फूड सारखे पदार्थ खायला देऊ नयेत. जंक फूडमध्ये असलेले जास्त साखर, मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह्ज मेंदूला खूप जास्त अ‍ॅक्टिव्ह करतात. 

फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...

२. बदलत्या काळानुसार मुलांचा स्क्रीन टाइम खूप वाढत आहे. पण हायपरअ‍ॅक्टिव्ह मुलांना मोबाईल, टीव्ही आणि व्हिडिओ गेम्ससारख्या स्क्रीनपासून दूर ठेवले पाहिजे. स्क्रीनवरील चमचमत्या लाईट्स आणि आवाज यामुळे त्यांचे मन आणि मेंदू दोन्ही शांत होऊ शकत नाही. मन आणि मेंदू सतत काम करत राहिल्याने मूलं सतत काही ना काही करण्यात गुंतलेले असते. यामुळे हायपरअ‍ॅक्टिव्ह मुलांचा स्क्रिनटाईम कमी करा किंबहुना फारशी स्क्रीन दाखवू नका.      

३. हायपरअ‍ॅक्टिव्ह मुलांसाठी एक स्पेशल डेली रुटीन असणे खूप महत्वाचे असते. खेळण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, खाण्यासाठी आणि झोपण्यासाठी दररोज एक वेळ निश्चित करा. यामुळे मुलाला शिस्त लागेल आणि त्याची ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाईल. लक्षात ठेवा, जर दिनचर्या नसेल, शिस्त नसेल तर मुलांचे वर्तन देखील नियंत्रित राहणार नाही.

४. पालकांची सर्वात मोठी चूक म्हणजे मुलांना फटकारणे. पालकांनी मुलांवर वारंवार चिडणे, त्यांना फटकारणे किंवा ओरडणे सर्वातआधी थांबवले पाहिजे. तुमचा मोठा आवाज आणि सतत टीका करण्याची सवय मुलांच्या मनामध्ये असुरक्षितता आणि बंडखोरी निर्माण करु शकते. शांत वातावरणात मुलांनाही  शांत वाटते. मुलांच्या नकारात्मक गोष्टींऐवजी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. जर मूलं काही चांगले करत असेल तर त्याची स्तुती करा.

वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असणारे डार्क सर्कल्स होतील गायब, फक्त २ स्टेप्स - स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ असरदार...

५. अनेकदा पालक मुलांना सुरक्षिततेच्या हेतूने दिवसदिवसभर घरातच बंद करून ठेवतात. आई वडील वर्किंग असल्याने मुलांसोबत खेळायला - वेळ घालवायला कुणी नसते. किंवा मुलं घरातच खेळतात, अभ्यास करतात... सगळं काही घरातच करतात. पण यामुळे मुलांचे आक्रमक वर्तन वाढते. खरंतर,  हायपरअ‍ॅक्टिव्ह मुलांमध्ये असलेल्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी शारीरिक हालचाली करणे खूप महत्त्वाचे असते. अतिक्रियाशील मुलामध्ये खूप ऊर्जा असते आणि ती घरी राहून वापरली जाऊ शकत नाही. यासाठीच, मुलांना सायकलिंग, स्विमिंग सारख्या अ‍ॅक्टिव्हीटीमध्ये गुंतवून ठेवावे. ज्या प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये जास्त प्रमाणांत ऊर्जा खर्च केली जाते अशा अ‍ॅक्टिव्हीटी मुलांना करण्यास प्रोत्साहन द्यावे.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं