आजकाल घरातील लहान मुलं अभ्यास करताना, खेळताना किंवा मोबाईल-लॅपटॉप पाहताना चुकीच्या पोश्चरमध्ये बसतात. कधी पोक काढून, कधी वाकून तर कधी अगदी वेडेवाकडे बसण्याची सवय त्यांच्या नकळतपणे अंगवळणी पडते. सुरुवातीला ही गोष्ट फारशी महत्वाची वाटली नाही तरी दीर्घकालांतराने पाठीचा कणा वाकणे, मान-खांद्यात वेदना होणे, थकवा वाढणे आणि एकूणच शरीराचा आकार व बसण्याचे पोश्चर देखील बिघडण्याची शक्यता वाढते. लहानपणी बसण्याची ही चुकीची सवय कालांतराने त्यांच्या बॉडी पोश्चरला (improve child body posture) कायमस्वरूपी बिघडवते, ज्यामुळे भविष्यात पाठदुखी, मानदुखी आणि खांद्यांचा त्रास अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. जर तुमच्या मुलाच्या बसण्याच्या स्थितीमुळे तुम्हाला चिंता वाटत असेल, तर काळजी करू नका! घरच्याघरी काही साधे आणि सोपे उपाय करून त्यांची बसण्याची स्थिती सहज सुधारू शकता. मुलांचे बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी आणि त्यांना बसण्याची योग्य सवय लावण्यासाठी (how to correct bad posture in children) कोणते सोपे घरगुती उपाय करायचे ते पाहूयात...
बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत यांच्या मते, आजकाल पालक आपल्या मुलांची बसण्याच्या स्थिती तसेच बिघडलेले बॉडी पोश्चर यांसारख्या समस्येने चिंतीत असतात. कारण, मुल लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर जास्त वेळ बसून राहतात, ऑनलाइन क्लासेस आणि जड स्कूल बॅग यामुळे त्यांच्या मणक्याला दीर्घकालीन दुखापत किंवा इजा होऊन नुकसान होऊ शकते. पण मुलांच्या बॉडी पोश्चरमध्ये सुधारणा करण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय केले जाऊ शकतात.
मुलांची बसण्याची स्थिती व बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी...
१. पाठीच्या स्नायूंना मजबूत करा :- मुलांच्या बसण्याच्या स्थितीत किंवा बॉडी पोश्चरमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वातआधी कंबर आणि पाठीच्या स्नायूंना मजबूत करणे आवश्यक आहे. यासाठी मुलांना प्लँक (Plank), ब्रिज (Bridge) आणि बर्ड - डॉग मूव्हमेंट (Bird-Dog Movement) यांसारखे सोपे एक्सरसाइज करायला लावावेत. यामुळे त्यांच्या बॉडी पोश्चरमध्ये सुधारणा होते तसेच, हे एक्सरसाइज मुलांना योग्यरित्या बसण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठी देखील मदत करतात.
मुलं सकाळी लवकर उठत नाहीत, पांघरूण सोडत नाही ? ४ गोष्टी कराच - न रडता उठतील चटकन...
२. व्यवस्थित बसण्याची योग्य सवय लावा :- मुलांच्या बॉडी पोश्चरमध्ये सुधारणा करण्यासाठी मुलांच्या बसण्याच्या सवयी आणि पद्धतीमध्ये सुधारणा करणे गरजेचे असते. मुलांचे बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी, बसताना त्यांचे पाय जमिनीवर सपाट असले पाहिजेत, पाठ सरळ, ताठ आणि पाठीला सपोर्ट असावा त्याचबरोबर स्क्रीन म्हणजेच लॅपटॉप किंवा मोबाईल पाहताना डोळ्यांच्या बरोबर सामोर समान रेषेत स्क्रीन असावी.
३. दर ३० ते ४० मिनिटांनी ब्रेक घ्यायला सांगा :- मुलांना स्क्रीनचा वापर करताना किंवा ऑनलाइन क्लासेस दरम्यान दर ३० ते ४० मिनिटांनी स्ट्रेचिंग किंवा चालण्यासारखे छोटे - छोटे एक्सरसाइज करण्यास सांगावे. याचबरोबर दर ३० ते ४० मिनिटांनी ब्रेक घ्यायला सांगावा यामुळे मुलांना रिलॅक्समेंट मिळतो.
४. मुलांना बसण्याची योग्य पद्धत शिकवा :- मुलांच्या बसण्याच्या स्थितीत किंवा बॉडी पोश्चरमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना नेहमी सरळ, ताठ किंवा पाठ न वाकवता, पोक न काढता बसायला शिकवा. या सवयी त्यांच्या डेली रुटीनयमध्ये समावेश करा. मुलांचे पोश्चर लवकर ठीक झाल्यास पाठीच्या कण्याच्या दुखापतीपासून संरक्षण होते आणि मुलांच्या किशोरावस्थेत प्रवेश करताना पाठदुखीपासून बचाव होतो.
मुलांच्या बसण्याच्या स्थितीत किंवा बॉडी पोश्चरमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वातआधी त्यांच्या स्नायूंना मजबूत करणे आवश्यक असते. यासाठी त्यांना योग्य पद्धतीने बसणे आणि उभे राहणे शिकवावे. तसेच, एक्सरसाइज, योग्य बसण्याच्या सवयी आणि स्क्रीनचा योग्य वापर याकडे पालकांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
