Lokmat Sakhi >Parenting > डॉक्टर सांगतात, परीक्षेच्या काळात मुलांना काय खायला द्यावे, काय अजिबात देऊ नये? स्ट्रेस नको तर...

डॉक्टर सांगतात, परीक्षेच्या काळात मुलांना काय खायला द्यावे, काय अजिबात देऊ नये? स्ट्रेस नको तर...

How Students Can Remain Fit & Energetic During Examinations Doctor Suggested Some Tips : Tips for Staying Healthy During Exams : How To Stay Healthy During Exams : परीक्षा जवळ आल्यावर अभ्यासाचा स्ट्रेस - टेंन्शन वाढते ? पण योग्य आहार खाऊन घ्या तब्येतीची काळजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 18:52 IST2025-02-20T18:25:05+5:302025-02-20T18:52:07+5:30

How Students Can Remain Fit & Energetic During Examinations Doctor Suggested Some Tips : Tips for Staying Healthy During Exams : How To Stay Healthy During Exams : परीक्षा जवळ आल्यावर अभ्यासाचा स्ट्रेस - टेंन्शन वाढते ? पण योग्य आहार खाऊन घ्या तब्येतीची काळजी...

How Students Can Remain Fit & Energetic During Examinations Doctor Suggested Some Tips Tips for Staying Healthy During Exams How To Stay Healthy During Exams | डॉक्टर सांगतात, परीक्षेच्या काळात मुलांना काय खायला द्यावे, काय अजिबात देऊ नये? स्ट्रेस नको तर...

डॉक्टर सांगतात, परीक्षेच्या काळात मुलांना काय खायला द्यावे, काय अजिबात देऊ नये? स्ट्रेस नको तर...

मुलांच्या परीक्षा म्हटलं की मुलांसोबतच पालकांना देखील तितकेच जास्त टेंन्शन येते. मुलांची परीक्षा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत पालक मुलांच्या प्रत्येक गोष्टीची अगदी व्यवस्थित काळजी घेतात. सध्या परीक्षांचा सिझन सुरु आहे, यातही दहावी - बारावीची परीक्षा म्हटलं की संपूर्ण घरात परीक्षेचेच वातावरण असते. परीक्षेदरम्यान मुलांच्या (How To Stay Healthy During Exams) अनेक गोष्टींची काळजी घेताना त्यांना नेमकं खायला काय द्यावं, असा प्रश्न प्रत्येक आईला पडतोच. परीक्षेचे दिवस हे आपल्या मुलांसाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असतात. या काळात ताणतणाव, चिंता आणि थकवा (Tips for Staying Healthy During Exams) जाणवणे सामान्य आहे. परंतु जर मुलांसाठी योग्य आणि संतुलित आहार असेल तर यामुळे फक्त शारीरिक ऊर्जाच मिळत नाही तर मानसिक शक्ती देखील वाढते(How Students Can Remain Fit & Energetic During Examinations Doctor Suggested Some Tips).

निरोगी आहाराने विद्यार्थ्यांमधील परीक्षेचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो. पौष्टिक अन्न विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. याउलट, अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींमुळे ताण वाढू शकतो आणि मुलांच्या अभ्यासावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यासाठीच, परीक्षेदरम्यान काय खावे आणि काय खाऊ नये तसेच संतुलित आहार विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कमी करण्यास कशी मदत करू शकतो ते पाहूयात. नवी दिल्ली येथील नुबेला सेंटर फॉर वुमेन्स हेल्थच्या संचालिका डॉक्टर गीता श्रॉफ यांनी नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीनुसार, परीक्षेदरम्यान मुलांचा आहार कसा असावा याबद्दल अधिक माहिती पाहूयात. 

१. मुलांच्या परीक्षेदरम्यान निरोगी आहार का महत्त्वाचा आहे?  

मुलांच्या परीक्षेदरम्यान योग्य आणि निरोगी आहार त्यांचे मन आणि मेंदू शांत आणि एकाग्र ठेवण्यास मदत करतो. योग्य पोषणामुळे विद्यार्थ्यांना त्यांची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते आणि त्यांना जास्त काळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते परीक्षेचं टेंशन कमी करण्याचा उपाय-५-४-३-२-१, व्हा रिलॅक्स...

२. परीक्षेदरम्यान काय खावे ? 

१. अंडी, डाळी आणि काजू यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ. 
२. अक्रोड आणि चिया सीड्ससारखे ओमेगा-३ युक्त पदार्थ. 
३. ताजी फळे आणि भाज्या, विशेषतः गाजर, पालक आणि सफरचंद. 
४. ओट्स, ब्राऊन राईस आणि मल्टीग्रेन ब्रेड सारखे पदार्थ. 
५. हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी आणि नारळपाणी प्यावे.

आराध्याची उंची छान वाढावी म्हणून आई ऐश्वर्या राय घेतेय तिच्या डाएटची काळजी, देते ५ पदार्थ...

३. परीक्षेदरम्यानच्या काळात काय खाऊ नये ? 

१. जंक फूड आणि तळलेले पदार्थ जे तुमची सुस्ती आणि अंगातील आळस वाढवतील. 
२. चहा आणि कॉफी सारखे जास्त कॅफिनयुक्त पेय, जे झोपेवर परिणाम करू शकतात. 
३. कोल्ड्रिंक्स आणि यासारखी इतर साखरेचे प्रमाण भरपूर असलेली पेय. 
४. जास्त मसालेदार आणि जड पदार्थ जे पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात.

४. पाणी पिऊन राहा हायड्रेटेड... 

परीक्षेच्या वेळी मन आणि मेंदू ताजातवाना आणि सतर्क ठेवण्यासाठी हायड्रेशन अत्यंत महत्वाचे असते. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, लक्ष विचलित होणे आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी आहारात नारळ पाणी, लिंबू पाणी आणि हर्बल टी यांसारखे पदार्थ पिऊन हायड्रेटेड राहावे. 

५. परीक्षेच्या दिवसांत मुलांचे डाएट कसे असावे ? 

नाश्ता - मोड आलेली कडधान्य, ओट्स, अंडी आणि काजू. 
दुपारचे जेवण - डाळ, चपाती, हिरव्या भाज्या आणि दही. 
संध्याकाळचा नाश्ता - फळे, मूठभर बदाम किंवा अक्रोड, इतर ड्रायफ्रुटस, माखाणे. 
रात्रीचे जेवण - खिचडी किंवा सूप सारखे हलके आणि सहज पचणारे अन्नपदार्थ. 
झोपण्यापूर्वी - हळद किंवा अश्वगंधा कोमट दुधासोबत पिणे. 

 अभ्यासासोबतच निरोगी आहाराची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे.

Web Title: How Students Can Remain Fit & Energetic During Examinations Doctor Suggested Some Tips Tips for Staying Healthy During Exams How To Stay Healthy During Exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.