मला नको,जा.. नाही नकोय मला हे... अवघ्या दोन ते तीन वर्षाच मूल खाण्यास नाटक करत असली की आई-बाबा सहज त्याच्या हातात फोन टेकवतात. एक घास चिऊचा किंवा एक घास काऊचा म्हणून मुलांना खाऊ घालणारे पालकच हल्ली दिसत नाही.(toddler screen time) मुलांच्या हातात फोन दिला की ते कार्टुन नाही तर रिल्स पाहतात बसतात. त्यामुळे नेमकं काय खात आहे हे त्यांना समजत नाही.(screen time for 2 to 3 year olds) मोबाईलमध्ये इतके व्यस्त असतात की त्यांना ना जेवणाची चव कळते ना आपण किती प्रमाणात खाल्ल हे समजतं. (effects of screen time on toddlers)
मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा जेवताना केलेला हट्ट थांबवण्यासाठी अनेक पालक लहान वयातच मुलांच्या हातात मोबाईल देतात. सुरुवातीला ही सवय सोयीची वाटते, मात्र २ ते ३ वर्षांच्या मुलांच्या मेंदूवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे अनेक अभ्यासांतून समोर येत आहे.
आठवड्याभरातच घरी केलेल तूप-लोणी आंबतं-बुरशी लागते? 'या' पद्धतीने साठवा, महिनाभर राहिल ताजं
या वयातच मुलांचा मेंदू झपाट्याने विकसित होत असतो. भाषा शिकणे, भावनांची ओळख, हालचाली, लक्ष केंद्रित करणे या सगळ्या गोष्टींची पायाभरणी याच टप्प्यावर होते. सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे मुलांचा मेंदू नैसर्गिक गोष्टींपासून दूर जातो. खेळणी, माती, पाणी, माणसांचे चेहरे, आवाज याऐवजी स्क्रीनवरील वेगवान दृश्ये आणि आवाज मेंदूला कृत्रिम गोष्टी सवयीच्या ठरतात. त्याचा परिणाम म्हणून अनेक पालकांना मुलांमध्ये चिडचिडेपणा, राग, हट्ट, लक्ष न लागणे, झोप न येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. स्क्रिन टाइममुळे मुलांच्या झोपेवर देखील परिणाम होतो. फोन काढून घेतल्यामुळे मुलं रडायला लागतात किंवा चिडचिड करतात. तसेच बोलण्यात उशीर होणे, सामाजिक संवाद कमी होणे आणि कल्पनाशक्तीचा अभाव अशी समस्याही वाढताना दिसते. मुलांचा स्क्रीन टाइम अचानक बंद करण्यापूर्वी पालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी पाहूया.
1. सगळ्यात आधी पालकांनी मुले फोनवर काय बघतात याचे अनुसरण करायला हवे. लहान मुले सर्व काही शिकण्यास उत्सुक असतात. त्यासाठी त्यांना रंग, स्वयंपाकघरातील भांडी, माती आणि कणिक यासारख्या गोष्टी खेळण्यास द्या . ब्लॉक गेम किंवा कोडी देखील उपयुक्त ठरु शकतात.
2. मुलांना घरात ठेवण्याऐवजी बाहेर खेळण्यास पाठवा. त्यांच्यासोबत पालकांनीही जा. फुटबॉल, बॅटबॉलसारखे गेम त्यांना खेळायला शिकवा. मोकळ्या वातावरणाची सवय त्यांना लावा.
3. आपले मूल दोन वर्षांचे असेल तर त्यांच्याशी बोला. त्यांना त्यांच्या दिवसाबद्दल विचारा. प्रत्येक गोष्टींची नावे त्यांना सांगा. झोपेच्या किंवा जेवणाच्या वेळी हा उपक्रम करा. त्यामुळे त्यांना बोलण्याची सवय लागेल. पुस्तक वाचा, त्यांना नवनवीन गोष्टी सांगा.
4. मुलांना घरातील कामात सहभागी करा. त्यांना भांडी गोळा करायला लावू शकता. किंवा बॉक्समध्ये काही गोष्टी ठेवायला सांगा. लहान मुले आपल्या कृतीतून शिकतात. त्यासाठी पालकांनी देखील मुलांसमोर फोन वापरु नका.
