Join us

कारच्या सनरुफमधून मुलांना डोकं वर काढू देणं धोक्याचं, ट्राफिक पोलिसाने सांगितला मुलांच्या जीवाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 20:05 IST

Viral Video: सनरूफमधून लहान मुलांना डोकं वर वाढू देण्याचे काय काय परिणाम होतात, हे त्यांनी एका ड्रायव्हरला समजावून सांगितलं आहे. 

Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. बरेच व्हिडीओ असे असतात ज्यातून आपल्याला खूप महत्वाची माहिती मिळते. असाच एक मध्य प्रदेशमधील ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक पालकांनी आवर्जून बघावा असा हा व्हिडीओ आहे. सनरूफमधून लहान मुलांना डोकं वर वाढू देण्याचे काय काय परिणाम होतात, हे त्यांनी एका ड्रायव्हरला समजावून सांगितलं आहे. 

सामान्यपणे रस्त्यावर जर कधी ट्रॅफिक पोलीस किंवा अधिकारी दिसला त्यांना घाबरून लोक माघारी फिरतात नाही तर वेगानं समोर निघून जातात. पण या अधिकाऱ्यानं लोकांचं मन जिंकल आहे. लोक या अधिकाऱ्याच्या अंदाजाचं कौतुक करत आहेत. व्हिडिओत दिसत आहे की, अधिकाऱ्यानं शांतपणे आणि प्रेमानं सनरूफमधून डोकं वर काढलेल्या मुलांना कारमध्ये बसण्यास सांगितलं.

व्हिडिओत दिसणारा अधिकारी शहडोलच्या ट्रॅफिक विभागातील असून त्यांचं नाव विवेकानंद तिवारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते अशाप्रकारचे व्हिडीओ बनवून लोकांना नियम आणि धोके याबाबत माहिती देत असतात.

विवेकानंद तिवारी यांनी एक कार थांबवली आणि चालकाला समजावून सांगितलं की, लहान मुलांना अशाप्रकारे सनरूफमधून डोकं वर काढू देऊ नका. ते म्हणाले की, जर एखादी वस्तू किंवा गाडी अचानक समोर आली, ब्रेक मारण्याची गरज पडली तर मुलांना इजा होऊ शकते. त्यामुळे त्यांना सनरूफमधून असं डोकं वर काढू देऊ नका.

ट्रॅफिक अधिकाऱ्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून फक्त 4 दिवसात या व्हिडिओला 3 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लाइक्स मिळाले आहेत.

टॅग्स :पालकत्वसोशल व्हायरल