Lokmat Sakhi >Parenting > १० वर्षांचे होण्यापूर्वीच पालकांनी मुलांना शिकवायला हव्या ७ गोष्टी, मुलं गुणीच नाही तर स्वावलंबीही होतील

१० वर्षांचे होण्यापूर्वीच पालकांनी मुलांना शिकवायला हव्या ७ गोष्टी, मुलं गुणीच नाही तर स्वावलंबीही होतील

Healthy Habits to Teach Your Kids : मुलं १० वर्षाचे होण्याआधीच त्यांना काही बेसिक गोष्टी शिकवल्या तर ते नेहमी चांगलं वागतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 03:07 PM2023-12-19T15:07:16+5:302023-12-19T17:38:30+5:30

Healthy Habits to Teach Your Kids : मुलं १० वर्षाचे होण्याआधीच त्यांना काही बेसिक गोष्टी शिकवल्या तर ते नेहमी चांगलं वागतील.

Healthy Habits to Teach Your Kids : Good Habits for Kids Life Lessons to Learn Before Turning 10 | १० वर्षांचे होण्यापूर्वीच पालकांनी मुलांना शिकवायला हव्या ७ गोष्टी, मुलं गुणीच नाही तर स्वावलंबीही होतील

१० वर्षांचे होण्यापूर्वीच पालकांनी मुलांना शिकवायला हव्या ७ गोष्टी, मुलं गुणीच नाही तर स्वावलंबीही होतील

आपल्या मुलांनी जबाबदारीने वागावे कधीही कोणाला त्रास होईल असे वागू नये. आपली कामे स्वत: करावीत असं प्रत्येक घरातील पालकांना वाटते पण जर तुम्ही लहान वयात मुलांना बेसिक गोष्टी शिकवल्या नाही तर पुढे त्यांना शिस्ट लावणं कठीण होतं.  (How to Teach Your Kids Good Habits) मुलं पालकांना गृहित धरतात आणि त्याच्याकडे वाट्टेल त्या गोष्टींचा हट्ट करतात. (Healthy Habits to Teach Your Kids) पालकांनी नाही तर मुलांनीच पालकांवर नियंत्रण मिळवले आहे असे वाटू लागते. मुलं १० वर्षाचे होण्याआधीच त्यांना काही बेसिक गोष्टी शिकवल्या तर ते नेहमी चांगलं वागतील. (Good Habits for Kids Life Lessons to Learn Before Turning 10)

1) स्वत:ची काम स्वत: करा

लहान वयापासूनच मुलांना स्वत:ची काम स्वत: करायला शिकवा. खेळून झाल्यानंतर खेळणी भरून ठेवणं, बॅग भरणं, आपल्या वस्तू स्वत: जागच्याजागी ठेवणं, जेवल्यानंतर स्वत:ला प्लेट उचलून ठेवणं अशी काम लहानपणापासूनच केली तर मोठेपणी त्रास  होणार नाही.

2) मोठ्यांचा आदर

मुलांना मोठ्यांचा आदर करायला शिकवा. फक्त मोठ्यांचाच नाही तर लहान व्यक्तींशीही आदराने बोलायला शिकवा. यामुळे मुलं कमी वयातच जबाबदारीने वागतील.

3) मुलांना आपल्या जबाबऱ्यांबद्दल शिकवा

वेळोवेळी मुलांना आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल शिकवा. 10 वर्षांच्या वयात त्यांच्यावर लहानसहान कामं सोपवा आणि पूर्ण कशी करावीत हे सुद्धा सांगा. यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास होईल आणि प्रेंजेस ऑफ माईंड चांगला होईल.

घरातलं बांबू प्लांट वाढवण्यासाठी ३ सोप्या टिप्स, एकही पानं पिवळं पडणार नाही-हिरवंगार राहील प्लांट

4) प्रोब्लेम सोडवण्याची क्षमता

मुलांना प्रत्येक गोष्टीत आई वडीलांची मदत  घेण्याची सवय लागलेल असते. अशावेळी वाढत्या वयात ते सर्वच गोष्टींसाठी आई वडीलांवर अवलंबून राहतात.  मुलांमध्ये कॉन्फिडेंस वाढवण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच काही निर्णय स्वत: घेण्याची मुभा द्या. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास येईल.

५) मनी इज एव्हरीथिंग

मुलांना १० वर्षांचे असल्यापासून शिकवा की पैसे योग्य ठिकाणीच खर्च करावेत. त्यांना पैश्यांच्या महत्वाबद्दल सांगा. त्यांना पॉकेट मनी देणे सुरू करा ज्यामुळे त्यांना मनी मॅनेजमेंट करता येईल.

मुलं ऐकत नाही, उलट उत्तरं देतात? ५ गोष्टी करा, आईबाबा आणि मुलांचे वादच संपतील

६) चांगल्या सवयी

वाढत्या वयात मुलांना चांगल्या सवयी शिकवा. वेळेवर झोपणं, वेळेवण उठणं, शिस्त या गोष्टी त्यांना १० वर्षांचे होण्याआधी पासूनच शिकवा. 

७) डाएट आणि व्यायाम

आपल्या आहाराकडे लक्ष देणं फार महत्वाचे असते. शरीर एक्टिव्ह आणि फिट राहण्यसाठी व्यायाम करणं फार महत्वाचे आहे. कमीत वयातच व्यायाम आणि डाएटचे महत्व शिकवा. घरचं खाण्याची सवय लावा. ज्यामुळे मुलं  तुमच्याकडे बाहेरचं खाण्यासाठी हट्ट करणार नाहीत.
 

Web Title: Healthy Habits to Teach Your Kids : Good Habits for Kids Life Lessons to Learn Before Turning 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.