काही वर्षांपुर्वीचं पालकत्व आणि आताचं पालकत्व यात खूप मोठा फरक दिसत आहे. पुर्वी पालकांना मुलांना नाही कसं म्हणायचं हे अगदी व्यवस्थित ठाऊक होतं. मुलं ऐकत नसतील तर त्यांना आपलं म्हणणं कसं ऐकायला लावायचं हे त्यांना माहिती होतं. पण आता मात्र काही अपवाद सोडले तर बहुतांश पालकांना मुलांना नाही म्हणायला आवडत नाही. मुलं नाही म्हटल्यावर जो त्रास देतात, त्यापेक्षा त्यांचं ऐकलेलं बरं असं कित्येकांना वाटतं.. पण यामुळे 'आपलं तेच खरं' असा मुलांचा ॲटीट्यूड मुलांमध्ये होत आहे. ही मुलं जेव्हा बारावीनंतर करिअरसाठी, शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात, पालकांपासून दूर जातात, तेव्हा तिथे जुळवून घेणं त्यांना खूप त्रासदायक होतं. म्हणूनच मुलांना वेळीच सावध करून त्यांना काही गोष्टी समजावून सांगणं, काही गोष्टींची त्यांना जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे.(every child must know 6 life lessons before the age of 18)
मुलांना असायलाच हवी 'या' गोष्टींची जाणीव....
१. मोठं झाल्यावर तुला आधार द्यायला आम्ही नक्कीच असू, पण तुझं आयुष्य कसं घडवायचं हे तुझ्याच हातात आहे. तु जो मार्ग निवडशील त्यानुसार तुझं आयुष्य घडत- बिघडत राहील.
२. आयुष्यात काही मिळवायचं असेल तर शिस्त खूप गरजेची आहे. वेळीच स्वत:ला शिस्त लावून घे. वेळेचं भान ठेव. आयुष्यात खूप सकारात्मक बदल होतील.
उन्हाळ्यात खायलाच हवं ताज्या कैरीचं चटपटीत आंबट- गोड वरण, घ्या २ सोप्या रेसिपी
३. मोठ्या स्वप्नांचा नुसताच विचार करत बसणं योग्य नाही. त्याने आयुष्य बदलत नाही. त्या स्वप्नांसाठी तु आज किती मेहनत घेत आहेस, किती वेळ देत आहेस हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुझ्या बोलण्यावर नाही तर तुझ्या करण्यावर लोकांचा विश्वास असेल.
४. या काळात आपण नेमकं कोणती संगत निवडतो ते देखील खूप महत्त्वाचं आहे. चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत आयुष्य घडवते, तर वाईट संगतीत आपणही संपून जातो.
गुलाबाच्या रोपाला येतील छान टपोरी- मोठी फुलं, १ सोपा उपाय- फुलांनी नेहमीच बहरलेलं राहील रोप..
५. स्वत:च्या कम्फर्ट झोनच्या बाहेर ये. कारण त्यातून बाहेर पडून जेव्हा मेहनत घेशील, प्रयत्न करशील तेव्हा मिळेल. प्रगती होईल.
६. या वयात पालकांशी खोटं बोलण्याची, त्यांच्यापासून कित्येक गोष्टी लपविण्याची सवय लागते. अशी सवय चुकूनही स्वत:ला लावून घेऊ नको. कारण यातून पालकांना क्षणभर फसविल्याचा, भ्रमात ठेवण्याचा आनंद तुला नक्कीच मिळेल. पण त्यातून जे काही नुकसान तुझ्या वाट्याला येईल ते आयुष्यभर सल देणारं राहील.
