lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > मॉलमधल्या गेम झोनमध्ये पालक मुलांना सोडून देतात? ते मुलांसाठी खरंच सुरक्षित आणि आनंददायी असतं?

मॉलमधल्या गेम झोनमध्ये पालक मुलांना सोडून देतात? ते मुलांसाठी खरंच सुरक्षित आणि आनंददायी असतं?

Girl Losses 3 Fingers in Gaming Zone Of Mall Parenting Tips : फिरायला जायचं चला मॉलमध्ये असं म्हणत मुलांना मॉलची चटक कोण लावतं? पालकांसाठी मॉलमधले गेम झोन सोयीचे असतीलही पण मुलांचं काय?

By सायली जोशी-पटवर्धन | Published: May 9, 2023 03:40 PM2023-05-09T15:40:14+5:302023-05-09T15:48:40+5:30

Girl Losses 3 Fingers in Gaming Zone Of Mall Parenting Tips : फिरायला जायचं चला मॉलमध्ये असं म्हणत मुलांना मॉलची चटक कोण लावतं? पालकांसाठी मॉलमधले गेम झोन सोयीचे असतीलही पण मुलांचं काय?

Girl Losses 3 Fingers in Gaming Zone Of Mall Parenting Tips : Parents drop their kids off at the game zone in the mall? Is it really safe and enjoyable for children? | मॉलमधल्या गेम झोनमध्ये पालक मुलांना सोडून देतात? ते मुलांसाठी खरंच सुरक्षित आणि आनंददायी असतं?

मॉलमधल्या गेम झोनमध्ये पालक मुलांना सोडून देतात? ते मुलांसाठी खरंच सुरक्षित आणि आनंददायी असतं?

सायली जोशी-पटवर्धन

आला विकेंड की चला मॉलमध्ये, ही संस्कृती गेल्या काही वर्षात शहरांमध्ये वाढताना दिसत आहे. कपडे खरेदी, किराणा सामान खरेदी, खाण्यापिण्याचे भरपूर पर्याय आणि सर्वात महत्त्वाचे लहान मुलांसाठी असणारा गेमिंग झोन यामुळे मॉलला जाणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. मित्रमंडळी किंवा नातेवाईकांना भेटण्याचे ठिकाण ते फॅमिलीसोबत वेळ घालवण्याचे ठिकाण म्हणून मॉलमधील वावर वाढला आहे. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी असल्याने बहुतांश पालकांसाठी हा सोयीचा पर्याय असतो. पण स्क्रीनपासून काही काळ तरी दूर राहतील या हेतून मुलांना सतत मॉलमध्ये नेणे खरंच योग्य आहे का? गेमिंग झोनमध्ये मुलं खेळतात म्हणून आपण खूश असतो खरे पण या गेम्समुळे त्यांचा खरंच शारिरीक, मानसिक किंवा बौद्धिक विकास होणार आहे का याचा विचार पालक म्हणून आपण कधी करणार (Girl Losses 3 Fingers in Gaming Zone Of Mall Parenting Tips)? 

(Image : Google)
(Image : Google)

हैद्राबादमध्ये मॉलमधल्या गेमिंग झोनमध्ये खेळणाऱ्या एका मुलीसोबत नुकताच एक अपघात झाला. एका मशिनमध्ये खेळत असलेल्या ३ वर्षीय मुलीच्या हाताची बोटे या मशिनचे दार अचानक लागल्याने अडकली आणि कापली गेली. सदर मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला असल्याने या मुलीला आपली बोटे आयुष्यभरासाठी गमवावी लागली. यानंतर मॉलचालक, गेमिंग झोनशी संबंधिक व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला खरा पण त्यामुळे मूळ प्रश्न अनुत्तरीतच राहतात. इतक्या लहान मुलीसोबत अशी दुर्घटना होणे ही अतिशय खेदाची बाब आहे. मूळात इतक्या लहान मुलांना अशा मशीन्समध्ये खेळायला द्यावं की नाही? त्याचा त्यांच्या मनावर काय परीणाम होऊ शकतो? या प्रश्नांचा शोध घ्यायला हवा. 

सहज शिक्षण अभ्यासक रंजना बाजी म्हणतात...

मूल होणं ही जबाबदारीची गोष्ट आहे त्यामुळे मूल नक्की हवं आहे का, आता हवं आहे का या गोष्टींचा विचार करुन मगच तो निर्णय घ्यायला हवा. कारण आपलं आधीचं आयुष्य घरात मूल येण्याने मोठ्या प्रमाणात बदलणार असतं हे घरातील प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. तरच त्या मुलाचा योग्य पद्धतीने विकास होऊ शकतो. मुलांचा चांगला विकास व्हावा असं वाटत असेल तर मुलांना जिवंत गोष्टींचा अनुभव द्यायला हवा. यासाठी भाजी मंडईमध्ये नेणे, रेल्वे स्टेशनवर नेणे, चप्पल किंवा कपडे शिवणाऱ्याकडे नेणे आणि ती प्रक्रिया समजावून सांगणे जास्त सोयीचे होईल.

(Image : Google)
(Image : Google)

यामुळे मुलांचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास मदत होईल. पालक अनेकदा आपला ताण दूर करण्यासाठी किंवा करायला काहीच नाही म्हणून मॉलमध्ये जाऊन खरेद्या करतात आणि मुलांना गेमिंग झोनमध्ये सोडून देऊन मोकळे होतात. पण अशाने मुलांची योग्य पद्धतीने वाढ होणार नाही. त्यामुळे याबाबात पालकांनी योग्य पद्धतीने विचार करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्यायला हवे.  

Web Title: Girl Losses 3 Fingers in Gaming Zone Of Mall Parenting Tips : Parents drop their kids off at the game zone in the mall? Is it really safe and enjoyable for children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.