गरमागरम वरण भात आणि त्यावर साजूक तूप असं कॉम्बिनेशन प्रत्येकाला आवडतं. पराठा,खिचडी, पावभाजी, हलवा, शिरा, लाडू असो किंवा फोडणी देण्यासाठी तुपाचा हमखास वापर केला जातो.(Genelia D’Souza parenting advice) तूप हे फक्त चवीसाठीच नाही तर त्याच्या सुगंधासाठी देखील ओळखले जाते. हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर आपल्या संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे.(children diet and nutrition) तूप खाल्ल की रुप येतं. तुपात आरोग्याचं गुपित दडलेलं आहे असं आपण कायमच ऐकत आलो. अनेक पालक मुलांचे वजन वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात भरभरून तुपाचा वापर करतात. (ghee in children’s diet)पण सध्याच्या काळात सोशल मीडियावर आहाराबाबत अनेक ट्रेण्ड्स पाहायला मिळतात. बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि दोन मुलांची आई जेनेलिया डिसूझा ही तिच्या फिटनेसबद्दल नेहमीच जागरूक असते. नुकत्याच एका मुलाखतीत जेनेलियाने तिच्या मुलांच्या आहाराबद्दल काही गोष्टी सांगितल्या ज्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा 'आहार आणि आरोग्य' या विषयावर चर्चा सुरू झाली. जेनेलियाने म्हणते की, ती तिच्या मुलांच्या आहारात अतिरिक्त तुपाचा (Excess Ghee) वापर टाळते. ती म्हणते, "मी मुलांच्या धमन्या (Arteries) ब्लॉक करू इच्छित नाही." मुलांच्या आहाराबाबत तिने पालकांना सल्ला देखील दिला.
तुमच्या कपाटात आहेत का ‘या’ ५ साऊथ इंडियन साड्या, आयुष्यभर नेसा दिसा रॉयल-सगळ्यांची नजर तुमच्यावरच..
तिने सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये स्वत:चा वैयक्तिक अनुभव शेअर केला. ती म्हणते तूप माझ्या आहाराचा कधी मोठा भाग नव्हताच. माझ्या कुटुंबात कोलेस्टेरॉलची समस्या असल्यामुळे मी कायमच सतर्क असते. व्हेज किंवा नॉन व्हेज पदार्थ मी जपून खाते आणि इतरांनाही जपून खाऊ घालते. जेवणात खूप कमी वेळा तूप आणि बटर माझ्या घरी खाल्ले जाते.
जेनिलिया म्हणते तूप हा पदार्थ वाईट नाही. भारतीय स्वयंपाकघरात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चव वाढवण्याबरोबरच योग्य प्रमाणात तूप शरीरासाठी उपयोगीही ठरू शकतं. मात्र कोणताही पदार्थ अती प्रमाणात घेतला तर तो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. तिच्या या मतावर पोषणतज्ज्ञ किनिता पटेल यांनी देखील मत मांडलं की, तूप हे आरोग्यासाठी चांगलं असलं तरी योग्य प्रमाणात खायला हवं. ते दुधाची साय, फॅट आणि नारळाच्या तेलापासून बनवले जाते. यात काही प्रमाणात अतिरिक्त फॅट्स असते. जे आपल्याला हृदयासाठी चांगले नाही.
अनेकजण पराठा, खिचडी किंवा प्रत्येक पदार्थावर तूप घालून खातात. पण चांगले फॅट्स हे फक्त तुपातूनच नाही तर इतर पदार्थांमधून देखील मिळतात. आपल्या आरोग्याची, हृदयाची काळजी घेताना तुपासोबत इतर आहाराकडे लक्ष देणं गरजेच आहे. तसेच आपली मुले मैदानात खेळत असतील, खूप धावत असतील, तर त्यांना थोड्या प्रमाणात तूप देणे गरजेचे आहे. पण जर मूल सतत एकाच जागी बसून असतील, तर त्यांच्या आहारातील फॅट्सवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
पालकांनी मुलांना गरजेपेक्षा जास्त तूप दिल्यास मुलांचे वजन वाढू शकते. लहानपणीच अति तेलकट किंवा तुपकट पदार्थ खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. काही मुलांना जास्त तूप पचायला जड जाते, ज्यामुळे सुस्ती किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. मुलांच्या आहारात तुपाचे प्रमाण १ ते २ चमचे मर्यादित ठेवा. तूप देण्यापूर्वी ते घरगुती किंवा शुद्ध आहे की नाही हे देखील तपासा.
Web Summary : Genelia D'Souza advises parents to limit ghee in kids' diets, citing potential artery blockages. Moderation is key, balancing taste and health. Nutritionists highlight the importance of diverse fats and activity levels.
Web Summary : जेनेलिया डिसूजा ने बच्चों के आहार में घी की मात्रा सीमित रखने की सलाह दी है, क्योंकि इससे धमनियों में रुकावट आ सकती है। पोषण विशेषज्ञ विभिन्न प्रकार के वसा और गतिविधि स्तरों के महत्व पर प्रकाश डालते हैं।