Lokmat Sakhi >Parenting > जेनेलिया डिसुझाची मुलांकडून ‘ही’ एकच अपेक्षा, कुणी एकटं-उदास असेल तर माझ्या मुलांनी..

जेनेलिया डिसुझाची मुलांकडून ‘ही’ एकच अपेक्षा, कुणी एकटं-उदास असेल तर माझ्या मुलांनी..

Genelia D'souza's Expectations From Her Son: 'सितारे जमीन पर' हा जेनेलिया डिसुझा आणि आमीर खान यांचा चित्रपट सध्या खूप गाजतो आहे. त्यानिमित्तानेच जेनेलियाने स्वत:च्या मुलांकडून तिच्या काय अपेक्षा आहेत हे ही सांगितलं.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 17:25 IST2025-07-10T16:25:09+5:302025-07-10T17:25:01+5:30

Genelia D'souza's Expectations From Her Son: 'सितारे जमीन पर' हा जेनेलिया डिसुझा आणि आमीर खान यांचा चित्रपट सध्या खूप गाजतो आहे. त्यानिमित्तानेच जेनेलियाने स्वत:च्या मुलांकडून तिच्या काय अपेक्षा आहेत हे ही सांगितलं.. 

genelia d souza's expectations from her son, genelia d souza express her feelings about her kids  | जेनेलिया डिसुझाची मुलांकडून ‘ही’ एकच अपेक्षा, कुणी एकटं-उदास असेल तर माझ्या मुलांनी..

जेनेलिया डिसुझाची मुलांकडून ‘ही’ एकच अपेक्षा, कुणी एकटं-उदास असेल तर माझ्या मुलांनी..

Highlightsनात्यांमधला, स्पर्शामधला, बोलण्यातला ओलावाही कमी होत चालला आहे. अशावेळी जेनेलिया म्हणतेय त्याप्रमाणे....

जेनेलिया डिसुझा आणि रितेश देशमूख ही महाराष्ट्राची लाडकी जोडी. मधल्या काही वर्षांत जेनेलिया पुर्णपणे तिच्या मुलांमध्ये अडकलेली होती. कुटूंबासाठी, मुलांसाठी वेळ दिल्यानंतर तिने आता पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं आहे. 'वेड' चित्रपटानंतर ती आमीर खानसोबत 'सितारे जमीन पर' चित्रपटात झळकली. तिचा हा चित्रपट अतिशय हिट असून त्याने बक्कळ कमाईही केली. लहान मुलांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात जेनेलियाची भुमिकाही खूप खास आहे. पण प्रत्यक्षात मात्र ती आई म्हणून कशी आहे आणि मुलांकडून तिच्या काय अपेक्षा आहेत, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. त्याविषयीच ती जे काय म्हणते आहे ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातूनच तिच्यातली संवेदनशील आई दिसून येते.(Genelia D'souza's expectations from her son)

 

स्वत:च्या मुलांकडून जेनेलियाच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत?

Nayandeep Rakshit या सोशल मीडिया हॅण्डलवरून जेनेलिया डिसुझाच्या एका मुलाखतीचा छोटासा भाग शेअर करण्यात आला आहे.

कडिपत्त्याच्या रोपाला पानं कमी- काड्याच जास्त? १ उपाय- कडीपत्ता वाढेल जोमानं-पानंही होतील सुगंधी भरपूर

यामध्ये ती म्हणते की मी माझ्या मुलांना नेहमी हेच सांगते की तुम्ही मोठेपणी चांगले फूटबॉल प्लेअर व्हा, अभ्यासात हुशार व्हा किंवा कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवा.. त्याविषयी माझं काहीच म्हणणं नाही. पण तुम्ही मात्र आतापासूनच  अशी व्यक्ती व्हायला हवं ज्याच्याकडे संवेदनशील मन आहे. 

 

जेनेलिया म्हणते की मला असं वाटतं शाळेत जर इतर सगळे ग्रुपमध्ये बसलेले आहेत, हसत आहेत आणि त्याच वर्गात दुसरीकडे मात्र एखादा मुलगा किंवा मुलगी अगदी एकटी, उदास बसलेली आहे तर माझ्या मुलानी ती गोष्ट हेरली पाहिजे. तो स्वत:हून त्याच्याकडे गेला पाहिजे आणि त्याच्याशी बोलून त्याला समजून घेतलं पाहिजे.

५ पद्धतीने करा वॉकिंग! वजन उतरेल भराभर आणि आरोग्याला होतील भरपूर फायदे...

त्याचं मन तेवढं संवेदनशील आणि दुसऱ्यांचा त्रास समजून घेणारं असायला हवं, ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.. सध्या सगळ्याच गोष्टी एवढ्या वेगात रुक्ष होत आहेत की नात्यांमधला, स्पर्शामधला, बोलण्यातला ओलावाही कमी होत चालला आहे. अशावेळी जेनेलिया म्हणतेय त्याप्रमाणे संवेदनशील पिढी निर्माण होणं खरोखरच गरजेचं झालं आहे. 


 

Web Title: genelia d souza's expectations from her son, genelia d souza express her feelings about her kids 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.