Join us  

मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना 'हे' पदार्थ खाऊ घाला- सुपर कम्प्युटरसारखं पळेल डोकं... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2024 12:01 PM

Food That Helps To Improve Brain Health And Memory: मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना काय खायला द्यावं, हा प्रश्न बऱ्याच पालकांना पडलेला असतो. हे बघा तज्ज्ञांनी दिलेलं त्याचं उत्तर....

ठळक मुद्देमुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना नेमकं काय खायला द्यावं, असा प्रश्न पडला असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेली ही माहिती एकदा वाचा.

मुलांच्या अभ्यासाचा सगळा खेळ स्मरणशक्तीवर अवलंबून आहे. त्यांची स्मरणशक्ती किती, पाठ केलेलं कितपत लक्षात राहाते यावर ते परीक्षा कशी देतात किंवा परीक्षेत त्यांना किती गुण पडतात, हे अवलंबून असते. त्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता वाढावी यासाठी पालकांचा प्रयत्न असतो (Food that helps to boost memory and concentration of kids). मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना नेमकं काय खायला द्यावं, असा प्रश्न पडला असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेली ही माहिती एकदा वाचा. (food that helps to improve brain health and memory)

मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे अन्नपदार्थ

 

मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी कोणते पदार्थ उपयुक्त ठरतात याची माहिती healthypodcastofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये तज्ज्ञ असं सांगत आहेत की नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असं समाेर आलं आहे की ज्यांच्या शरीरात पुरेसं मॅग्नेशियम असतं, त्यांचा मेंदूही आकाराने मोठा असतो. त्यामुळे तल्लख बुद्धीमत्तेसाठी मुलांना मॅग्नेशियम भरपूर असणारे पदार्थ खायला द्यावेत.

डाळिंब पिकलेलं-गोड- रसरशीत आहे ना? २ सोप्या टिप्स, न चिरता ओळखा लालबूंद डाळिंब

मॅग्नेशियम भरपूर असणारे किंवा मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मदत करणारे जे पदार्थ आहेत त्यापैकी काही पदार्थ म्हणजे भाेपळ्याच्या बिया आणि सुर्यफुलाच्या बिया. या बिया अतिशय पौष्टिक असतात. त्यामुळे त्या मुलांना अवश्य खायला द्याव्या.

 

दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मध आणि आवळा हे एकत्र करून मुलांना खायला द्यावेत. हे दाेन पदार्थ एकत्र करून खाल्ल्यामुळे भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात.

होळीनंतर फरशीवर, भिंतींवर रंगाचे डाग पडले? ३ टिप्स- डाग होतील स्वच्छ आणि घर पुन्हा चकाचक

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारा आणखी एक पइार्थ म्हणजे डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. शिवाय त्यात असणारे आयझोफ्लेवॉन, पॉलीफिनॉल्स आणि इतर कम्पाउंड्स मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंअन्नआरोग्य