Lokmat Sakhi >Parenting > फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते परीक्षेचं टेंशन कमी करण्याचा उपाय-५-४-३-२-१, व्हा रिलॅक्स...

फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते परीक्षेचं टेंशन कमी करण्याचा उपाय-५-४-३-२-१, व्हा रिलॅक्स...

How To Deal with Exam Stress : Hack Your Exam Stress : Last-Minute Hacks to Stay Calm & Relaxed before Exam Day : Exam Stress & How to Deal with it : Fitness trainer Anshuka Parwani shares tips to reduce exam stress : परीक्षा जवळ आल्यावर अभ्यासाचा स्ट्रेस - टेंन्शन वाढते ? तर हा उपाय नक्की करुन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 15:43 IST2025-02-15T15:36:12+5:302025-02-15T15:43:36+5:30

How To Deal with Exam Stress : Hack Your Exam Stress : Last-Minute Hacks to Stay Calm & Relaxed before Exam Day : Exam Stress & How to Deal with it : Fitness trainer Anshuka Parwani shares tips to reduce exam stress : परीक्षा जवळ आल्यावर अभ्यासाचा स्ट्रेस - टेंन्शन वाढते ? तर हा उपाय नक्की करुन पाहा...

Fitness trainer Anshuka Parwani shares tips to reduce exam stress How To Deal with Exam Stress Hack Your Exam Stress | फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते परीक्षेचं टेंशन कमी करण्याचा उपाय-५-४-३-२-१, व्हा रिलॅक्स...

फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते परीक्षेचं टेंशन कमी करण्याचा उपाय-५-४-३-२-१, व्हा रिलॅक्स...

मुलांच्या परीक्षा म्हटलं की मुलांसोबतच पालकांना देखील तितकेच जास्त टेंन्शन येते. यातही परीक्षा जर दहावी किंवा बारावीची असली तर मग विचारुच नका. सध्या परीक्षांचा सिझन (How To Deal with Exam Stress) सुरु आहे. वर्षभर कितीही चांगल्या पद्धतीने (Hack Your Exam Stress) अभ्यास केला तरीही ऐन (Last-Minute Hacks to Stay Calm & Relaxed before Exam Day) परिक्षेच्यावेळी टेंन्शन येतेच. कितीही हुशार किंवा 'ढ' विद्यार्थी असला तरी परीक्षा म्हटलं की सगळ्यांनाच नको वाटते. काहीवेळा मुलांचा संपूर्ण अभ्यास झाला असला तरीही ते परीक्षेचा स्ट्रेस घेतात. वर्षभर आपण अभ्यास (Exam Stress & How to Deal with it) करतोच पण परीक्षा जवळ आली की सराव, पाठांतर, उजळणी अधिक जोमाने करायला लागतो. यामुळे सतत अभ्यास करुन देखील मनावर दडपण येते, नको ते विचार मनात डोकावतात, भीती वाटते अशा सगळ्या गोष्टींमुळे मुलांवरचा परीक्षेचा ताण वाढत जातो(Fitness trainer Anshuka Parwani shares tips to reduce exam stress).

ऐन परीक्षेच्या आधी मुलांवरील हा ताण आणि टेंन्शन कमी करण्यासाठी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) हिने ५-४-३-२-१ चा एक साधासोपा जादुई फॉर्म्युला तिच्या इंस्टाग्राम व्हिडीओ वरुन शेअर केला आहे. पालकांनी मुलांना हा ५-४-३-२-१ चा फॉर्म्युला वापरण्यास सांगून त्यांच्या मन आणि मेंदूवरील परीक्षेचे ओझे कमी करण्यास मदत करावी. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी हिने सांगितलेला ५-४-३-२-१ चा फॉर्म्युला म्हणजे नेमकं आहे तरी काय ते पाहा.    

काय आहे ५ - ४ - ३ - २ - १ चा खास फॉर्म्युला ? 

१. स्टेप ५ :- कोणत्याही ५ वस्तूंवर लक्ष केंद्रित करा :- आपले मन आणि मेंदूवरील अभ्यासाचा स्ट्रेस किंवा टेंन्शन कमी करण्यासाठी रुल ५ फॉलो करा. या रुल ५ मध्ये, तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसला आहात त्याच्या आसपासच्या ५ गोष्टींकडे थोड्या थोड्या वेळाने पाहा. त्या कोणत्याही ५ वस्तू असू शकतात. या ५ वस्तूंचे निरीक्षण करा. जसे की, तुमच्या वह्या - पुस्तकांचे कव्हर, पेन, छोटसं रोपं, चहा किंवा कॉफीचा मग किंवा खिडकी बाहेरील अनेक वस्तू तसेच गोष्टी. असे केल्याने तुम्ही अभ्यासाचा स्ट्रेस किंवा टेंन्शन यांसारख्या विचारात गुरफटून न जाता वर्तमानातं किंवा भानावर येण्यास मदत होते. 

२. स्टेप ४ :- कोणत्याही ४ वस्तूंना स्पर्श करा :- रुल ४ मध्ये तुम्ही तुमच्या जवळपासच्या कोणत्याही ४ वस्तूंना स्पर्श करुन तो स्पर्श अनुभवू शकता. तुमच्या पुस्तकाचे पान, तुमचे स्टडी टेबल, किंवा तुम्ही परिधान केलेलं कपडे. याचबरोबर तुम्ही तुमच्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर हलकेच घासून ते अलगद डोळ्यांवर ठेवू शकता आणि डोळ्यांना होणारा हातांचा स्पर्श अनुभवू शकता. यामुळे स्ट्रेसमध्ये असलेलं तुमचं शरीर रिलॅक्स होण्यास मदत होईल. 

काही केल्या मुलं सकाळी अंथरुणातून लवकर उठत नाहीत? ? ५ टिप्स- मुलं उठून शाळेसाठी होतील रेडी...

३. स्टेप ३ :- कोणत्याही ३ प्रकारच्या आवाजावर लक्ष केंद्रित करा :- रुल ३ मध्ये तुम्ही तुमच्या आसपासच्या कोणत्याही ३ प्रकारच्या आवाजावर लक्ष केंद्रित करु शकता. यासाठी डोळे बंद करून कानांनी कोणत्याही ३ प्रकारच्या येणाऱ्या आवाजावर लक्ष केंद्रित करा. जसे की, खिडकीतील पक्ष्यांचा किलबिलाट, तुमच्या हृदयाचे ठोके, घड्याळाची टिकटिक यांसारखे आवाज. यामुळे मनातील इतर विचार दूर होऊन तुमचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होण्यास अधिक मदत होईल. 

४. स्टेप २ :- कोणत्याही २ वस्तूंचा सुगंध - वास घ्या :- रुल २ मध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही २ वस्तूंचा किंवा पदार्थांचा सुगंध घेऊ शकता. जसे की टेबलवर ठेवलेली चहा किंवा कॉफी, बाहेरील ताजी हवा, वह्या - पुस्तकांच्या पानांचा सुवास. यामुळे या वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधामुळे तुम्हाला रिलॅक्स होण्यास अधिक मदत होईल. 

आराध्याची उंची छान वाढावी म्हणून आई ऐश्वर्या राय घेतेय तिच्या डाएटची काळजी, देते ५ पदार्थ...

५. स्टेप १ :- कोणत्याही एका पदार्थाची चव चाखा :-  रुल १ मध्ये तुम्ही कोणत्याही एका चवीचा आनंद घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ किंवा फळं खाऊ शकता. हे पदार्थ खाताना डोळे बंद करून त्याचा चवीचा आनंद घ्या. तसेच खाताना त्या पदार्थाचा आस्वाद आणि आनंद घेत घेत खा. कोणत्याही एका चवीचा अनुभव घेतल्यास तुम्हांला थोडे फ्रेश वाटेल. यासोबतच, तुम्हाला अभ्यासांतून छोटासा ब्रेक मिळून रिफ्रेशमेंट मिळेल. जेणेकरून तुम्ही पुन्हा अभ्यास करायला तयार व्हाल आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल.


Web Title: Fitness trainer Anshuka Parwani shares tips to reduce exam stress How To Deal with Exam Stress Hack Your Exam Stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.