Join us

फराह खान चाळिशी उलटल्यावर झाली तिळ्यांची आई, ती म्हणते-आईपण सोपं नव्हतंच पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2025 18:55 IST

Farah Khan Reveals About Her Late Pregnancy: आज साठावा वाढदिवस साजरा करत असलेली फराह खान (Farah Khan celebrating her 60th birthday), चाळीशी नंतरच्या मातृत्वातलं आव्हान कसं पेललं त्याविषयी सांगतेय (Farah Khan reveals about her late pregnancy)

ठळक मुद्दे मैत्रिणीच्या सल्ल्याने तिने आयव्हीएफ उपचार घेतले आणि मग दिवस राहून तिने एकदम तिळ्यांना जन्म दिला. आज उशिरा का असेना पण तिला मातृत्वाचा आनंद मिळाला आणि ती तो पुरेपूर उपभोगत आहे.

प्रत्येक गोष्ट एका ठराविक वेळेत होणं गरजेचं असतं. योग्य वयात शिक्षण होणं, योग्य वयात नोकरी लागणं हे जसं गरजेचं आहे, तसंच योग्य वयात लग्न होणं, योग्य वयात मुलं होणं हे देखील गरजेचंच आहे. पण काही कारणाने गोष्टी लांबत जातात आणि मग लग्न व्हायला, मुलं व्हायला अडचणी येतात. तसंच काहीसं झालं प्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्माती फराह खानचं. आज फराह तिचा ६० वा वाढदिवस साजरा करते आहे (Farah Khan celebrating her 60th birthday). हे वय असं असतं की या वयात मुलं थोडी मोठी होऊन हाताशी आलेली असतात. पण फराहची मुलं मात्र अवघी १७- १८ वर्षांची आहेत. याविषयी ती सांगते आहे काहीतरी खास असं..(Farah Khan reveals about her late pregnancy)

 

अभिनेत्री डेबिना बॅनर्जी हिने फराह खानची एक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमधला एक छोटासा भाग viralbhayani या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तिला प्रश्न विचारला की तिने मुलं होऊ देण्याचा निर्णय एवढ्या उशिरा का घेतला.

तारुण्य हवं तर साखर सोडा! एक्सपर्ट सांगतात-साखरेचे खाणार त्याला लवकर म्हातारपण येणार!

यावर फराह म्हणते की मुळातच तिचं लग्न उशिरा म्हणजे वयाच्या ४० व्या वर्षी झालं. साधारण या वयात बहुतांश लोक एक- दोन मुलांचे पालक झालेले असतात. लग्न उशिरा झालं, वय वाढलेलं होतं त्यामुळे साहजिकच नैसर्गिकपणे दिवस राहण्यात तिला अडचणी आल्या. लग्नानंतरची दोन- तीन वर्षे अशीच गेली. त्यानंतर मैत्रिणीच्या सल्ल्याने तिने आयव्हीएफ उपचार घेतले आणि मग दिवस राहून तिने एकदम तिळ्यांना जन्म दिला. आज उशिरा का असेना पण तिला मातृत्वाचा आनंद मिळाला आणि ती तो पुरेपूर उपभोगत आहे.

 

हल्ली बहुतांश महिलांना नैसर्गिकपणे दिवस राहण्यात अडचणी येत आहेत. यासाठी आपली बदललेली लाईफस्टाईलही खूप जबाबदार आहे. दिवस राहात नाहीत म्हणून थोडं नाराज होणं साहजिक आहे. पण त्यामुळे नैराश्य मात्र येऊ देऊ नका.

प्रत्येक महिलेसाठी सुपरफूड ठरणारे ३ पदार्थ, आजारपण फिरकणार नाही, नेहमीच राहाल उत्साही

तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार घेतले तर पालकत्वाचा आनंद आपल्यालाही मिळू शकतो, यावर विश्वास ठेवा. फराहचं उदाहरण हेच तर सांगत आहे. उशिरा का असेना पण ती आई झाली.. आता २५- ३० वर्षांच्या आईला बाळ सांभाळणं जेवढं सोपं आहे तेवढं ते चाळीशी पार केलेल्या आईला नाही.. पण मनात आणलं आणि पक्कं ठरवलं तर सगळं शक्य आहे आणि तेच तर फराह सांगते आहे.. 

 

टॅग्स :पालकत्वफराह खानलहान मुलं