Join us

बाळा, तुझ्या वेदना पाहून होणारा त्रास... काय सांगू.. इलियाना डी क्रुझ आजारी लेकाची तगमग पाहून म्हणते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2023 16:27 IST

Emotional Post of Actress Ileana D'Cruz: अभिनेत्री इलियाना डी क्रुझ (Ileana D'Cruz) हिने तिच्या बाळासोबतचे काही फोटो नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले असून ती बाळाच्या तब्येतीबाबत जरा चिंतित दिसते आहे.

ठळक मुद्देतिच्या मुलाचा त्रास लवकरात लवकर कमी व्हावा आणि इलियानाच्या चेहऱ्यावर तिचं ते गोड हास्य पुन्हा दिसावं, अशी मनोमन अपेक्षा मात्र तिचे चाहते करत आहेत. 

देखण्या- सुंदर चेहऱ्याची अभिनेत्री इलियाना डी क्रुझ (Ileana D'Cruz) हिला १ ऑगस्ट रोजी मुलगा झाला. मुलाचा जन्म झाल्यानंतरचे काही फोटो तिने साेशल मिडियावर (social media) शेअर केलेच होते. आता पुन्हा एकदा तिने तिच्या मुलासोबतचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. पण या फोटोंमध्ये मात्र इलियाना खूपच जास्त डिस्टर्ब दिसते आहे. तिने एकूण तिचे २ फोटो शेअर केले असून एका फोटोमध्ये ती आणि तिचा मुलगा म्हणजेच कोआ फिनिक्स डोलन (Koa Phinix Dolan) दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती एकटीच दिसत असून तिच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण जाणवतो आहे.

 

त्या फोटोना तिने जी कॅप्शन दिली आहे, ती खरोखरच प्रत्येक आईच्या मनातली आहे. बऱ्याचदा मुलांचं दुखणं, त्यांचा त्रास त्यांच्या आईंना समजत असतो, दिसत असतो. मुलांचा तो त्रास पाहून आईला खूपच वेदना होत असतात.

हॉटेलचंच नाही, घरचं खाऊनही वाढतात आजार आणि लठ्ठपणा, खरं नाही वाटत? पाहा व्हायरल व्हिडिओ

पण आपल्या लेकराचं दुखणं काही ती घेऊ शकत नाही. त्यामुळे मुलांचा तो त्रास नुसता बघत बसणं त्या आईसाठी खूपच कठीण असतं. अशाच प्रकारची पोस्ट तिने या फोटोंना लिहिली असून ती म्हणतेय की बाळा तुझ्या वेदना पाहून मला जो त्रास होतोय, तो कशानेही कमी होऊ शकत नाही....

 

इलियानाचा मुलगा कोआ याला नेमकं काय झालं आहे, त्याला कशाचा त्रास होतो आहे, याबाबत मात्र तिच्या पोस्टमध्ये काहीही माहिती नाही.

मायलेकीने देशासाठी जिंकले पदक! देशासाठी खेळायचे म्हणून सर्वस्व पणाला लावून खेळणाऱ्या आई आणि मुलीची वाचा गोष्ट

पण तो त्रास मात्र इलियानाच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. तिच्या मुलाचा त्रास लवकरात लवकर कमी व्हावा आणि इलियानाच्या चेहऱ्यावर तिचं ते गोड हास्य पुन्हा दिसावं, अशी मनोमन अपेक्षा मात्र तिचे चाहते करत आहेत. 

 

टॅग्स :पालकत्वसोशल व्हायरल