Join us

अभ्यास तर केला पण परीक्षेत काहीच आठवत नाही? ५ टिप्स, मार्क पडतील भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 15:19 IST

Learning techniques for students: learning tips for students: exam preparation: exam preparation tips for students: how to study for exams tip: कितीही अभ्यास केला तरी परीक्षेच्या वेळी काहीच लक्षात राहात नाही, मग या सोप्या गोष्टी कायम ध्यानात ठेवा

Exam Preparation Tips For Students: सध्या बारावीच्या मुलांच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. अवघ्या काही दिवसातच दहावीच्या मुलांच्या परीक्षेला देखील सुरुवात होतील. (learning tips for students) परीक्षा सुरु झाल्या की, मुलांसह पालकांना देखील काळजी वाटू लागते. (how to study for exams tip) या काळात अनेक पालकांची तक्रार अशी असते की, मुले तासनतास पुस्तक वाचत बसतात परंतु, त्यांच्या लक्षात काहीच राहात नाही. मुलांच्या कमकुवत स्मरणशक्तीमुळे त्यांना वाचलेलं काही एक लक्षात नसते. मेंदूवर कितीही जोर दिला तरी त्यांना काहीच आठवत नाही. अभ्यास करताना मुले वारंवार घोकंपट्टी करत असतात. मुलांच्या कमकुवत स्मरणशक्तीमुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. सततच्या तणावामुळे त्यांचे मानसिक संतुलन देखील बिघडते. जर तुमच्याही मुलांचा अभ्यास लक्षात राहात नसेल तर या टिप्स नक्की फॉलो करा. 

1. ही सवय सोडा 

अनेकदा आपण लक्षात ठेवण्यासाठी अभ्यास समजून घेत नाही. ज्यामुळे काही काळानंतर आपल्याला आठवणे बंद होते. त्याऐवजी मुलांना लक्षात ठेवलेला अभ्यास लिहिण्याची सवय लावा. घडलेली घटना, त्याचे स्टोरीटेलिंग शिकवा. त्यामुळे अधिकवेळपर्यंत गोष्टी मुलांच्या लक्षात राहातील. 

2. अभ्यासाला मनोरंजक बनवा 

मुलांना अभ्यासात रस नसेल तर ते अभ्यास करणे टाळतात. अशावेळी मुलांचा अभ्यास अधिक मनोरंजक बनवण्यासाठी पालकांनी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. गेम, क्विझ किंवा इंटरेक्टिव्ह लर्निंगची मदत घेऊ शकता. 

3. योग्य आहार आणि झोप 

झोप आणि पोषणाचा अभाव मुलांमधली स्मरणशक्ती कमकुवत करते. या दोन्ही गोष्टींच्या कमतरतेमुळे मुलाचा मेंदू सक्रिय राहत नाही. ज्यामुळे ते गोष्टी लवकर विसरायला लागतात. मुलांच्या आहारात बदाम, अक्रोड, हिरव्या भाज्या, फळे यांचा समावेश करा. तसेच मुलांना ८ तासांची झोप घ्यायला सांगा. 

4. एकाग्रतेचा अभाव

मोबाईल, घरातील आवाज किंवा टीव्हीमुळे मुलांचे अभ्यासातून लक्ष विचलित होते. त्यामुळे ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करु शकत नाही. अशावेळी मुलांना नेहमी शांत वातावरणात अभ्यास करायला सांगा. अभ्यास करताना त्यांना छोटे छोटे ब्रेक द्या, ज्यामुळे त्यांची एकाग्रता देखील टिकून राहिल. 

5. डार्क रंगांचा वापर 

अनेकदा पालक अभ्यास लक्षात राहावा म्हणून मुलांसाठी काही युक्त्या करुन पाहतात. अशावेळी तुम्ही मुलांची स्मरणशक्ती अधिक वाढवण्यासाठी चमकदार रंगांचा वापर करु शकतात. ज्यामुळे गोष्टी त्यांच्या सहज लक्षात राहातील. त्यांना शिकवताना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा तसेच स्टिकी नोट्सद्वारे गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत करा.  

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंपरीक्षा