मुलांच्या संगोपनात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. रागाच्या भरात मुलांवर ओरडणे हा अनेकदा सहज घडणारा प्रकार असला, तरी त्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम होऊ शकतो. सतत ओरडण्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो, भीती निर्माण होते आणि पालक-मुलांमधील नात्यात दुरावा येऊ शकतो. काही प्रसंगी शिस्त लावणे गरजेचे असले तरी काही वेळा ओरडण्याऐवजी समजून घेणे आणि शांतपणे संवाद साधणे अधिक फायदेशीर ठरते(don’t scold children at these 5 moments).
अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की, पालक मुलांच्या वागण्यामुळे हतबल होतात आणि रागाच्या भरात त्यांच्यावर ओरडतात किंवा त्यांना रागावतात. खरं तर, पालकांना तसे करायचे नसते, पण कधीकधी मुले इतकी त्रास देतात की लाख प्रयत्न करूनही पालकांना स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि त्यांच्याकडून तशी प्रतिक्रिया दिली जाते. परंतु, 'हॅप्पी माइंड्स'च्या (Happy Minds) संस्थापक श्वेता गांधी यांच्या मते, पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की असे पाच प्रसंग असतात, जेव्हा मुलांना अजिबात रागावू नये. कोणते आहेत ते प्रसंग? पाहा...
कोणत्या ५ प्रसंगी पालकांनी मुलांवर ओरडू किंवा रागावू नये...
१. मूल झोपेतून उठल्यावर - संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो :- मुलांना सर्वात आधी ते जेव्हा झोपेतून उठतील तेव्हा अजिबात रागावू नये. जेव्हा ते झोपेतून उठतात. कारण, सकाळी उठताना मुलांचा मूड हा अत्यंत भावनिक मूड (Emotional Tone of the Day) असतो. अशा वेळी जर त्यांना काहीही वाईट बोलले किंवा त्यांच्यावर ओरडले, तर मुलांचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. जर मुलाने उठायला उशीर केला किंवा सकाळी थोडा हट्ट केला, तरीही पालकांनी शांत राहणे गरजेचे आहे. सकाळी उठल्या उठल्या ओरडल्यामुळे मूल दिवसभर अस्वस्थ किंवा चिडचिडे राहू शकते. त्याऐवजी त्यांना प्रेमाने उठवून त्यांच्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने कशी होईल, याकडे लक्ष द्या.
काही सेंकदांचं रिल मुलांसाठी थोडं थोडं विष, ५ लक्षणं दिसली तर समजा आपलं मूल धोक्यात आहे!
२. शाळेत जाताना मुलांवर ओरडू नका :- दुसरी महत्त्वाची वेळ म्हणजे जेव्हा मूल शाळेत जात असते, तेव्हा त्याला कधीही रागावू नये. कारण, त्या वेळी पालकांनी म्हटलेली कोणतीही गोष्ट मुलांच्या मनाला खोलवर लागते आणि मग दिवसभर ते त्याच गोष्टीचा विचार करत राहतात. त्यामुळे पालकांनी अशी चूक करणे आवर्जून टाळले पाहिजे. मुले जेव्हा घराबाहेर पडतात, तेव्हा त्यांचे मन स्थिर असणे गरजेचे असते. जर शाळेत जाताना त्यांच्यावर ओरडले, तर त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. "मी काहीतरी चुकीचे केले आहे" किंवा "आई-बाबा माझ्यावर रागावले आहेत" हीच भावना त्यांच्या मनात घर करून राहते. याचा परिणाम त्यांचा अभ्यास आणि आत्मविश्वासावर होऊ शकतो. त्यामुळे त्यांना निरोप देताना नेहमी हसतमुख चेहऱ्याने आणि प्रेमाने द्यावा.
३. शाळेतून आल्यावर ओरडू किंवा रागावू नये :- मुले शाळेतून परत आल्यावर त्यांच्यावर ओरडू नये. त्या वेळी मुले खूप थकलेली असू शकतात आणि कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नसतात. अशा परिस्थितीत मुलांवर ओरडण्याऐवजी त्यांना भावनिक आधार देणे अधिक गरजेचे असते. शाळेतील अभ्यासाचा ताण, मित्रांसोबतचे वाद किंवा खेळाचा थकवा घेऊन मुले जेव्हा घरी येतात, तेव्हा त्यांना प्रेमाची गरज असते. जर ते घरी आल्यावर तुम्ही त्यांच्यावर ओरडलात किंवा अभ्यासाचा तगादा लावलात, तर त्यांना घर असुरक्षित वाटू शकते. त्यांना थोडा वेळ द्या, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या आणि त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करा. यामुळे मुलांचा तुमच्यावरचा विश्वास अधिक वाढतो.
ऐन चाळिशीत कँसर होण्याची ५ प्रमुख कारणं! दिवसभरात करताय 'या' चुका - दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात...
४. मुले झोपताना कधीही त्यांच्यावर ओरडू नये :- जेव्हा मूल झोपायला जाते, तेव्हा पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे की त्यांच्याशी कोणतेही कठोर किंवा कडू शब्द बोलू नयेत किंवा त्यांच्या अंगावर ओरडू नये कारण, त्या वेळी मुलाचे सुप्त मन (Subconscious Mind) अत्यंत अॅक्टिव्ह असते आणि पालकांनी म्हटलेले शब्द त्यांच्या मनावर आणि मेंदूवर खोलवर कोरले जातात. झोपण्यापूर्वी मुलांच्या कानावर जे शब्द पडतात, त्यांचा परिणाम त्यांच्या स्वप्नांवर आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो. जर तुम्ही झोपताना त्यांना रागावत असाल, तर त्यांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. त्याऐवजी, झोपण्यापूर्वी त्यांना एखादी गोष्ट सांगा, त्यांच्या दिवसाचे कौतुक करा किंवा केवळ "माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे" असं म्हणा. यामुळे त्यांचे सुप्त मन अधिक सकारात्मक होईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
५. मुले जेव्हा हट्ट करतात, तेव्हा शांत राहा :- शेवटी, पण सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे जेव्हा मूल खूप हट्ट करत असते, ओरडत असते किंवा रडत असते. अशा वेळी मुलाला ओरड्याची किंवा शिस्तीची नाही, तर तुमच्या प्रेमळ सोबतीची गरज असते. अशा परिस्थितीत पालकांनी त्यांना कोणताही 'लेक्चर' किंवा उपदेश न देता, फक्त आपुलकी आणि भावनिक सुरक्षा दिली पाहिजे. जेव्हा मूल रडते किंवा हट्ट करते तेव्हा प्रत्यक्षात ते आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असते, ज्या त्याला शब्दांत सांगता येत नाहीत. अशा वेळी जर तुम्हीही त्यांच्यावर ओरडलात, तर परिस्थिती अधिक बिघडते. त्याऐवजी त्यांना जवळ घ्या, त्यांना शांत होऊ द्या. जेव्हा मुले शांत होतात, तेव्हाच त्यांना तुमचे म्हणणे समजते.
