Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रीन टाईम, गोड पदार्थांमुळे वाढतो ADHD चा त्रास? रिसर्चमधून खुलासा- डॉक्टर म्हणतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2025 14:42 IST

Screen time effects: Sugar and ADHD: ADHD symptoms: Kids health : सततच्या स्क्रीन टाइममुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो का?

सध्याच्या डिजिटल युगात मुलांचे जीवन स्क्रीनभोवती गुंडाळले गेले आहे. टीव्ही, मोबाईल, टॅबेलट, गेमिंग या सर्वांचा अतिरेक वापर मुलांच्या मेंदूवर परिणाम करतो.(Mental health) याबाबत पालक कायमच चिंतेत असतात. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलांना फोन हवा असतो. त्यातच मुलांच्या आहारात साखरेचा वापर, पॅकेज्ड स्नॅक्स, चॉकलेट्स, सोडा, केक-डोनट्स यामुळे मेंदूतील हॉर्मोनल गुणोत्तर आणखीनच बिघडतं.(Sugar and ADHD)रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे की मुलांमधील ADHD चे लक्षणं कमी करण्यासाठी फार महागडे उपचार, औषधं किंवा थेरपीची गरज नसते.(ADHD symptoms) फक्त दोन साधे बदल पुरेसे ठरतात. स्क्रीन टाईम कमी करणे आणि साखरेचे सेवन कमी करणे. 

पालकची भजी तेलकट-कडक होतात? सोपी ट्रिक- १० मिनिटांत होतील पालकची कुरकुरीत-खमंग भजी, सोपी रेसिपी

स्टडीनुसार खुलासा करण्यात आला आहे की साखर आणि स्क्रीन टाईम यांचं नातं थेट मुलांच्या मेंदूवर करते. सतत बदलणारे व्हिडीओ, डोळ्यांसमोर बदलणारे रंग, रील्स, गेमिंगचे फास्ट ग्राफिक्स हे सर्व मेंदूला सतत उत्तेजित करत असतात. साखरही मेंदूला तत्काळ ऊर्जा देते पण नंतर अचानक ऊर्जा कमी झाल्याने चिडचिड, अस्वस्थता, एकाग्र न होणे आणि उतावळेपणा वाढतो. ADHD असलेल्या मुलांमध्ये ही समस्या अधिक तीव्र होते.

सावळा गं रंग माझा...! शोभून दिसतात ७ रंगांच्या साड्या, खुलून दिसतो लूक- चेहऱ्यावरही येईल चकाकी

अभ्यासानुसार मुलांचा स्क्रीन टाइम कमी केला आणि साखर ५०–७०% पर्यंत घटवली. फक्त काही आठवड्यांतच जवळपास ५०% मुलांमध्ये मोठी सुधारणा पाहायला मिळाली. एकाग्रता वाढणे, शांत राहाणं, शाळेत लक्ष देणे, भावनिक स्थैर्य वाढलं. तज्ज्ञ सांगतात की पालकांनी मुलांसाठी स्क्रीन टाइम कमी करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.  बाहेर खेळणे, चित्रकला, पझल्स, वाचन, संगीत यामुळे मेंदू नैसर्गिकरित्या विकसित होतो. त्याचवेळी साखर कमी करून फळं, सुका मेवा, नैसर्गिक पेय दिल्यास मुलांची ऊर्जा स्थिर राहते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Screen time, sugar linked to ADHD increase: Research reveals solutions.

Web Summary : Research suggests reducing screen time and sugar intake can significantly improve ADHD symptoms in children. These simple changes boost concentration and emotional stability, promoting natural brain development.
टॅग्स :पालकत्वलहान मुलं