Lokmat Sakhi >Parenting > स्तनपान करताना दूध पिता पिता बाळ झोपून जाते असे तुम्हाला वाटते का? आई हमखास करते ही चूक..

स्तनपान करताना दूध पिता पिता बाळ झोपून जाते असे तुम्हाला वाटते का? आई हमखास करते ही चूक..

Do you think that the baby falls asleep while breastfeeding? Mothers definitely make this mistake : बाळ दूध पिताना झोपते. या मागील कारण जाणून घ्या. आईला माहितीच असले पाहिजे हे कारण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2025 17:11 IST2025-03-23T17:10:20+5:302025-03-23T17:11:50+5:30

Do you think that the baby falls asleep while breastfeeding? Mothers definitely make this mistake : बाळ दूध पिताना झोपते. या मागील कारण जाणून घ्या. आईला माहितीच असले पाहिजे हे कारण.

Do you think that the baby falls asleep while breastfeeding? Mothers definitely make this mistake.. | स्तनपान करताना दूध पिता पिता बाळ झोपून जाते असे तुम्हाला वाटते का? आई हमखास करते ही चूक..

स्तनपान करताना दूध पिता पिता बाळ झोपून जाते असे तुम्हाला वाटते का? आई हमखास करते ही चूक..

नवजात बाळासाठी आईच्या दुधापेक्षा पौष्टिक काहीच नाही. हे सांगण्यासाठी ना आपल्याला कोणत्या तज्ज्ञाची गरज आहे ना कोणत्या क्षास्त्राची. (Do you think that the baby falls asleep while breastfeeding? Mothers definitely make this mistake..)मात्र बाळाला दूध पाजताना कोणती काळजी घ्यायला हवी, बाळाचे पोट कधी भरते अशा विविध गोष्टी समजून घेण्यासाठी तज्ज्ञांचे सल्ले प्रत्येक आईने घ्यायला हवेच. घरच्या वयस्कर व अनुभवी लोकांचेही ऐकायला हवे. ते बाळ व्यक्त होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या वागण्यातून किंवा हलचालींवरूनच बाळाला काय हवे आहे याचा अंदाज बांधावा लागतो. (Do you think that the baby falls asleep while breastfeeding? Mothers definitely make this mistake..)डॉ. सुप्रिया पुराणिक या गेले २० वर्ष स्रीतज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी प्रत्येक महिलेने लक्षात ठेवणं गरजेचे आहे.  

१.बरेचदा दूध पित असतानाच बाळाला झोप लागून जाते. आपल्याला असे वाटते की झोपले म्हणजे पोट भरलं. पण हा गैरसमज बऱ्याच महिलांमध्ये आहे. ते झोपले म्हणजे त्याचे पोट भरले असे होत नाही. तज्ज्ञ सांगतात, दूध पिताना बाळ झोपते कारण ते दमते. दूध पिण्याची साधी क्रियाही त्याच्यासाठी फार कष्टायचे काम असते. पुन्हा ताकद आल्यावर ते दूध पिणे सुरू करते. त्यामुळे असे दूध पिताना बाळ झोपले की फिडींग थांबवू नका ते उपाशी राहील. तसेच बाळ झोपल्यावर आईला वाटते की दूध संपले आहे. म्हणून ती बाळाला दूसर्‍या बाजूला वळवते. मात्र दूध संपल्याचा संकेत फक्त हाच असतो की बाळ तोंड वळवते.      

२. बाळाने दूध प्यायला सुरवात केल्यावर जरा पातळ दूध येते. त्यामध्ये प्रोटीन असतात मात्र हेल्दी फॅट्स नसतात. त्याला फोरमिल्क असे म्हटले जाते. ते फोरमिल्क संपल्यावर जरा घट्ट असे दूध बाळाला मिळते ज्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात. त्याला हाईंडमिल्क म्हणतात. ते बाळासाठी फार गरजेचे असते. ते प्यायल्याशिवाय बाळाला समाधान मिळत नाही. म्हणून दूध प्यायल्यानंतरही बाळ रडते.

३. बाळाचे एकदा दूध पिऊन झाले की पुढच्या फेरीमध्ये बराच वेळ जातो. परत जेव्हा बाळाला पाजायला घ्याल तेव्हा त्याला दुसऱ्या बाजूचे दूध पाजा पहिल्यांदा जी बाजू वापरली होती तिचे नको.   

Web Title: Do you think that the baby falls asleep while breastfeeding? Mothers definitely make this mistake..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.