Join us

मुलं शाळेत जाताना रडतात-घाबरतात? ५ गोष्टी करा, मुलं रोज आनंदानं जातील शाळेत-छान रमतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 18:31 IST

how to make kids love school : tips for happy school mornings: शाळा सुरु झाल्या तरीसुद्धा मुलांची मानसिक तयारी नाही. पालकांनी काय करायला हवं? मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी कम्फर्टेबल कसं कराल?

आई माझं आज डोकं दुखतंय, पोटात दुखतंय.. बघ मला ताप आलाय का? मला शाळेत नाही जायचं, बरं वाटत नाही.. असे अनेक तऱ्हेची उत्तर शाळेत जाताना मुलांकडे तयार असतात. (kids school anxiety tips) शाळा सुरु होऊन आठवडा-दोन आठवडे झाले असतील. पण मुलांच्या शाळेत जाण्याच्या तक्रारी काही संपत नाही. (how to stop school fear in children)त्यात मुलांची शाळा सकाळची असेल तर मुलांसह पालकांची देखील तारेवरची कसरतच. अगदी सकाळी उठवण्यापासून त्यांना तयार करताना, त्यांच आवरेपर्यंत अक्षरश: वैताग येतो.(how to prepare kids for school)  मुलांचा डबा, नाश्ता त्यांना शाळेत ने- आण करणे हा देखील पालकांसाठी वेगळ्याच प्रकारचा अनुभव असतो. पण अनेकदा मुले शाळेत जाताना रडतात, घाबरतात.(tips for happy school mornings)  त्यामुळे पालक त्यांना ओरडून, रागवून किंवा बळजबरीने शाळेत घेऊन जातात. मुलांची इच्छा नसताना देखील शाळेत त्यांना जावे लागतं पण शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या मनाच्या तयारीकडे आपण लक्ष देत नाही. (child school separation anxiety)आपलं मुलं शाळेत रमेल का? त्याला काही त्रास होणार नाही ना, त्याला शिकवलेले समजेल ना, डबा तर नीट खाईल का वैगरे प्रश्न पालकांना पडले असतीलच. (helping kids adjust to school life)

मोबाइल दाखवला नाही तर मुले जेवतच नाहीत? ३ सोपे उपाय लवकर करा, नाहीतर पस्तावाल-तज्ज्ञ म्हणतात...

मुलं लहान असतील आणि पहिल्यांदाच शाळेत जात असतील तर त्यांच्या तक्रारी किंवा इच्छा नाही म्हणून आपण समजून घेऊ शकतो. पण सात-आठ वर्षांची मुले शाळेत जाण्यास रडत असतील तर पालकांनी काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.  त्यांच्या अस्वस्थते मागचे नेमकं कारण काय? मुलांना शाळेत सोडताना रडणं, पालकांचा     हात घट्ट धरुन ठेवणं, खूप भावनिक होणं असं अनेकदा होत पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास मुले हसत-खेळत आनंदाने शाळेत जातील. 

मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी कम्फर्टेबल कसं कराल? 

1. मुलांच्या दिवसभराचा दिनक्रम ठरवा. शाळा जर सकाळची असेल आणि मुलांची झोप मोड झाली असेल तर ते अधिक चिडचिड करतात. त्यासाठी मुलांना दिवसभरात काय करता येईल हे ठरवा. त्याच्या खाण्यापिण्याचा, अभ्यासाचा, खेळण्याचा आणि स्क्रिन टाइमचा वेळ सेट करा. त्यांच्यासोबत खेळा किंवा संवाद साधा. 

2. मुलासमोर नेहमी शाळेबद्दल चांगल्या गोष्टी बोला. शाळेविषयीची गोडी कशी लावता येईल यावर लक्ष द्या. नवीन मित्र बनवायला मिळतील, मनोरंजक गोष्टी शिकायला मिळतील किंवा खेळायला नवीन मित्र-मैत्रिणी मिळतील असं समजावून सांगा. आपल्या बालपणीच्या मजेदार गोष्टी सांगा. ज्यामुळे त्यांना शाळेत जाण्याची उत्सुकता लागेल. 

3. मुलांना शाळेच्या उपक्रमांमध्ये सहभागी करा. उदा. शाळेतून घरी आल्यानंतर आज काय शिकवले, नवीन कोणती गोष्ट शिकलात याविषयी विचारा. त्यांच्या नवीन मित्र-मैत्रिणींबद्दल विचारा. आज कोणता खेळ खेळलात याविषयी देखील विचारु शकता. त्यांना शाळेची बॅग भरण्यात किंवा टिफिन भरण्यास देथील सांगू शकता. 

4. जर आपले मूल सतत शाळेत जाण्यास नकार देत असेल तर त्यांच्या शिक्षकांशी बोला. त्यांना क्लासमध्ये कोणत्या अडचणी येत आहेत का हे चेक करा. त्यांचा वर्गमित्र त्रास देत असेल किंवा चिडवत असेल. एखादा विषय मुलांना समजत नसेल तर ते शाळेत जाण्यास नाटक करतात. अशावेळी शिक्षकांशी बोलणे महत्त्वाचे ठरेल. 

5. मुलांशी प्रेमाने आणि धीराने वागा. त्यांना शाळेत का जायचे नाही, त्यांना नेमका कोणता त्रास होत आहे हे समजून घ्या. मुलांना नवीन वातावरणाशी आणि तिथल्या लोकांशी मिसळण्यात वेळ लागतो. त्यांची वारंवार प्रशंसा करा. त्यांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन द्या. यामुळे मुले शाळेत जाण्यास तयार होतील.   

टॅग्स :पालकत्वलहान मुलं