Lokmat Sakhi >Parenting > यंदाच्या सुट्टीत मुलांचे अक्षर होईल वळणदार, सोप्या टिप्स, आठवड्याभरात सुधारेल हस्ताक्षर

यंदाच्या सुट्टीत मुलांचे अक्षर होईल वळणदार, सोप्या टिप्स, आठवड्याभरात सुधारेल हस्ताक्षर

improve children's handwriting: cursive writing for kids: handwriting improvement tips: how to teach cursive writing to kids: आपल्यालाही मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार हवे असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 13:28 IST2025-04-22T13:28:17+5:302025-04-22T13:28:50+5:30

improve children's handwriting: cursive writing for kids: handwriting improvement tips: how to teach cursive writing to kids: आपल्यालाही मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार हवे असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

Children's handwriting will become more cursive this holiday simple tips handwriting will improve within a week | यंदाच्या सुट्टीत मुलांचे अक्षर होईल वळणदार, सोप्या टिप्स, आठवड्याभरात सुधारेल हस्ताक्षर

यंदाच्या सुट्टीत मुलांचे अक्षर होईल वळणदार, सोप्या टिप्स, आठवड्याभरात सुधारेल हस्ताक्षर

सुंदर अक्षर हाच खरा दागिना...! असं आपण नेहमीच म्हणतो. परंतु वाढत्या तंत्रज्ञानानुसार ही अक्षरे कुठे तरी लोप पावत चालली आहे.(improve children's handwriting) स्क्रीन स्क्रोल करण्याच्या नादात आपण लिखाणाकडे फारशा प्रमाणात लक्ष देत नाही. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत.(cursive writing for kids) यावेळी मुले उन्हात खेळतात. शाळेला सुट्ट्या असल्यामुळे निदान पुढील दीड-दोन महिने तरी मुलांना अभ्यासाचे टेन्शन नाही.(handwriting improvement tips) मुलांचा अभ्यास तोंडपाठ असतो परंतु, घाणेरड्या अक्षरामुळे त्यांनी नेमके काय लिहिले हे समजत नाही. त्यामुळे पेपर कितीही छान गेला असला तरी मार्क्स कमी मिळतात. (how to teach cursive writing to kids)
मुलांच्या अक्षरावरुन आपल्या अनेकदा ऐकावे लागते.(improve cursive writing at home) अशावेळी पालक मुलांवर अक्षर वळणदार येण्यासाठी दबाव आणतात. परंतु, अक्षर सुधारण्यासाठी नियमित सराव आणि संयम आवश्यक असतो.(holiday handwriting activities) जर आपल्यालाही मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार हवे असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. 

दिवसभर झोपूनही बाळ रात्री रडरड-किरकिर करते? नव्या आईसाठी डॉक्टरांचा खास सल्ला...

सगळ्यात आधी मुले पेनाने लिहितात की, पेन्सिलने हे पाहा. त्यांना पेन्सिल किंवा पेन हातात देऊन त्यांच्याकडून १ ते १०० पर्यंत आकडे लिहून घ्या. मुले यावेळी लिहिताना चिडचिड करतील. त्यांच्या बोटांचे स्नायू दुखू लागतील. सुंदर अक्षरासाठी तीन गोष्टी नेहमी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे पहिले बोटाने लिहिणे, मेंदूकडून आज्ञा येणे आणि तिसरी गोष्ट या दोघांमधील समन्वय. जेव्हा आपल्या मेंदू या सगळ्या गोष्टी आत्मसात करतो तेव्हा आपल्या अक्षरांमध्ये फरक पाहायला मिळतो. हस्ताक्षर सुधारण्यासाठी काय करायला हवे पाहूया. 

">

1. मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी त्यांच्या बोटाची पकड मजबूत करा. त्यांच्या मेंदूची शक्ती वाढवा. 

2. आपण मुलांनी क्लेची माती खेळायला देऊ शकता. यामुळे त्यांच्या हाताची पकड घट्ट होते आणि ते चांगल्या प्रकारे लिहू शकतात. 

3. डाळ आणि तांदूळ एकत्र करुन मुलांना ते वेगळे करायला सांगा. यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते आणि बोटांच्या स्नायूंनाही बळकटी मिळते. 

4. मुले मातीने खेळून घर घाण करतात असे अनेकदा पालकांना वाटते परंतु, यामुळे त्यांची बोटावरील पकड सुधारते. स्नायू मजबूत होतात आणि मेंदू देखील योग्यरित्या कार्य करते. 

5. मुलांना चित्र रंगवायला सांगा यामुळे त्यांच्या बोटाची पकड मजबूत होते. तसेच वाद्यांची आवड निर्माण करा. वाद्यांमुळे त्यांच्या बोटांची क्षमता अधिक सुधारते. मुले हार्मोनियम किंवा तबला वाजवत असतील तर मेंदू त्यांच्या बोटांना आज्ञा देतो. ज्यामुळे बोटांचे स्नायू देखील बळकट होते. 

6. जेव्हा मुले लिखाणाचा सराव करतात तेव्हा त्यांची पकड मजबूत करण्यासाठी स्पंज किंवा स्मायली बॉल त्यांच्या हातात देऊ शकतात. यामुळे सतत लिहून हात दुखणार नाही. 

7. पालकांनी यंदाच्या सु्ट्टीच असे आठवडाभर केले तरी मुलांचे हस्ताक्षर सुंदर होण्यास मदत होईल.  
 

Web Title: Children's handwriting will become more cursive this holiday simple tips handwriting will improve within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.