>पालकत्व > ऑनलाइन अभ्यासाला बसलेली मुलं ‘ढ’ गोळे व्हायला लागलेत? त्यांच्या आहारात हव्याच ४ गोष्ट

ऑनलाइन अभ्यासाला बसलेली मुलं ‘ढ’ गोळे व्हायला लागलेत? त्यांच्या आहारात हव्याच ४ गोष्ट

कम्प्युटरसमोर तासनतास ऑनलाइन बसल्याने क्षमता असूनही मुलांचा अभ्यासातला रस, एकाग्रता कमी झाल्याचे दिसते. घरात सतत स्क्रीनसमोर बसलेल्या मुलांच्या आहाराकडेही त्यासाठी बारकाईने लक्ष द्यायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 08:12 PM2022-01-14T20:12:26+5:302022-01-15T13:27:04+5:30

कम्प्युटरसमोर तासनतास ऑनलाइन बसल्याने क्षमता असूनही मुलांचा अभ्यासातला रस, एकाग्रता कमी झाल्याचे दिसते. घरात सतत स्क्रीनसमोर बसलेल्या मुलांच्या आहाराकडेही त्यासाठी बारकाईने लक्ष द्यायला हवे.

Children are too lazy to online study ; These 4 things should be in the diet of children. Even in online study, children will be bright | ऑनलाइन अभ्यासाला बसलेली मुलं ‘ढ’ गोळे व्हायला लागलेत? त्यांच्या आहारात हव्याच ४ गोष्ट

ऑनलाइन अभ्यासाला बसलेली मुलं ‘ढ’ गोळे व्हायला लागलेत? त्यांच्या आहारात हव्याच ४ गोष्ट

Next
Highlightsमुलांना रोज 3-4 आक्रोड रोज खायला द्यावेत.मुलांच्या सकाळच्या पहिल्या आहारात १ चमचा साजूक तूप हवंच.मुलांच्या मेंदूविकासासाठी आहारात नियमित हिरव्या भाज्या असायलाच हव्यात. 

कोरोनाकाळात मुलांनी गेले दीड वर्ष ऑनलाइन अभ्यास केला. आता मात्र ते ऑनलाइन शिक्षणाला कंटाळले आहेत. त्या शाळा सुरु झाल्या म्हणता म्हणता पुन्हा बंद झाल्या, पुन्हा मुलं स्क्रिनसमोर ऑनलाइन बसून लागली.  
मुलांचं अभ्यासातलं लक्ष उडालंय, त्यांची एका जागी बसून लिहिण्यावाचण्याची सवय मोडलीये, अभ्यासातील एकाग्रता कमी तर झालीच शिवाय स्मरणशक्तीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत. याबाबतीत शक्षणक्षेत्रातले तज्ज्ञ मात्र केवळ शाळा आणि विद्यार्थी यांना दोष न देता काही उपाय पालकांनी आपल्या स्तरावर करण्याचेही सुचवत आहेत.

Image: Google

ऑनलाइन अभ्यासाच्या बाबतीत मुलांना ओरडून, रागवून त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढणार नाही. स्मरणशक्ती ही एक प्रक्रिया आहे. त्यावर ऑनलाइन अभ्यासाचा थोडा परिणाम झाला असेल. पण म्हणून मुलांची स्मरणशक्ती कायमची कमी झाली असं नाही. अभ्यासातली एकाग्रता वाढली तर त्याचा परिणाम स्मरणशक्तीवरही होतो. त्यासाठी मुलांना केवळ अभ्यास, पुस्तकं, इतर शालेय साधनं, औषधं किंवा कोणत्या ॲपसदृश्य साधनांची गरज नाही.  यासाठी त्यांच्या आहारात जाणीवपूर्वक काही गोष्टींचा समावेश केल्यास त्याचा मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होईल शिवाय अभ्यासातील, वाचन -लेखनातील गोडीही वाढेल. यासाठी आहारातील ४ घटक खूप मदत करतात. 

Image: Google

1. अक्रोड

अक्रोडमधे ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. हे फॅटी ॲसिड मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचं मानलं जातं. मुलांना नियमित 2-3 अक्रोड खायला दिल्यास त्यांचा मेंदू चांगल्या गतीने  काम करतो. तसेच अक्रोडाचा उपयोग स्मरणशक्ती वाढण्यासाठीही होतो. 

Image: Google

2. हिरव्या पालेभाज्या

हिरव्या भाज्यांमुळे, पालेभाज्यांमुळे स्मरणशक्ती वाढते. हिरव्या भाज्यांमधे के जीवनसत्त्वं, ल्यूटिन, प्रथिनं, फोलेट आणि केरोटीन हे घटक भरपूर प्रमाणात असतात.  हे घटक मेंदुच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. मुलांच्या रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या, पालेभाज्या यांचा समावेश करायलाच हवा. जर मुलांना भाजीच्या स्वरुपात या भाज्या आवडत नसतील तर त्यांना आवडेल त्या सॅण्डविच, थालीपिठ, डोसे या स्वरुपात त्याचा आहारात समावेश करावा. 

Image: Google

3. साजूक तूप

लहान मुलं साजूक तूप खाण्याच्या बाबतीत खूप नाटकं करतात. पण पोषण तज्ज्ञ सांगतात, की सकाळी मुलांच्या पहिल्या आहारात १ चमचा साजूक तूप असायलाच हवं. तुपामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते. 

Image: Google

4.  चिया सीड्स

वेटलाॅसच्या बाबतीत चिया सीडस खूप महत्त्वाच्या आहेत. चिया सीड्समधे ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. ॲण्टिऑक्सिडण्टस मेंदुच्या विकासासाठी फायदेशीर असतात.  जर रोज एक चमचा चिया सीड्स रात्री पाण्यात भिजावाव्यात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना हे पाणी पिण्यास दिलं तर त्याचा फायदा अभ्यास, वाचन यातील एकाग्रतेवर आणि स्मरणशक्ती वाढण्यावर होतो. 

Web Title: Children are too lazy to online study ; These 4 things should be in the diet of children. Even in online study, children will be bright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

नेहमीच तरूण, उत्साही रहायचंय ना? मग हे ४ पदार्थ तुमच्या आहारात असायलाच हवेत  - Marathi News | Must have these 4 food items in your diet to rejuvenate your skin, secret for glowing skin  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच तरूण, उत्साही रहायचंय ना? मग हे ४ पदार्थ तुमच्या आहारात असायलाच हवेत 

Beauty tips: आपल्या सभोवती असणाऱ्या काही जणांच्या चेहऱ्यावर नेहमीच ग्लो दिसून येतो. चेहऱ्यावरची चमक कायम राहण्यासाठी ही मंडळी नेमकं काय करतात, असा प्रश्न पडला असेल तर हे घ्या त्याचं उत्तर... ...

थंडीत गरम चहासोबत करा नारळाची कुरकुरीत भजी! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल.. - Marathi News | How to make coconut Pakora: Lips smacking crispy coconut pakora with cold hot tea! If you eat once, you will do it again. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत गरम चहासोबत करा नारळाची कुरकुरीत भजी! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल..

How to make coconut Pakora: हिवाळ्यात संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून एकदा नारळाची भजी करा आणि खा, आपलं आपल्यालाच कौतुक वाटेल, की किती छान चवीची भजी केलीत आपण आणि भजींचा नवा पर्याय मिळाल्यानं आनंद तर होईलच! ...

गाजर मुळ्याचं चटपटीत लोणचं; तोंडाला चव आणते, तब्येतीला 4 फायदे - Marathi News | How to Make Carrot Radish Pickle: carrot radish pickle brings taste to the mouth and gives 4 health benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गाजर मुळ्याचं चटपटीत लोणचं; तोंडाला चव आणते, तब्येतीला 4 फायदे

How to Make Carrot Radish Pickle: लोणचं फक्त चवीसाठी नाही तर तब्येत जपण्यासाठीही खावं. आरोग्यदायी लोणच्यांमध्ये गाजर मुळ्याचं एकत्रित लोणचं खाण्याला महत्त्वं आहे. झटपट होणारं हे लोणचं रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि बिघडलेली पचनक्रियाही सुधारतं. ...

आवळा पावडर विकत आणता? घरच्याघरी 3 पध्दतीने करा आवळ्याची शुध्द पावडर... आवळा पावडरचे 4 फायदे - Marathi News | Make pure amla powder at home in 3 ways ... 4 benefits of homemade pure amla powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवळा पावडर विकत आणता? घरच्याघरी 3 पध्दतीने करा आवळ्याची शुध्द पावडर... आवळा पावडरचे 4 फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरचे उपाय अतिशय फायदेशीर ठरतात. शिवाय एका गोष्टीचा उपयोग अनेक आरोग्य समस्यांवर होतो. अशा अनेक फायदेशीर घरगुती गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळा पावडर. आवळा पावडर ही बाहेर विकत मिळत असली तरी त्यात भेसळीची शक्यता ...

चार वाजता चहासोबत काय खावं असा प्रश्न पडलाय ? हे घ्या ४ पर्याय - Marathi News | The question is what to eat with tea at four o'clock after lunch? Here are 4 options | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चार वाजता चहासोबत काय खावं असा प्रश्न पडलाय ? हे घ्या ४ पर्याय

थंडीच्या दिवसांत भूक तर लागतेच पण पोटभरीचे, पौष्टीक असे काय पर्याय असू शकतात याविषयी... ...

मलायका अरोराने बनवलेल्या तिळाच्या चिक्कीची चर्चा! ती म्हणते, पौष्टिक चिक्की खा आणि.. - Marathi News | Malaika Arora says, Sesame Chikki is healthy option for evening snaks. It gives nutrition and happiness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोराने बनवलेल्या तिळाच्या चिक्कीची चर्चा! ती म्हणते, पौष्टिक चिक्की खा आणि..

आपल्या फिटनेसबाबत अतिशय जागरुक असणारी मलायका संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आपले डाएट नियम मोडणार नाही असे पण चविष्ट पदार्थ निवडते. मलायका आपल्या आहारात ताज्या भाज्या, ताजी फळं यांना महत्त्व देते शिवाय काही पदार्थ विशिष्ट वेळी खाल्ले तर ते पोषक ठरतात याची ...