बदलत्या वातावरणात मुलांची काळजी घेणं त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं अशी बरीच आव्हानं पालकांसमोर येतात. पावसाळ्याच्या दिवसांत सर्दी-खोकल्यानं नाक बंद होणं खूपच सामान्य आहे. सर्दीनं मुलांचं नाक बंद होतं तेव्हा त्यांना व्यवस्थित श्वासही घेता येत नाही त्यामुळे मुलांना झोपही नीट येत नाही. (Remedy To Treat Cold Naturally Cough Blocked Nose Home Remedies)
तुमच्याही मुलांना अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतील तर हे आर्टिकल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंगने आपल्या युट्यूब पॉडकास्टमध्ये एक सोपा आणि घरगुती उपाय सांगितला आहे. हे उपाय करून मुलांना त्वरीत आराम मिळू शकतो. (Bharti Singh Remedy To Treat Cold Naturally)
परिणामकारक उपाय
भारती सिंहने सांगितले की तिच्या मुलाचे नाक बंद झाल्यानंतर ती हा घरगुती उपाय करते. यामुळे त्वरीत आराम मिळतो. यासाठी जास्त वस्तूंची तुम्हाला आवश्यकता नाही. २ पदार्थांची पोटली बनवू शकता.
पोटली कशी तयार करावी?
यासाठी सगळ्यात आधी एक तवा हलका गरम करा. त्यांनतर एक चमचा ओवा आणि ५ ते ७ लवंग घालून व्यवस्थित भाजून घ्या. जास्त जळणार नाही याची काळजी घ्या. हलका वास येईपर्यंत भाजा. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर एका स्वच्छ रूमालात बांधून पोटली तयार करा. तुम्ही यात लसूणसुद्धा घालू शकता.
ही पोटली लहान मुलं जिथे झोपताना तिथे ठेवा. याची हलकी उष्णता आणि सुगंध मुलांसाठी आरामदायक ठरेल. ओवा आणि लवंग यात प्राकृतिक एंटीबॅक्टेरियल आणि एंटी व्हायरल गुण असतात. ज्यामुळे नाक मोकळं होण्यास आणि श्वास घेण्यास मदत होते. याशिवाय मुलांच्या छातीत जमा झालेला कफ हळूहळू पातळ होतो ज्यामुळे सर्दीपासूनही आराम मिळतो.