लहान मुलांचे आरोग्य आणि त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घेताना पालकांची मोठी कसरत होते. घरातील लहान मुलांच्या आरोग्याची तसेच इतर गोष्टींची काळजी घेणे ही पालकांची सगळ्यांत मोठी जबाबदारी असते. बरेचदा लहान मुलांची ढोपरं आणि हातांचे कोपरं काळे पडतात, अशी समस्या कित्येक पालकांना सतावते. मुलांचे ढोपरं आणि कोपरं काळे (best ubtan for kids knee & elbows whitening) पडल्याने त्यांच्या संपूर्ण शरीराचा रंग वेगळा आणि तेवढ्या भागांचा रंग वेगळा असे पटकन दिसून येते. लहान मुलं काहीवेळा खेळता खेळता पडतात, त्यामुळे त्यांच्या हातापायाला दुखापत होऊन जखम होते. ही जखम (natural ways to lighten dark knees in children follow these steps) बरी झाल्यानंतर याच्या खुणा काहीवेळा तशाच राहतात. एवढंच नाही तर काळे डाग देखील पडतात, यामुळे देखील मुलांची ढोपरं आणि कोपरं काळे पडतात. अशावेळी पालक ढोपरं आणि कोपरं यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी अनेक क्रिम्स, लोशन मुलांना दररोज चोपडतात(Simple Tips To Get Rid Of Dark Knees And Elbows In Kids).
एवढचं नाही तर, ढोपरं आणि कोपरं यांवर धूळ आणि घाण जमा होते आणि कोरडेपणामुळे तेथे काळेपणा आणि डाग दिसतात. साबण किंवा क्रीम लावूनही हे काळेकुट्ट डाग जात नाहीत. परंतु याने काहीच फरक पडत नाही. अशावेळी मुलांच्या ढोपरं आणि कोपरं यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय करणे अधिक फायदेशीर ठरते. या घरगुती नैसर्गिक उपायांमुळे मुलांच्या नाजूक त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होण्याची देखील शक्यता नसते. याउलट, अशा नैसर्गिक उपायांमुळे काळपटपणा दूर होऊन मुलांच्या त्वचेची विशेष निगा राखली जाते. यासाठीच मुलांचे ढोपरं आणि कोपरं यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी कोणते नैसर्गिक आणि घरगुती उपाय फायदेशीर आहेत याबद्दल mummalearns या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ३ सोपे उपाय (Home Remedy to Get Rid Of Dark Elbows & Knees in kids) शेअर करण्यात आले आहेत. हे उपाय नेमके कोणते ते पाहूयात.
मुलांचे ढोपरं आणि कोपरं यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी...
१. दही आणि हळद :- त्वचेसाठी दही आणि हळदीचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. दही, हळद यांचे एकत्रित मिश्रण त्वेचसाठी फारच फायदेशीर ठरते. त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी दही आणि हळद वापरणे सर्वोत्तम मानले जाते. हळद त्वचेचे रंगद्रव्य कमी करते, तर दही सौम्य एक्सफोलिएशन करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी करुन त्वचा मऊमुलायम करण्यास अधिक मदत मिळते. दही आणि हळद हे दोन्ही समान प्रमाणात मिसळा आणि ते एकत्रित कालवून त्याची पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट त्वचेवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा. आठवड्यातून १ ते २ वेळा हा उपाय केल्यास ढोपरं आणि कोपरं यांचा काळपटपणा कमी होतो.
डॉक्टर सांगतात, परीक्षेच्या काळात मुलांना काय खायला द्यावे, काय अजिबात देऊ नये? स्ट्रेस नको तर...
२. एलोवेरा जेल :- मुलांचे ढोपरं आणि कोपरं यांचा काळपटपणा कमी करण्यासाठी आपण एलोवेरा जेलचा वापर करु शकता. एलोवेरा जेल हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे मुलांचे ढोपरं आणि कोपरं यांचा काळपटपणा तसेच कोरडेपणा दूर करते, त्याचबरोबर त्वचेचा रंग एकसमान करण्यास मदत करते. जितका भाग काळपट झाला आहे त्या भागांवर दररोज १० ते १५ मिनिटे एलोवेरा जेल लावा आणि नंतर धुवा, तुम्हाला काही दिवसांतच फरक स्पष्टपणे दिसून येईल.
आराध्याची उंची छान वाढावी म्हणून आई ऐश्वर्या राय घेतेय तिच्या डाएटची काळजी, देते ५ पदार्थ...
३. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस :- खोबरेल तेल त्वचेला खोलवर पोषण देते, तर लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. यासाठी एका बाऊलमध्ये प्रत्येकी २ टेबलस्पून खोबरेल तेल आणि लिंबाचा रस एकत्रित करून मिसळून घ्यावा. त्यानंतर ते तयार मिश्रण काळपट भागांवर लावून हलक्या हातांनी मालिश करून घ्यावी, यामुळे हळूहळू त्वचेचा काळपटपणा दूर होऊन त्वचेचा रंग उजळेल आणि त्वचा मऊमुलायम होण्यास मदत मिळेल.
स्तनपान करणाऱ्या आईने अल्कोहोल प्यावे का? राधिका आपटेचा फोटो पाहून पडलेला व्हायरल प्रश्न...
वरील सर्व घरगुती नैसर्गिक उपाय फायदेशीर आहेत. यामुळे बाळाची त्वचा पुन्हा स्वच्छ, मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी हे सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी उपाय आहेत.
या गोष्टी लक्षात ठेवा:- हे उपाय केल्यानंतर लगेचच मुलांना सूर्यप्रकाशात जाऊ देऊ नका. त्वचेवर थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नका. यासाठी शक्यतो हे उपाय संध्याकाळनंतरच करा. हे उपाय केल्याने मुलांना जर कोणतीही जळजळ किंवा पुरळ येत असेल तर ताबडतोब हे उपाय करणे थांबवा.