नवजात बाळाचं आरोग्य जपताना आई - वडिलांकडून केले जाणारे छोटे छोटे उपायही बाळासाठी खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरतात. नवजात बाळाचे आरोग्य जपण्यासाठी अनेक पारंपरिक पद्धती आजही अत्यंत उपयुक्त मानल्या जातात आणि त्यापैकीच एक आहे बाळाला कोवळ्या उन्हात ठेवणे. आपल्याकडे लहान बाळाला सकाळी लवकर कोवळ्या उन्हात ठेवण्याची पद्धत पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. व्हिटॅमिन 'डी' मिळण्यासाठी आणि हाडांची वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी हा उपाय अनेकजण करून पाहतात. मात्र, बाळ अगदी लहान असल्यामुळे किती वेळ, कधी, आणि कसं उन्हात ठेवावं याबाबत अनेक पालक गोंधळतात. जरा जास्त वेळ ठेवलं तर त्वचेला त्रास होऊ शकतो आणि कमी वेळ ठेवलं तर त्याचा फायदा मिळत नाही(what time is sunlight good for babies how long can we keep a baby in sunlight know from pediatrician).
बरेचदा नव्याने पालक झालेल्या आई - वडिलांना असा प्रश्न पडतो की, बाळाला नेमके किती वेळ उन्हात ठेवावे? यासाठी सकाळचे कोवळे ऊन चांगले आहे की, दुपारच्या वेळी बाळाला थोडा वेळ उन्हात घेऊन बसावे? अशा अनेक प्रश्नांचा गोंधळ उडतो. याबद्दल, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. निमिशा अरोरा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बालरोगतज्ज्ञांनी या संदर्भात माहिती दिली आहे. नवजात बाळाला कोवळ्या उन्हात नेमकं किती वेळ ठेवावं आणि त्यासाठी कोणती (how long to keep baby in sunlight) काळजी घेणं गरजेचं आहे, ते पाहूयात...
बालरोगतज्ज्ञ नेमकं याविषयी काय सांगतात ?
अनेक नवजात बाळांचे पालक असे मानतात की, बाळाला ऊन दाखवल्याने त्याला कावीळ होत नाही; तर काही पालक व्हिटॅमिन 'डी' मिळण्यासाठी बाळाला उन्हात बसवणे आवश्यक मानतात. याउलट, डॉक्टर सांगतात की, हे दोन्ही समज पूर्णपणे चुकीचे आहेत. डॉक्टर निमिशा यांच्या मते, जुन्या काळात बाळाला रोज ऊन दाखवावे असे मानले जात होते. पण, आज वैद्यकीय विज्ञानातील स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आहेत, जी यापेक्षा पूर्णपणे वेगळा सल्ला देतात.
अमेरिकन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) च्या नवीन अहवालानुसार, ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांना उन्हाची गरज नसते आणि त्यांना थेट उन्हात मुळीच ठेवू नये.
अमेरिकन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) नुसार, नवजात बाळाची त्वचा अतिशय नाजूक असते, त्यामुळे थेट सूर्यप्रकाश त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते. बाळाला उन्हात ठेवल्यास त्याला सनबर्न होऊ शकतो. तीव्र उन्हाच्या झळा बाळाला डिहायड्रेट करू शकते. इतकेच नाही, तर दीर्घकाळ अतिनील किरणे (UV rays) बाळाच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात आणि भविष्यात त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे, ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांना शक्य होईल तितके थेट उन्हापासून दूर ठेवावे.
PCOS असताना वेटलॉस करणे होते कठीण! करा फक्त ५ बदल - वजन उतरेल झरझर...
जावित्रीचा चहा तुम्हाला थंडीतही ठेवतो सुपरफिट! चहा ‘असा’ करा आणि हिवाळ्यात लांब ठेवा सगळेच आजार...
उन्हापासून बाळाचे संरक्षण करण्यासाठी 'या' गोष्टींची काळजी घ्या...
एएपी (AAP) च्या अहवालात पुढे म्हटले आहे की, जर तुम्हाला काही कारणास्तव बाळाला घेऊन घराबाहेर उन्हांत जावे लागले आणि उन्हापासून बचाव करणे कठीण झाले, तर काही सुरक्षित उपाय करणे आवश्यक आहे.
१. बाळाला हलके, लूज आणि संपूर्ण शरीर झाकणारे कॉटनचे कपडे घाला.
२. बाळाला प्रखर सूर्यप्रकाशात न ठेवता, नेहमी सावलीत ठेवा.
३. बाळाला रुंद कडा असलेली टोपी घाला, ज्यामुळे बाळाचा चेहरा आणि मान झाकलेली राहील.
४. बाळाच्या चेहऱ्यावर किंवा हातांवर लहान मुलांसाठी सुरक्षित असलेली सनस्क्रीन क्रीम देखील लावली जाऊ शकते.
मग बाळाला व्हिटॅमिन 'डी' कसे मिळेल?
जर बाळाच्या शरीरात व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता असेल, तर डॉक्टर त्याच्या वयानुसार व्हिटॅमिन 'डी' चे ड्रॉप्स देऊ शकतात. डॉ. निमिशा यांच्या मते, व्हिटॅमिन 'डी' मिळवण्याचा हा मार्ग उन्हात ठेवण्यापेक्षा जास्त सुरक्षित आणि अधिक असरदार आणि फायदेशीर आहे.
Web Summary : Newborns under six months should avoid direct sunlight due to sensitive skin. Pediatricians recommend protective clothing and shade instead. Vitamin D drops are a safer alternative to sun exposure for infants.
Web Summary : छह महीने से कम उम्र के नवजात शिशुओं को संवेदनशील त्वचा के कारण सीधी धूप से बचना चाहिए। बाल रोग विशेषज्ञ सुरक्षात्मक कपड़े और छाया की सलाह देते हैं। शिशुओं के लिए धूप में निकलने की तुलना में विटामिन डी ड्रॉप्स एक सुरक्षित विकल्प है।