मुलं लहान असेपर्यंत अंथरुणात लघवी करणं ही एक फारच कॉमन गोष्ट आहे. परंतु याउलट जर मुलांनी वयाची ३ ते ४ वर्षे ओलांडली तरी रात्री झोपेत अंथरुणात लघवी करण्याची (Bedwetting) सवय सुटत नसेल, तर पालकांसाठी ही केवळ चिंतेचीच नाही, तर अनेकदा संकोच वाटणारी बाब ठरते. पाहुण्यांकडे किंवा प्रवासात असताना या समस्येमुळे पालक आणि मुले दोघांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ठराविक वयानंतरही ही सवय कायम राहिली, तर पालकांना काळजी वाटू लागते आणि मुलांनाही नकळत संकोच किंवा आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटू शकते(natural remedy for bed wetting in children).
मुलांचे वय वाढले तरी ही सवय सुटत नसेल, तर आपण अनेक प्रकारचे उपाय करून पाहतो...परंतु अंथरुणात लघवी करण्याची ही सवय अनेक वेळा गंभीर आजारामुळे नसून शरीराची सवय, झोपेची पद्धत किंवा काही पोषणतत्वांच्या कमतरतेमुळेही उद्भवू शकते. मुलांच्या या समस्येवर उपाय म्हणून स्वयंपाकघरात उपलब्ध असलेला एक साधा पदार्थ या समस्येला मुळापासून दूर करू शकतो. वर्षानुवर्षे चालत आलेले जुने घरगुती उपाय केवळ मुलांची प्रतिकारशक्तीच वाढवत नाहीत, तर त्यांच्या यूरिन कंट्रोलमध्ये सुधारणा घडवून आणतात. नॅचरोपॅथी फिजिशियन डॉ. नवनीत कौर भाटिया यांनी एका (bed wetting home remedy for kids) संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत मुलांच्या या अंथरुणात लघवी करण्याच्या समस्येवर पारंपरिक उपाय सांगितला आहे. त्यांनी सांगितलेला हा उपाय अगदी नॅचरल, पारंपरिक आणि अगदी सहज घरच्याघरीच कधीही करता येण्यासारखाच आहे...
अंथरुणात लघवी करण्याच्या समस्येवर घरगुती उपाय काय ?
नॅचरोपॅथी फिजिशियन डॉ. नवनीत कौर भाटिया यांच्या मते, गरम दुधात हळद घालूंन असे हळदीचे दूध मुलांना प्यायला दिल्यास ही समस्या कमी होण्यास मदत मिळते. हळदीमध्ये दाहशामक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे दूध मुलांच्या शरीरातील स्नायूंना बळकटी देते आणि मज्जासंस्थेला संकेत देण्यास मदत करते की मूत्राशय पूर्ण भरले आहे.
वेटलॉससाठी साखर सोडून गूळ खाताय? वजन घटण्याऐवजी वाढेलच; पाहा पोषणतज्ज्ञ काय सांगतात...
हळदीचे दूध बनवण्याची योग्य पद्धत...
मुलांसाठी हळदीचे दूध तयार करण्यासाठी आपल्याला ग्लासभर गरम दूध आणि १/२ टेबलस्पून हळद इतक्या दोनच गोष्टींची गरज लागणार आहे. साखर, गूळ किंवा मध आपण जास्तीच्या गोडव्यासाठी आपल्या आवडीनुसार घालू शकता. दूध चांगले उकळून घ्या आणि त्यात हळद मिसळा. मुलांना हे दूध कोमट असतानाच प्यायला द्या. मुलांच्या अंथरुणात लघवी करण्याच्या समस्येवर उपाय म्हणून (turmeric milk for bed wetting problem) हळदीचे दूध देताना त्याची 'वेळ' अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक पालकांना वाटते की झोपण्यापूर्वी गरम दूध दिले की मुले शांत झोपतील, पण अंथरुणात लघवी करणाऱ्या मुलांच्या बाबतीत ही चूक महागात पडू शकते. मुलांना झोपायला जाण्यापूर्वी लगेच हळदीचे दूध देणे टाळावे. नॅचरोपॅथी तज्ज्ञांच्या मते, मुलांना झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी हे दूध पाजणे गरजेचे आहे. जर तुम्ही झोपण्यापूर्वी लगेच दूध किंवा कोणतेही द्रव पदार्थ दिले, तर मुलाचे मूत्राशय लवकर भरते. यामुळे रात्री झोपेत लघवी होण्याची शक्यता वाढते. ३ तासांचे अंतर ठेवल्यामुळे दुधातील हळदीचे गुणधर्म शरीरात नीट शोषले जातात आणि मुलाला झोपण्यापूर्वी एकदा लघवी करून रिकामे होण्याची संधी मिळते. वेळेत दूध दिल्याने पचनक्रिया सुधारते आणि रात्रीच्या वेळी वारंवार लघवी येण्याचा त्रास कमी होतो.
घरबसल्या दिवसाला ५०० ते ८०० कॅलरी होतील बर्न - फक्त करा 'या' ७ गोष्टी...
हा उपाय करण्याचे फायदे...
१. मूत्राशयाच्या स्नायूंना मजबूती :- हळदीमध्ये नैसर्गिक दाहशामक गुणधर्म असतात. हे गुणधर्म मूत्राशयाच्या स्नायूंना आतून बळकटी देतात. यामुळे मुलांची लघवी जास्त वेळ रोखून धरण्याची क्षमता सुधारते आणि झोपेत नकळत लघवी होण्याचे प्रमाण कमी होते.
२. शरीरातील नैसर्गिक ऊब :- आयुर्वेदानुसार, जेव्हा शरीरातील थंडावा वाढतो, तेव्हा लघवीची वारंवारता देखील वाढते. हळद ही निसर्गातः उष्ण असते. ती शरीराला आतून ऊब देते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी वारंवार लघवी येण्याची समस्या नैसर्गिकरित्या कमी होते.
३. मज्जासंस्थेला शांती :- हळद मेंदू आणि मज्जासंस्थेला शांत करण्याचे काम करते. जेव्हा मूल गाढ आणि तणावमुक्त झोप घेते, तेव्हा त्याचा मेंदू शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांना (उदा. मूत्राशय भरल्याचा संकेत) अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. यामुळे मूल लघवी लागल्यावर वेळीच जागे होऊ शकते.
४. पचनक्रियेत सुधारणा :- अनेकदा पचन नीट न झाल्यामुळे किंवा पोट साफ नसल्यामुळे देखील रात्रीच्या वेळी शरीराला अस्वस्थता जाणवते. हळद पोट साफ ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. जेव्हा पचन संस्था व्यवस्थित कार्य करते, तेव्हा रात्रीच्या वेळी शरीर पूर्णपणे रिलॅक्स राहते.
इतरही गोष्ट लक्षात ठेवा...
१. मुलांना रात्री झोपण्यापूर्वी न विसरता टॉयलेटला जाण्याची सवय लावा. मूत्राशय रिकामे करून झोपल्यास रात्री अंथरुणात लघवी होण्याची शक्यता निम्म्याने कमी होते.
२. संध्याकाळनंतर मुलाला कॅफीन (उदा. चॉकलेट, कोल्ड ड्रिंक्स) किंवा अति गोड पदार्थ देणे टाळा. साखर आणि कॅफीनमुळे शरीरात लघवीचे प्रमाण वाढते आणि मूत्राशयावर ताण येतो.
३. ही समस्या केवळ शारीरिक नसून स्नायूंच्या बळकटीशी संबंधित आहे. पेल्विक फ्लोअर स्नायू मजबूत करण्यासाठी मुलांना हलका व्यायाम आणि योगासने करायला लावा. यामुळे लघवी रोखून धरण्याची त्यांची क्षमता नैसर्गिकरित्या वाढते.
