शक्यतो आपण लहान बाळाला डायपर घालतो. बाळाला डायपर घालणे हे बाळाच्या व एकंदरीतच आपल्या पण तितकेच सोयीचे असते. बाळाला डायपर घालणे हे फक्त सोयीसाठीच नव्हे, तर बाळाची स्वच्छता आणि चांगल्या झोपेसाठी देखील महत्त्वाचे ठरते. आजच्या फास्ट आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये, डायपरमुळे आई - वडिलांचे काम खूप हलके होते. आपण बाळाला डायपर घालतो खरे पण ते काढताना किंवा घालताना बाळाच्या अनुमतीचा विचारच करत नाही किंवा त्यांना विचारत नाही. ऑस्ट्रेलियातील संशोधकांकडून ही एक कल्पना पुढे आली आहे की, पालकांनी आपल्या बाळांचे डायपर बदलण्यापूर्वी त्यांची अनुमती घ्यावी. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही पद्धत मुलांना अगदी लहानपणापासूनच आपले शरीर आणि शरीराच्या सीमा कोणत्या आहेत हे समजून घेण्यास मदत करू शकते(ask consent before changing diaper).
लहान बाळ बोलू शकत नसले किंवा स्पष्टपणे प्रतिसाद देऊ शकत नसली तरी, पालकांनी त्यांचे डायपर बदलताना या प्रक्रियेदरम्यान त्यांच्याशी संवाद साधावा, आपण काय करत आहेत हे स्पष्ट करावे आणि बाळ शांतपणे प्रतिक्रिया देत आहे की अस्वस्थता (baby consent before diaper change) दाखवत आहे, हे पाहण्यासाठी थांबावे. ही पद्धत मुलांना आदर शिकवते आणि पालक व मुलांमध्ये विश्वासपूर्ण नाते तयार करण्यास मदत करते. ऑस्ट्रेलियातील बालविकास संशोधकांनी (Early Child Development Researchers) ही संकल्पना मांडली आहे. त्यांचा उद्देश डायपर बदलणे या अत्यंत सामान्य कृतीचा वापर करून मुलांना लहानपणापासूनच, स्वतःचे शरीर आणि त्याचा आदर करणे किंवा त्याच्या सीमा ओळखणे यांसारख्या गोष्टींचे महत्त्व शिकवते.
नेमकं होत काय ?
१. शारीरिक सीमांचे ज्ञान :- डायपर बदलणे हा एक महत्त्वाचा आणि वैयक्तिक, खाजगी क्षण आहे, जिथे मुलाला कळते की त्यांचे शरीर त्यांच्या मालकीचे आहे आणि त्यांच्या शरीराला कोणी स्पर्श करत असताना त्यांचे म्हणणे किंवा प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत.
२. विश्वास अधिक वाढतो :- पालकांनी प्रत्येक कृतीपूर्वी संवाद साधल्यास, बाळ त्यांच्यावर अधिक विश्वास ठेवते, कारण त्यांना माहित असते की त्यांच्यासोबत अचानकपणे चुकीचे असे काहीही केले जाणार नाही.
३. संवादाचे महत्त्व :- लहानपणापासूनच अगदी छोट्यातल्या - छोट्या गोष्टींसाठी बाळाची अनुमती घेतल्यास, मुलांना भविष्यात 'नाही' म्हणण्याचा हक्क आहे, हे शिकण्यास मदत होते.
पालकांनी नेमके काय करावे ?
तज्ज्ञांनी पालकांना तोंडी संमती विचारण्याची आणि बाळाच्या प्रतिक्रियेचे निरीक्षण करण्याची योग्य पद्धत सुचवली आहे.
१. बाळाला तोंडी सांगा :- डायपर बदलण्यापूर्वी बाळाला म्हणा, "बाळा, आता मी तुझे डायपर बदलणार आहे. ठीक आहे?" किंवा "तू माझ्यासोबत डायपर बदलण्याच्या टेबलावर चालत/रांगून येशील की मी तुला उचलून घेऊ?"
२. थांबा आणि निरीक्षण करा :- प्रश्न विचारल्यानंतर लगेच डायपर बदलू नका. मिनिटभर थांबा आणि बाळाच्या चेहऱ्यावरील हावभाव, शरीराची हालचाल किंवा डोळ्यांत काळजीपूर्वक पाहा.
३. बाळाच्या मतांचा आदर करा :- जरी बाळ बोलू शकत नसले तरी, त्याला आपण काय करत आहोत हे समजावून सांगा. उदाहरणार्थ: "मी आता तुला पुसणार आहे" किंवा "तू आता तुझे पाय वर उचलशील का, जेणेकरून मी डायपर काढू शकेन?" असे लहान - सहान प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधा, यामुळे त्यांच्या मतांचा आदर किंवा त्याच्या प्रतिक्रियेचा विचार समोरुन केला जात आहे अशी भावना त्यांच्या मनात तयार होईल. बाळ रडत असेल तर थोडा वेळ थांबा. हसत, बोलत, संवाद करत डायपर बदला.
मुलं वेडीवाकडी कशीही, पोक काढून बसतात ? पालकांनी करावेत ४ उपाय - बॉडी पोश्चर होईल चांगले...
४. विचलित करणे टाळा :- डायपर बदलताना बाळाचे लक्ष इतरत्र विचलित करू नका. बाळाला कळू द्या की कोणीतरी त्याच्या खाजगी भागांना स्पर्श करत आहे आणि त्यांच्या प्रतिक्रियेला महत्त्व आहे.
या एका छोट्याशा कृतीमुळे होणारे फायदे...
१. मुलांमध्ये सुरक्षितता आणि विश्वासाची भावना तयार होते.
२. शरीराचे अधिकार समजण्यास मदत होते.
३. मुलं मोठे झाल्यावर ‘नाही’ म्हणण्याचे धैर्य येते.
४. पालक - बाळ यांच्यातील नातं भावनिकदृष्ट्या अधिक घट्ट व मजबूत होते.
