अनेक आई वडीलांना असा प्रश्न असतो की आपल्या मुलांना कधीपर्यंत आपल्या सोबत झोपवावं. कोणतं वय योग्य असतं ज्या वयात मुलांना आपण वेगळं झोपवू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर पीडियाट्रिशन सैयद मुजाहित हुसैन यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये बालरोगतज्ज्ञांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. याबाबत एक्सपर्ट्स काय म्हणतात समजून घेऊ. (At What Age Should A Child Stop Sleeping With Their Parents Know From Pediatrician)
एक्सपर्ट्स काय सांगतात?
डॉक्टर सांगतात की मुलांनी पालकांसोबत कधीपर्यंत झोपावं याचं वय काही निश्चित नाही. प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येक मुलाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. याच्या काही सामान्य गाईडलाईन्स आहेत. ज्याच्या आधारावर आई वडील योग्य निर्णय घेऊ शकतात.
१ वर्षाचे होईपर्यंत
मुलं १ वर्षाचे होईपर्यंत त्यांना सर्वात जास्त सुरक्षा आणि निरीक्षणाची गरज असते. एक्सपर्ट्सच्या मते एक वर्ष मुलांना आई वडीलांसोबतच झोपवायला हवं. यामुळे रात्री मुलांवर लक्ष ठेवता येतं आणि त्यांना सुरक्षिततेची भावना वाटते.
१ ते ३ वर्ष
या वयोगटात मुलं भावनात्मक स्वरूपात आई वडीलांशी जोडलेले असतात. रात्री अनेकदा भिती वाटू शकते ज्यामुळे मुलं जागी होतात. अशा स्थितीत आई वडीलांनी आपल्या खोलितच मुलांना झोपवायला हवे.
३ ते ६ वर्ष
पीडियाट्रिशन सांगतात की या वयात ट्रांजिशन म्हणजेच बदल होतात. मुलं हळूहळू ओळख आणि स्पेस समजू लागतात. या वयात मुलांशी प्रेमानं बोलून त्यांना वेगवेगळं झोपण्यासाठी तयार करायला हवं. कोणत्याही दबावाशिवाय मुलांच्या इच्छेनं हा निर्णय घ्यायला हवा.
६ वर्षांअधिक मुलं
डॉक्टर हुसैन सांगतात की मुलं तयार असतील, मुलांना मान्य असतील तर ६ वर्षांचे झाल्यानंतर मुलांना वेगवेगळ्या खोलीत झोपवायला हवं. हे वय आत्मनिर्भरता विकसित करण्यात मदत करते पण प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे सामाजिक दबावात येऊन कोणताही निर्णय घेऊ नका.
डॉक्टर सांगतात की कमी वयात मुलांवर दबाव घालणं योग्य नाही. मुलांपासून वेगळं झोपणं हे नॅच्युरल आणि आरामदायक असायला हवं. जर मुलांना भिती वाटत असेल किंवा मुलं वारंवार तुमच्याकडे येत असतील तर त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. आई वडीलांनी मुलांच्या भावना समजून घ्यायला हव्यात.
