अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोल्ही नेहमीच चर्चेत असतात. हे कपल म्हणून जितके चांगले आहेत तितकेच ते आदर्श पालक म्हणून देखील जगासमोर येतं आहेत.(Anushka Sharma wellness secrets) आपल्या मुलांना वेळ देण्यासाठी अनुष्का शर्माने आपलं आयुष्यात अनेक बदल केले.(Influence of celebrity parenting) मुलगी वामिका आणि अकाय या दोघांचे संगोपन करण्यात अनुष्का आपला पूर्ण वेळ देते. नुकत्याच एका मुलाखतीत अनुष्काने पालक म्हणून तिचा अनुभव कसा आहे याविषयी सांगितले.तसेच मुलांचे संगोपन करताना तिच्या जीवनशैलीत कसे बदल झाले याविषयी देखील तिने सांगितले. (Parenting tips from Anushka Sharma)
दमलेल्या आईची गोष्ट! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात डोळे मिटून बसलेल्या अनुष्का शर्माला लागली डुलकी आण
अनुष्का शर्मा म्हणते की, मुलगी वामिकामुळे तिने अनेक चांगल्या सवयी स्विकारल्या आहेत. ज्यामुळे जीवनशैलीत निरोगी बदल घडले आहेत. (Anushka Sharma lifestyle) लवकर खाणे आणि झोपणे ही सवय मला लागली आहे. तिने एका कार्यक्रमात सांगितलं की, माझी मुलगी वामिका संध्याकाळी ५.३० च्या सुमारास जेवते आणि लवकर झोपते.(Healthy lifestyle habits) वामिकामुळे मला लवकर जेवण्याची आणि झोपण्याची सवय लागली आहे. अनेकदा घरी मी आणि तिच असायची. अशावेळी मला प्रश्न पडायचा, आता मी काय करु? आपणही लवकर जेवू आणि मला याचा फायदा दिसू लागला.
ती म्हणते की, ज्या वेळी आपण लवकर जेवण करतो आणि झोपतो तेव्हा आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ज्यामुळे आपली जीवनशैली बदलते. आपली व्यवस्थित झोप झाली की, सकाळी फ्रेश वाटते. तसेच माझा ब्रेन फॉगही कमी झाला आहे. मी माझ्या मुलीसह माझी देखील काळजी घेते. याविषयी मी कुणाचाही सल्ला घेतला नाही. मी हे फक्त ट्राय केल आणि त्यानुसार त्याचे अनुसरण करण्यास सुरुवात केली.
रात्री लवकर जेवण्याचे फायदे
रात्री लवकर जेवल्याने आपले पचनक्रिया सुधारते. झोपेची गुणवत्ता वाढू मेंदूच्या विकासाला चालना मिळते. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहिल्याने वजनही कमी होते. अनेकदा रात्री उशिरा जेवल्याने ॲसिडीटीचा त्रास वाढतो. लवकर जेवल्याने कॅलरीज बर्न होण्यास पुरेसा वेळ मिळतो. ज्यामुळे वजन कमी होते. लवकर जेवल्याने रक्तातील साखरेची पातली नियंत्रित राहून मधुमेहाचा धोका कमी होतो.