Lokmat Sakhi >Parenting > आता लोकांनी मुलं जन्मालाच घालू नयेत! ओटीटी स्टार शीबा चढ्ढाचं मत; इतका वैताग येतो कारण..

आता लोकांनी मुलं जन्मालाच घालू नयेत! ओटीटी स्टार शीबा चढ्ढाचं मत; इतका वैताग येतो कारण..

Actress Sheeba Chadhdha Reacts On Challenges In Parenting: अभिनेत्री शीबा चढ्ढा यांनी मुलं होऊ देण्याविषयीची जी काही मतं मांडली आहेत ती सध्या खूप व्हायरल हाेत आहेत..(she says in today’s world: 'Don't think people should have kids now')

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2025 15:58 IST2025-08-07T15:42:40+5:302025-08-07T15:58:11+5:30

Actress Sheeba Chadhdha Reacts On Challenges In Parenting: अभिनेत्री शीबा चढ्ढा यांनी मुलं होऊ देण्याविषयीची जी काही मतं मांडली आहेत ती सध्या खूप व्हायरल हाेत आहेत..(she says in today’s world: 'Don't think people should have kids now')

actress sheeba chadhdha reacts about challenges in todays parenting, she says in today’s world: 'Don't think people should have kids now' | आता लोकांनी मुलं जन्मालाच घालू नयेत! ओटीटी स्टार शीबा चढ्ढाचं मत; इतका वैताग येतो कारण..

आता लोकांनी मुलं जन्मालाच घालू नयेत! ओटीटी स्टार शीबा चढ्ढाचं मत; इतका वैताग येतो कारण..

Highlightsआता असा विचार असणाऱ्या तरुणाईचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा कित्येक तरुणींची आणि शिबा चढ्ढा यांची मतं अगदी जुळणारी आहेत. 

'लेकरं कशी मोठी होऊन गेली हे आम्हाला कळालंही नाही...', अशा पद्धतीची विधानं आजुबाजुच्या आज्यांच्या तोंडातून आपण बऱ्याचदा ऐकत असतो.. या वाक्यातून हेच दिसून येतं की एकत्र कुटूंब पद्धतीमुळे पुर्वी घरात एवढी लोकं असायची की त्या मुलांची काळजी घरातले इतर सदस्य परस्पर घेऊन टाकायचे. मुलांना काय हवे, काय नको या प्रत्येक गोष्टीसाठी आईला किंवा वडिलांनाच वेळ काढायची गरज पडत नव्हती. पण आता मात्र याच्या अगदी उलट झालं. आई आणि बाबा या दोनच व्यक्ती मुलांना डोळ्यासमाेर दिसतात. त्यामुळे मुलांनाही प्रत्येक गोष्टीत तेच लागतात. मुलांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणं, घरातली कामं करणं, ऑफिस सांभाळणं हे सगळं सांभाळता सांभाळता आयुष्य एवढं कठीण होऊन जातं की पहिलं मूल होऊन गेल्यानंतर दुसऱ्या बाळाचा विचारही चुकून पालकांच्या मनात येत नाही. असंच काहीसं विधान अभिनेत्री शिबा चढ्ढा यांनीही केलं आहे.(Sheeba Chadhdha says in today’s world: 'Don't think people should have kids now')

 

त्या म्हणतात की सध्या आपल्या भोवतीचं वातावरण खूप बदललं आहे. आणि या बदलत्या जगात मुलांना सांभाळणं अतिशय कठीण आहे. मुल सांभाळणं हे एका व्यक्तीचं काम नाही. त्यासाठी कित्येक हातांची मदत लागते.

राखीपौर्णिमेला काय बेत? करा झणझणीत काळ्या वाटणातलं भरलं वागं! अस्सल गावरान मसाला रेसिपी

पण आता मात्र न्युक्लिअर कुटूंब पद्धतीमुळे ते सगळं काम एकहाती करावं लागत आहे. मुलांसाठी प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देणं, त्यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी हजर असणं हे खूप त्रासदायक आहे. त्यात सिंगल पॅरेंट्सची भुमिका तर आणखी जास्त कठीण असते. त्यामुळेच मला वाटत नाही की आता लोकांनी मुलं होऊ देण्याचा विचार करावा, असं मत त्यांनी सिद्धार्थ खन्ना यांनी घेतलेल्या नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मांडलं.

 

शिबा या सिंगल पॅरेंट आहेत. त्या म्हणाल्या की मुलीला वाढवताना मी काही तिच्या वडिलांची जागा घेऊ शकत नाही. पण तरीही तुम्हाला मुलांच्या आयुष्यातली ती जागा भरून काढण्यासाठी त्यांना खूप काही द्यावं लागतं, जेवढं तुमच्याकडेही साठवून ठेवलेलं नसतं. मुलगी हीच त्यांची पहिली प्रायोरिटी आहे. आणि तिच्यासाठीच कित्येक प्रोजेक्टवर त्यांना पाणी सोडावं लागलं.

फर्निचरवर सतत धूळ बसते- रोज पुसावं लागतं? 'ही' ट्रिक पाहा, ८ दिवस फर्निचर राहील चकाचक...

थोड्याफार फरकाने कित्येक महिलांची अशीच अवस्था असते. मुलांना सांभाळत, वाढवतच त्यांना करिअर करावं लागतं. ज्या तरुणी अजूनही आई झालेल्या नाहीत त्यांना तर आजुबाजुच्या नव्याने आई झालेल्या महिलांची परिस्थिती पाहून मुलं होऊ द्यावीच वाटत नाहीत. मुलांची जबाबदारी घेण्यासाठी मन तयार होत नाही, त्यामुळे पाळणा लांबवला जातो. विशेष म्हणजे आता असा विचार असणाऱ्या तरुणाईचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा कित्येक तरुणींची आणि शिबा चढ्ढा यांची मतं अगदी जुळणारी आहेत. 

 

Web Title: actress sheeba chadhdha reacts about challenges in todays parenting, she says in today’s world: 'Don't think people should have kids now'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.