ज्या घरात तिन पिढ्या एकत्र नांदतात त्या घरांमध्ये मधल्या पिढीची थोडी कुचंबणा होतच असते. मागच्या पिढीचं ऐकून चालायचं, आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडायचं की पुढच्या पिढीचे नवे विचार ऐकायचे हे ३ प्रश्न त्यांच्यासमोर उभे असतात. अशावेळी तिन्ही पिढ्यांना पटेल असा निर्णय घेण्याचं महत्त्वाचं कामही त्यांनाच करावं लागतं. अशी परिस्थिती निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे दोन पिढ्यांना ज्या पद्धतीने वाढवलं गेलं आहे, त्यामध्ये असणारी प्रचंड तफावत. अभिनेता अभिषेक बच्चनसुद्धा याच अनुभवातून सध्या जात आहे.
सीएनबीसी टीव्ही १८ यांना दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणतो की माझ्या वडिलांकडे बघून मी आजही शिकतो. आज ते ८२ वर्षांचे आहेत. पण अजूनही ते अतिशय ॲक्टीव्ह असून त्यांच्या कामात खंड पडलेला नाही.
फक्त ४ थेंब तूप 'या' पद्धतीने वापरा! आरोग्याच्या सगळ्या तक्रारी होतील दूर- राहाल ठणठणीत
त्यांच्याकडे पाहिलं की नेहमी मला असं वाटतं की त्यांच्यासारखंच उदाहरण मी माझ्या मुलीसमोर ठेवलं पाहिजे. आराध्या जेव्हा माझ्या वयाची होईल तेव्हा तिनेही माझ्याबद्दल असाच विचार करावा. आज जेव्हा एखाद्या बाबतीत काय निर्णय घ्यावा याविषयी मी कन्फ्यूज होतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझे पालक येतात आणि या परिस्थितीत त्यांनी काय निर्णय घेतला असता यावरून मी माझी दिशा ठरवतो. पण आराध्याची पिढी अशी मुळीच नाहीये..
अभिषेक म्हणतो नव्या पिढीचे प्रश्नही वेगळे आहेत आणि ती उत्तर शोधण्याची त्यांची पद्धतही वेगळी आहे. पालकांनी सांगितलेली कामं निमूटपणे करण्याची माझी पिढी होती. पण आजची पिढी ते का करायचं हे विचारते. वयाने मोठे आहोत म्हणून आपण त्यांना सांगितलेली एखादी गोष्ट ते करतीलच असं नाही.
लग्नकार्यात घालण्यासाठी पाहिजेतच ठसठशीत पाटल्या- ७ सुंदर डिझाईन्स, हाताला येईल शाही लूक..
कारण त्यांना त्यामागचं लॉजिक महत्त्वाचं वाटतं. प्रत्येक पालक थोड्याफार फरकाने हेच अनुभवत आहे. आपलं लहानपण आणि त्यांचं लहानपण यात खूप फरक आहे. त्यामुळे त्यांचे नवे विचार वेगाने आपल्यापर्यंत येत असतात. हे नवे विचार झेलून, मागच्या पिढीचा अनुभव गाठीशी बांधून दोन्ही पिढ्यांना सोबतीने घेऊन जाणं हेच तर अभिषेकच्या भुमिकेत असलेल्या मधल्या पिढीला जमायला हवंय..