उन्हाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.(baby skincare mistakes) यादरम्यान आपल्याला त्वचेच्या अनेक समस्या येतात. विशेषत: लहान मुलांना उन्हाळ्यात उष्माघात किंवा घामोळ्यांच्या समस्यांचा अधिक त्रास होतो. (harmful skincare products for babies) पुरळ येणे, त्वचेवर लालसर पडणे, रॅशेस येणे यांसारख्या समस्या होतात. (what not to apply on baby's skin)त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि बाळाला बरे वाटण्यासाठी पालक विविध प्रकारची उत्पादने वापरतात.(dermatologist tips for baby skincare) कधीकधी ही उत्पादने त्वचेला हानी पोहचवतात. तज्ज्ञ सांगतात की, बाळाची त्वचा ही खूप नाजूक, मऊ आणि संवेदनशील असते.(common baby skincare errors) मुलांच्या बाबतीत थोडासा निष्काळजीपणा किंवा चुकीच्या त्वचेच्या उत्पादनाचा वापर त्यांच्या त्वचेला हानि पोहचवू शकतात. (things to avoid on baby’s skin)
आई होणं सोपं नाही, पण त्यासारखा आनंदही नाही! गिरिजा सांगते, तिचा पालकत्वाचा प्रवास!
मुलांच्या त्वचेवर चुकूनही या ३ गोष्टी लावू नका
आपल्या देशात ९० टक्के पालक त्यांच्या मुलांना टॅल्कम पावडर लावतात. उन्हाळ्यात ही पावडर उष्माघात बरा करण्यासाठी किंवा त्वचेला आराम मिळण्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्वचारोग तज्ज्ञ म्हणतात टॅल्कम पावडर ही अत्यंत हानिकारक आहे. यामध्ये बारीक कण असतात जे श्वास घेताना मुलांच्या फुफ्फुसात जातात. ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
अनेक पालक मुलांसाठी अँटीबॅक्टेरियल साबणाचा वापर करतात. त्वचा तज्त्र असे म्हणतात की ते हानिकारक आहे. डॉक्टरांच्या मते, मुलांच्या त्वचेवर काही चांगले बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या असतात. जे त्यांना वाईट बॅक्टेरियापासून वाचवतात. अशावेळी हा साबण वापरणे टाळा.
त्वचारोगतज्ज्ञ म्हणतात की, लहान मुलांना सुगंधित उत्पादने लावू नका. यामध्ये असणारे रसायने मुलांच्या त्वचेला अधिक त्रासदायक असतात. त्यामुळे त्यांना ॲलर्जी होण्याची शक्यता असते. त्वचेवर रॅशेस किंवा पुरळे येऊ शकतात. त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचा वापर करा.