Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलांशी कनेक्ट होण्यासाठी काढा फक्त दिवसभरातील ९ मिनिटं ! पालकांनी ३ गोष्टी केल्यास नातं होईल आधीपेक्षा घट्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2025 14:22 IST

9 golden minutes parenting : parenting hacks for kids : understanding 9 golden minutes that shape a childs behaviour & confidence daily routine parenting hacks : पालकांनी मुलांसोबत कनेक्ट होण्यासाठी ९ मिनिटांच्या जादुई रुलमध्ये नेमकं काय करायचं ते पाहा...

प्रत्येक आई - वडिलांना आपल्या मुलांशी एक प्रकारचे मजबूत आणि भावनिक नाते जपायचे असते. मुलांच्या आयुष्यात पालकांचे प्रेम, आधार आणि मार्गदर्शन हेच त्यांचा आत्मविश्वास आणि मानसिक विकासाची खरी गुरुकिल्ली असते. आजच्या धावपळीच्या आणि सतत बदलत्या लाईफस्टाईलमध्ये, अनेकदा काही पालक मुलांसाठी वेळ काढू शकत नाही किंवा त्यांच्या छोट्या-छोट्या भावनिक गरजांकडे नकळतपणे दुर्लक्ष करतात. यामुळे मुले आणि पालकांमधील (9 golden minutes parenting) संवाद तुटतो आणि भावनिक अंतर वाढू लागते. मुलांशी भावनिक नात जपण ही पॅरेंटिंगमधील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मुलं कितीही लहान किंवा मोठी असली तरी त्यांना आपल्या पालकांकडून प्रेम, सुरक्षितता, समजून घेणं आणि स्वीकार यांची गरज असते. मुलं जर त्यांच्या लहान वयातच पालकांशी भावनिकरित्या जोडली गेली नाही तर, मुलं मनातील भावना व्यक्त करणे थांबवतात, छोट्या - छोट्या गोष्टीही शेअर करत नाहीत आणि पालकांना वाटू लागतं की मुलं आपल्यापसून  दूर गेली आहेत(understanding 9 golden minutes that shape a childs behaviour & confidence daily routine parenting hacks).

मुलांच्या संगोपनात प्रत्येक आई-वडील लाखो प्रयत्नांनंतरही अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम पुढील काळात मुलाचे वर्तन, आत्मविश्वास आणि मानसिक विकास यावर दिसू लागतो. अमेरिकेतील पॅरेंटिंग एक्स्पर्ट लॉरा मार्कहम (Aha Parenting) यांच्या मते, दिवसभरात ९ मिनिटे अशी असतात, जी सर्वात जास्त संवेदनशील मानली जातात आणि जर या ९ मिनिटांमध्ये पालकांनी मुलासोबत योग्य प्रकारे संवाद साधला, तर त्यांचा भावनिक आणि मानसिक विकास खूप चांगला होऊ शकतो. पालकांनी मुलांसोबत कनेक्ट होण्यासाठी या ९ मिनिटांच्या जादुई रुलमध्ये नेमकं काय करायचं ते पाहूयात... 

अमेरिकेतील पॅरेंटिंग एक्स्पर्ट लॉरा मार्कहम (Aha Parenting) यांच्या मते, दिवसभरातील ही ९ मिनिटे तीन मुख्य वेळी येतात ते म्हणजे ३ मिनिटे – सकाळी उठताच, ३ मिनिटे – शाळेतून घरी परतल्यानंतर आणि ३ मिनिटे – रात्री झोपण्यापूर्वी... या तिन्ही वेळी मुलांचे मन सर्वात जास्त भावनिकदृष्ट्या सक्रिय असते आणि ते आई - वडिलांच्या सांगण्याला त्वरित आत्मसात करतात.

मुलं वेडीवाकडी कशीही, पोक काढून बसतात ? पालकांनी करावेत ४ उपाय -  बॉडी पोश्चर होईल चांगले....

१. सकाळी उठल्यावर पहिली ३ मिनिटे : - बहुतेक मुलांची सकाळ घाईघाईत आणि रागावून बोलण्यात किंवा आरडाओरडा करण्यात निघून जाते. "उठ लवकर!", "उशीर होत आहे!", "चला ब्रश करा!" अशी सुरुवात मुलांना आतून टेंन्शन किंवा स्ट्रेस देऊ शकते. जर तुम्ही सकाळी उठताच मुलांना हळूवारपणे मिठी मारली, हसून "गुड मॉर्निंग" म्हटले आणि फक्त २ मिनिटे त्यांच्यासोबत बसलात, तर त्याचा दिवस सकारात्मक पद्धतीने सुरू होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे मुलांना सुरक्षित वाटते, त्यांचा मूड स्थिर राहतो आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास देखील मदत होते. 

२. शाळेतून आल्यानंतरची दुसरी ३ मिनिटे :- जेव्हा मूल शाळेतून घरी येते, तेव्हा त्याच्या मनात खूप साऱ्या गोष्टी सुरू असतात. कोणाशी भांडण झाले असेल, एखादा पेपर कठीण गेला असेल किंवा मुलं थकून गेलं असेल. जर अशावेळी पालक फोनमध्ये व्यस्त राहिले किंवा फक्त "जा, कपडे बदल" असे म्हणाले, तर मूल भावनिकदृष्ट्या दूर होऊ लागते. शाळेतून येताच फक्त ३ मिनिटांचा तुमचा आपुलकीचा व्यवहार, एक गोड स्माइल एक छोटीशी मिठी आणि "दिवस कसा होता?" यांसारखे १ ते २ प्रश्न मुलांना तात्काळ आराम व दिलासा देतात.

आई, कार्टून लाव म्हणून मुलं हट्ट करतात, रडतात? बालरोगतज्ज्ञ सांगतात ४ उपाय, - वेळीच बदला मुलांची ही सवय... 

३. रात्री झोपण्यापूर्वीची तिसरी ३ मिनिटे :- रात्रीचा वेळ मुलांसाठी खूप संवेदनशील असतो. जर या वेळी रागवणे, चिडणे किंवा आरडाओरडा केला तर, मुलांची  झोप बिघडू शकते आणि त्याचे मन चिंतीत होऊ शकते. झोपण्यापूर्वी फक्त ३ मिनिटे शांत वातावरणात घालवा. उदाहरणार्थ :- गोष्ट सांगणे, दिवसभरातील कामांबद्दल बोलणे, मुलाला प्रेमाने मिठी मारणे, मुलांना कुशीत घेऊन झोपणे. हे छोटे - छोटे क्षण मुलांमध्ये सुरक्षितता, विश्वास आणि सकारात्मक विचार येण्यास फारच फायदेशीर ठरते. यामुळे मुले जास्त शांत, आनंदी आणि भावनिकदृष्ट्या मजबूत होतात, ही ३ मिनिटे मुलांचा आत्मविश्वास आणि बोलण्याची क्षमता खूप मजबूत करतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Connect with kids in 9 minutes: 3 parenting tips.

Web Summary : Parents can strengthen bonds with children by dedicating just 9 minutes daily. Focus on connecting during mornings, after school, and before bed. These moments foster emotional security and improve communication.
टॅग्स :पालकत्वलहान मुलं