Join us

५ मिनिटे का असेना पण मुलांना रोज डोळे मिटून शांत बसायला लावा! मिळतील ६ जबरदस्त फायदे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2025 17:37 IST

6 Amazing Benefits of Meditation To Kids: लहान मुलांना मेडिटेशनची काय गरज असं वाटत असेल तर या काही गोष्टी वाचाच...(6 reasons why children should meditate every day)

ठळक मुद्देसुरुवातील ते ऐकणार नाहीत. त्रास देतील. पण अगदी ५ मिनिटांपासून सुरुवात करा. मुलांमध्ये खूप चांगले बदल झालेले दिसतील.

मेडिटेशन किंवा ध्यान करून शांत बसणे याचे आपल्या शरीराला खूप फायदे मिळतात. मन शांत होण्यासाठीही मेडिटेशनचा खूप फायदा होतो. आता लहान मुलांना एवढ्या कमी वयात मेडिटेशन करण्याची काय गरज असं तुम्हाला वाटत असेल तर आजची मुलं ज्या वातावरणात वाढत आहेत, त्या काही गोष्टी लक्षात घ्या. मुलांच्या बाबतीतल्या कित्येक समस्या सध्या वाढलेल्या आहेत. त्या कमी होण्यासाठी त्यांच्याकडून नियमितपणे मेडिटेशन करून घेणे खूप गरजेचे ठरते. सुरुवातील ते ऐकणार नाहीत. त्रास देतील. पण अगदी ५ मिनिटांपासून सुरुवात करा (6 amazing benefits of meditation to kids). हळूहळू वेळ वाढवत न्या. मुलांमध्ये खूप चांगले बदल झालेले दिसतील.(6 reasons why children should meditate every day)

 

मुलांनी मेडिटेशन करणे का गरजेचे आहे?

१. सध्याच्या शाळकरी मुलांना अभ्यासाचा खूप ताण असतो. स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. मुलांनी नियमितपणे मेडिटेशन केल्यास मनावरचा ताण कमी व्हायला नक्कीच मदत होऊ शकते.

१ पैसाही खर्च न करता घरच्याघरी करा आरोग्य तपासणी- ५ मिनिटांत कळेल तुमची तब्येत कशी आहे?

२. काही मुलं हायपरॲक्टीव्ह असतात. त्यांचं अभ्यासातही लक्ष नसतं. अशा मुलांचं मन शांत करून त्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी मेडिटेशन करणं उपयुक्त ठरतं.

३. काही मुलांना रात्री लवकर झोपच येत नाही. रात्री लवकर झोपलं नाही तर सकाळी लवकर जाग येत नाही. झोपेचं हे विस्कळीत झालेलं चक्र सुधारण्यासाठीही मेडिटेशनची मदत होते. रात्री झोपण्यापुर्वी मुलांकडून मेडिटेशन करून घ्या. लवकर शांत झोप लागेल.

 

४. नियमितपणे मेडिटेशन केलं तर त्यातुनच मुलं स्वत:विषयी विचार करायला शिकतात. दिवसभरात आपण काय चांगलं आणि काय वाईट केलं याची जाणीव होऊ लागते. त्यातून ते त्यांच्या चुका सुधारण्याचाही प्रयत्न हळूहळू करायला लागतात. 

बिकिनी बॉडीसाठी कियारा आडवाणीने 'या' पद्धतीने घटवलं वजन, परफेक्ट फिगरचं सिक्रेट

५. मेडिटेशन करून सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांनी काय काय केलं याची उजळणी त्यांना करायला लावा. स्मरणशक्ती वाढण्यासाठी याची निश्चितच मदत होते.

६. मुलांच्या मनातला राग शांत करण्यासाठीही मेडिटेशनचा फायदा होतो. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं