lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > "आई, मला काहीतरी गोड खायला दे !" असा धोशा मुलं सतत तुमच्यामागे लावतात ? ५ सोप्या टिप्स...

"आई, मला काहीतरी गोड खायला दे !" असा धोशा मुलं सतत तुमच्यामागे लावतात ? ५ सोप्या टिप्स...

5 Simple Steps To Handle Kids, Sweets, And Their Sugar Obsession : खूप प्रयत्न करूनही मुलांची गोड पदार्थ खाण्याची सवय मोडता येत नाही, पण हा कठीण टास्क कसा पूर्ण करावा यासाठी काही खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2023 02:02 PM2023-07-06T14:02:34+5:302023-07-06T14:25:43+5:30

5 Simple Steps To Handle Kids, Sweets, And Their Sugar Obsession : खूप प्रयत्न करूनही मुलांची गोड पदार्थ खाण्याची सवय मोडता येत नाही, पण हा कठीण टास्क कसा पूर्ण करावा यासाठी काही खास टिप्स...

5 Excellent Ways to Break Your Child's Addiction to Sweets, Here are nutrition tips to curb sugar cravings | "आई, मला काहीतरी गोड खायला दे !" असा धोशा मुलं सतत तुमच्यामागे लावतात ? ५ सोप्या टिप्स...

"आई, मला काहीतरी गोड खायला दे !" असा धोशा मुलं सतत तुमच्यामागे लावतात ? ५ सोप्या टिप्स...

लहान मुलांना गोड खायला खूप आवडते. चॉकलेट, केक, आइस्क्रीम असले पदार्थ तर त्यांचे वीक पॉईंटच असतात. अशावेळी आई - वडील मुलांना दात किडतील म्हणून ओरडत असतात आणि मुलेही चॉकलेट खाण्याचा हट्ट करत असतात. हे चित्र आपल्याला साधारण सगळीकडेच पहायला मिळते. गोड पदार्थ खाणे हा मोठ्यांचाच नाही तर अगदी लहानांचा देखील अतिशय आवडीचा विषय आहे. एरवी सणावाराला गोडावर ताव मारणं वेगळं आहे पण रोजच गोड पदार्थ खाण हे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरु शकत. 

लहान मुलं म्हटली की ती गोड खाणारच! गोष्ट कोणतीही असो ती एका मर्यादित प्रमाणात वापरली किंवा त्याचा वापर केला तर ते चांगले असते, पण जेव्हा प्रमाण मर्यादेबाहेर जाते तेव्हा समस्या सुरु होतात. यासाठीच लहान मुले कमी प्रमाणात गोड खात असतील तर हरकत नाही, पण गोड खाणे ही त्यांची सवय होऊ देऊ नका. आपण पालक म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहेच. परंतु असे असले तरीही गोड खाताना मुलांना कितीहीवेळा अडवले तरीही ते गोड खाणे काही सोडत नाहीत. अशावेळी पालक म्हणून आपण नेमके काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो. मुलांना सतत गोड खावेसे वाटत असल्यास त्यांची ही सवय बदलण्यासाठी पालकांना नेमके काय करता येईल यासाठी काही काही खास टिप्स(5 Excellent Ways to Break Your Child's Addiction to Sweets, Here are nutrition tips to curb sugar cravings).

मुलं सतत तुमच्याकडे गोड खाण्याचा हट्ट करतात ? 

१. फळं खाण्याला प्राधान्य द्यावे :- मुलांना जास्तीत जास्त फळे खायला द्यावीत. फळे हा आहारातील मुख्य घटक आहे. मुलांना फळे खाण्याची सवय जरूर लावावी. दिवसाला किमान एक तरी ताजे फळ मुलांना खायला द्यावेच. या फळांमध्ये आपण केळी, आंबा, पेरू यांसारखी पौष्टिक फळे मुलांना खायला देऊ शकता. या सर्व फळांमध्ये जीवनसत्त्व आणि पॉलीफेनोल विपुल प्रमाणात असते. यामुळे पचन शक्ती सुधारते. शिवाय शरीराला योग्य वयात योग्य पोषण मिळाल्याने आजरांपासून मुलांना दूर ठेवता येते. 

आई झाल्यावर करिअर संपते का? मग तुम्ही काय निवडाल? - समीरा रेड्डीचा सवाल...

२. गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण :- मुलांना अजिबातच गोड खाऊ द्यायचे नाही असे नाही. मुलांचे गोड खाणे एकदम पण अचानक लगेच बंद करू नये. पालकांनी मुलांना गोड खायला देताना एक ठराविक प्रमाण नेमून द्यायचे आहे आणि महिन्यातून ठराविक वेळीच त्यांना गोड खाण्याची परवानगी द्यावी. अनेकदा गोडधोड मुलांना द्यायचे झालेच तर आईने स्वत:च्या हाताने बनवून घरचे ताजे गोड पदार्थ त्यांना खाऊ घालावेत. बाजारात उपलब्ध असणारे गोड  पदार्थ शक्यतो मुलांना खायला देणे टाळावे, कारण त्या पदार्थांमुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. 

३. काय खाणार असे सतत विचारू नये :- आपल्या मुलांना तुम्हाला काय खायला आवडेल? असे पालकांनी सतत विचारू नये. अनेक आई वडील असे विचारून सगळ्यात मोठी चूक करतात. त्याऐवजी आई वडिलांनी मुलांना सांगायला पाहिजे की कोणती गोष्ट त्यांच्यासाठी चांगली आहे आणि कोणती गोष्ट त्यांच्या आरोग्याला अपायकारक ठरू शकते. जर आपण स्वत:हून मुलांना विचाराल तर साहजिकच मुलं त्या पदार्थांचाच हट्ट धरतील जे त्यांना आवडतात. म्हणून मुलांना पौष्टिक पदार्थ खाऊ घालण्यावर भर द्यावा आणि त्यांची आवड न विचारलेली बरी, परंतु आपण जे पदार्थ बनवाल त्याची चव मुलांना आवडेल अशी ठेवावी, जेणेकरून मुलं ते पदार्थ खाण्यास टाळाटाळ करणार नाहीत.

काहीही केलं तरी मुले पालेभाज्या खातच नाहीत? ६ उपाय, पालेभाज्याही खातील आवडीने...

४. प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर जास्त भर द्यावा :- मुलांची गोड पदार्थ खाण्याची सवय सोडवण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर जास्त भर द्यावा. दुग्धजन्य पदार्थ, शेंगा, टोफू, पनीर यांसारखे प्रोटीनरीच पदार्थ त्यांच्या आहारात जास्तीत जास्त प्रमाणात द्यावेत. प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्यांचे पोट जास्त वेळ भरलेले राहील यामुळे त्यांना इतर काही खाण्याची जास्त इच्छा होणार नाही. एवढेच नव्हे तर प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वे त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी फायदेशीर ठरतात. 

५. काय खावे याबद्दल मुलांना जागरुक करा :- आपण काय खावे, कसे खावे, किती प्रमाणात खावे याबद्दल पालकांनी मुलांना जागरूक करणे गरजेचे आहे. मुलांना ते काय खात आहेत हे व्यवस्थित खाण्यावर लक्ष केंद्रित करायला शिकवा. काय व किती खाल्ल्याने त्यांच्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे हे मुलांना शिकवा. मुलांना काहीही खाण्याआधी ती गोष्ट आपल्या आरोग्याला उपयुक्त आहे का हा विचार करण्यास शिकवा, थोडक्यात मुलांना माइंडफूल इटिंग करणे शिकवा. यामुळे त्यांचे गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण हळूहळू कमी होईल.

मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? ८ टिप्स - मोबाइलशिवाय मुले जेवत झोपत नाही ही तक्रार संपेल...

Web Title: 5 Excellent Ways to Break Your Child's Addiction to Sweets, Here are nutrition tips to curb sugar cravings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.