आजच्या धावपळीच्या जीवनाचा मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांवरही परीणाम दिसून येतो. अभ्यास, स्पर्धा, सोशल प्रेशर या ओझ्याखाली मुलं दबली जातात. अशा स्थितीत पालकांना योग्य शिक्षण मिळण्यासाठी मुलांना योग्य पद्धतीनं गाईड करणं गरजेचं आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना गीतेत सांगितल्या या ५ गोष्टी जरूर शिकवायला हव्यात. ज्यामुळे त्यांची पर्सनॅलिटी चांगली होते तसंच एक चांगली व्यक्ती बनण्यासही मदत होते. (5 Bhagavad Gita Lessons Every Parent Should Teach Their Child)
मेहनत करण्यावर लक्ष द्या रिजल्टवर नाही
चाईल्ड सायकोलोजिस्ट श्वेता गांधी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी गीतेतील ५ अनमोल गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या मुलांना शिकवा की कर्म करा, फळाची चिंता करू नका. मुलांना हे शिकवणं गरजेचं आहे कारण त्यांना यामुळे आपल्या जबाबदाऱ्या कळतील. मुलांना मेहनत करण्याकडे लक्ष द्यायला हवं. रिजल्ट त्यांच्या हातात नसून मेहनत करणं त्यांच्या हातात आहे. जेव्हा मुलं मन लावून एखादी गोष्ट करतात तेव्हा कमी ताण येतो आणि कामावर व्यवस्थित लक्ष केंद्रीत करू शकतात.
प्रत्येक स्थितीत शांत राहा
जीवनात जय-पराजय येतच असते. मुलांनी यश मिळाल्यावर जास्त खूश होऊ नये याशिवाय हारल्यानंतर जास्त दुखातही बुडून जाऊ नये. संतुलित राहणं हीच तुमची खरी ताकद आहे. म्हणून मुलांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं . कठीण वेळेत शांत राहिल्यास योग्य निर्णय घेता येतात.
खरं बोला आणि दयाळू बना
इमानदारी आणि दया असे गुण आहे जे कोणत्याही व्यक्तीला आतून मजबूत बनवतात. या सवयी लहान मुलांमध्ये आत्तापासून टाकणं सुरू करा. मुलांनी नेहमी खरं बोलायला हवं. ज्यामुळे मुलांना संवेदनशील बनवण्यास मदत होईल.
मन शांत ठेवून भावनांवर नियंत्रण
मुलं आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकले तर ते राग, भिती यांसारख्या भावना व्यवस्थित हाताळू शकतील. तसंच कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी मुलांना थोडं थांबायला सांगा, थोडा विचार करून उत्तर दिल्यास त्यांना या सवयी संपूर्ण जीवनभर कामात येतील.
प्रत्येक व्यक्तीत चांगुलपणा शोधा
जगभरातील प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे हे मुलांनी समजून घेऊन प्रत्येकाचा आदर करायला हवा. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही खास गोष्ट असते. प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. हे विचार त्यांना विनम्र बनवण्यास मदत करतात.
