Join us

५ वर्षांपेक्षा लहान मुलांची स्मरणशक्ती व बुद्धी होईल तल्लख! पालकांनी कराव्यात ३ गोष्टी - साध्या आणि सोप्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 17:10 IST

3 easy tasks will increase the memory power of children under 5 years : how to improve memory power in children under 5 : 3 easy tasks to boost kids memory : memory boosting activities for toddlers : best brain exercises for children under 5 : increase memory power in kids naturally : ५ वर्षांपेक्षा खालील मुलांची स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढवण्यासाठी पालकांनी कोणत्या ३ गोष्टी कराव्यात...

लहान वयात मुलांचा मेंदू अतिशय वेगाने विकसित होत असतो. लहान मुलांच्या आयुष्यातील पहिली ५ ते ६ वर्ष खूप महत्त्वाची असतात. याच काळात त्यांच्या मेंदूचा विकास वेगाने होत असतो आणि त्यांची शिकण्याची क्षमता अधिक जास्त वेगाने वाढत असते. त्यामुळे या वयात मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देणे अत्यंत (3 easy tasks will increase the memory power of children under 5 years) गरजेचे असते. ५ वर्षांखालील मुलांची स्मरणशक्ती योग्य पद्धतीने विकसित झाली, तर त्याचा फायदा त्यांना आयुष्यभर होतो. अशा वयात पालकांनी त्यांना लावलेल्या छोट्या-छोट्या सवयी व संस्कार (how to improve memory power in children under 5) मुलांची एकाग्रता, शिकण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मोठी मदत करतात(best brain exercises for children under 5).

मुलांच्या वयाची पहिली पाच वर्षे हा काळ त्यांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. याच वयात मेंदूचा वेगाने विकास होतो. याचा थेट परिणाम मुलांच्या भविष्यातील शिकण्याच्या क्षमतेवर होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या मुलाची स्मरणशक्ती वाढवायची असेल आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी करायचे असेल, तर काही खास गोष्टी तुम्ही त्यांच्या डेली रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता. लहान मुलांची स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढवण्यासाठी पालकांनी कोणत्या ३ महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात ते पाहूयात... 

५ वर्षांपेक्षा खालील मुलांची स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढवण्यासाठी पालकांनी कोणत्या ३ गोष्टी कराव्यात...  

१. रोज गोष्टी ऐकणे किंवा वाचणे :- लहान मुलांना रोज गोष्ट सांगितल्याने त्यांची कल्पनाशक्ती, शब्दांचे ज्ञान आणि लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. गोष्टींमध्ये अनेकदा नवीन शब्द, पात्रे आणि घटना येतात, ज्या मुलांना आठवतात. यामुळे त्यांचा मेंदू अधिक ॲक्टिव्ह  राहतो आणि एकाग्रता वाढते. त्यामुळे, दररोज झोपण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे तुमच्या मुलांना गोष्ट सांगा किंवा त्यांना वाचायला सांगा.

गूळ-ज्वारीचा केक खाऊन तर पाहा, फक्त १५ मिनिटांत करा मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट केक...

२. स्मरणशक्ती वाढवणारे खेळ :- खेळणे केवळ मनोरंजनासाठी नाही, तर खेळांच्या माध्यमातून मुले नवीन गोष्टी शिकू शकतात. म्हणूनच, मुलांना पझल्स, मेमरी कार्ड गेम्स, मॅचिंग गेम्स किंवा त्यांच्या स्मरणशक्तीला चालना देणारे यांसारखे छोटे छोटे खेळ खेळू द्या. यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते. दररोज किमान २० मिनिटे मुलांना असे खेळ खेळू द्या.

मुलांना ‘किती’ पॉकेटमनी द्यावा? लक्षात ठेवा ५ टिप्स- मुलांनाही समजेल पैशाचं महत्त्व नीट...

३. ब्रेन-बूस्टिंग डाएट :- मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी मुलांच्या आहारात असे पोषक घटक जरूर समाविष्ट करा, जे मेंदूच्या वाढीस मदत करतील. यासाठी त्यांच्या आहारात अक्रोड यांसारखे ओमेगा-३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन बी, प्रोटीन आणि हिरव्या भाज्या यांचा समावेश करा. यामुळे मेंदूच्या पेशी ॲक्टिव्ह आणि मजबूत होतात. यासोबतच, मुलांना जंक फूडपासून दूर ठेवा आणि त्यांना आरोग्यदायी व पोषक घटक असणारे स्नॅक्स जास्त प्रमाणात खायला द्या.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं