Only trees can give true happiness to the mind .. How can it? | मनाला खरा आनंद फक्त झाडंच देऊ शकतात.. तो कसा?
मनाला खरा आनंद फक्त झाडंच देऊ शकतात.. तो कसा?

-डॉ. हरिश शेट्टी

आपलं शरीर म्हणजे विविध अवयवांनी, हाडामासांनी, आतड्या-पेशींनी बनलेला एक ऑकेस्ट्रा आहे. या ऑकेस्ट्रातून आनंदी सूर तेव्हाच मिळेल जेव्हा आपलं मन आनंदी असेल. आणि  हा आनंद फक्त निसर्ग देऊ शकतो; पण निसर्ग म्हणजे फक्त घराबाहेरचं जग नाही, तर हा निसर्ग घरातही निर्माण होऊ शकतो. किंबहुना या निसर्गाची आवश्यकता आपण घरात असतानाही असतेच. आपल्याला घरात राहताना श्वास घेण्यासाठी शुद्ध ताजी हवा हवी असते. डोळ्यांना सुंदर दृश्य बघावंसं वाटतं. मग त्याची सोय घरात झाडं लावून करता येते.

तुम्ही कधी आदिवासींच्या जगण्याचं बारकाईनं निरीक्षण केलं आहे का? नसेल तर एकदा कराच. आणि बघा ही लोकं किती आनंदी असतात. त्यांच्या छोट्याशा घरात खूप काही नसतं, पण चेह-यावर समाधान दिसतं. असं का? कारण ही लोकं झाडावेलींच्या सान्निध्यात जगतात. आपल्याभोवती चहूबाजूंनी झाडं हे सुख शहरात राहणा-याना नसलं तरी किमान ते सुख आपण आपल्या घरात निर्माण करू शकतो. झाडांच्या पानाचा स्पर्श, झाडांचा, फुलांचा रंग हा मनमुराद अनुभवू शकतो. हे रंग आणि स्पर्श माणसाच्या मनाला आनंदाची आणि समाधानाची अनुभूती देऊ शकतात. 


(प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ) 


Web Title: Only trees can give true happiness to the mind .. How can it?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.