'My life is not your porn' -after Goo Hara & suli's death why women are restless in Korea. | ‘माय लाईफ इज नॉट युअर पॉर्न’ असं कोरिअन मुली/महिला भयंकर संतापाने का सांगत आहेत?

‘माय लाईफ इज नॉट युअर पॉर्न’ असं कोरिअन मुली/महिला भयंकर संतापाने का सांगत आहेत?

ठळक मुद्देसायबर बुलिंग आणि शोषण हे पुरुषी व्यवस्थेचे नवे चेहरे आहेत.

शिल्पा दातार-जोशी


‘माय लाईफ इज नॉट युअर पॉर्न’
 दक्षिण कोरियातल्या गो हारा या पॉप गायिकेच्या आत्महत्त्येविरोधात निदर्शनं करायला हजारो मुली, महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. गो हाराला नक्की कशाची बळी म्हणावं? छुप्या कॅमर्‍याची की पुरु षप्रधान संस्कृतीची? सोशल मिडियाची की महिला कलाकरांच्या होणार्‍या शोषणाची?
एका महिन्यात सायबर बुलिंगमुळे दुसर्‍या पॉप संगीत आर्टिस्टला जीव गमवावा लागला. त्यातली दुसरी ही गो हारा . 28 वर्षाची. सलग दुसर्‍या पॉप आर्टिस्टने आत्महत्या  केल्यानं  जगाचं लक्ष दक्षिण कोरियाकडं वेधलं आहे. हारा या नावानंच ती लोकप्रिय होती. मात्र ‘गो हारा सेक्स व्हीडीओ’ अशा नावानं तिच्या वाटय़ाला मोठय़ा प्रमाणात सायबर बुलिंग आलं.  एका अर्थानं सोशल मीडीयावरच्या गुंडगीरीला  बळी ठरली. छुप्या कॅमेर्‍यानं  केलेलं अवैध चित्नण व लैंगिक छळ ही मोठी समस्या सध्या दक्षिण कोरियाला भेडसावते आहे. हाराच्या आत्महत्येमुळे तर दक्षिण कोरियाच नाही; तर जगभरात महिलांचं शोषण करणार्‍या सायबर गुन्ह्यांकडे लक्ष वेधलं आहे. छुप्या पद्धतीनं महिलांचं करण्यात येणारं अश्लील छायाचित्नण हा दक्षिण कोरियाला झालेला आजार आहे का, यावर प्रश्नचिन्ह उमटलंय. अशी छायाचित्नण व टिपण्यांद्वारे सोशल मिडियावर महिलांच्या वैयक्तिक आयुष्याची होणारी विटंबना पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.  
28 वर्षीय (के पॉप म्हणजेच ) कोरियन पॉप गायिका गो हारा हिनं रविवारी तिच्या सेऊलमधील राहत्या घरात आत्महत्त्या केली. त्यावेळी तिच्या आयुष्याची निराशाजनक अशी नोंद केलेली तिच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी पोलिसांना तिथं सापडली. तिच्या बॉयफ्रेंडनं छुप्या कॅमेर्‍यानं काढलेले तिचे अत्यंत खासगी व्हीडीओ सोशल मिडियावर शेअर केले. त्यामुळं तिनं त्याविरोधात न्याय मागितला होता. सोशल मिडियावर तिच्या चारित्र्याविषयी होणार्‍या  चर्वितचर्वणामुळे ती दुखावली गेली होती. ती या सायबर बुलिंगविरोधात जाहीरपणे बोललीही होती. मात्र त्यानंतर काहीच दिवसांत ती तिच्या घरात बेशुद्धावस्थेत सापडली. त्यावेळी वेळीच रु ग्णालयात दाखल केल्यामुळे ती बरी झाली; पण आयुष्यातील सततच्या नकारात्मक घटनांमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली. तिनं त्यावेळी इन्टाग्रामवर ‘गुड बाय’ असंसुद्धा लिहिलं होतं. पण परत हिंमत गोळा  ठामपणे उभं राहायचं असंही ठरवलं होतं. के पॉप स्टार सुलीची ती चांगली मैत्नीण होती. मात्र सायबर बुलिंगविरोधात नेहमी आवाज उठवणार्‍या सुलीनेही ऑक्टोबर महिन्यात आत्महत्या केली. तेव्हापासून एकाकी झालेलीहारा कोलमडून पडली.  

कोरियन पॉप (के पॉप) हे जगभरात प्रसिद्ध आहे; ते नेत्नदीपक सादरीकरणाबरोबरच त्यातील महिला कलाकारांवर लादलेल्या अतिरेकी शिस्तीमुळे, अमानवी निर्बंधांमुळेही! आता ते वासनाकांडासाठीही कुप्रसिद्ध झालंय. महिला कलाकारांनी आखून दिलेलं डाएट न करणं, दूरचित्नवाणीवरील कार्यक्र मात चेहरा हसरा न ठेवणे, इतकंच काय, तर स्त्नीवादी पुस्तकं वाचणं हे गुन्हे ठरवून अनेक बँड्सनी काही महिला कलाकारांवर बहिष्कार घातल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरियातल्या पुरु षप्रधान व्यवस्थेला या दोन्ही पॉप स्टार बळी पडल्या.  सुली आणि हारा या दोघीजणी मुलींच्या कारा या बँडशी जोडलेल्या होत्या. नंतर मात्न त्यांना तिथून बाहेर पडावं लागलं. त्या स्वतर्‍चा सोलो परफॉर्मन्स करायच्या, डिप्रेशनवर मात करण्याचा प्रयत्न करायच्या; पण ही लढाई व्यर्थ ठरली. 
दक्षिण कोरियन संसदेच्या सदस्या पार्क सुन सूक यांनी हा विषय प्रथम चव्हाट्यावर आणला. त्या म्हणतात, अशा द्वेषाने भरलेल्या वाईट टिपण्यांच्या विरोधात आपण आवाज उठवायला हवा. बरेचदा तरूण कलाकार याविरोधात आपला बचाव करू शकत नाहीत. कायदा आणि जागरुक समाजाने त्यांना संरक्षण देण्याची हीच वेळ आहे. 
शारीरिक हिंसा झाल्यानंतर आपण दवाखान्यात जाऊन बरे होऊ शकतो; पण मनावरच्या आघातांचं काय? मानिसक आणि भाविनक हिंसेचं काय? सायबर हिंसा हा एखाद्याला आयुष्यातून उठवणारा आजार आहे, असं सेऊलमधील मेट्रोपोलिटन पोलिस एजन्सीचे गुन्हा अन्वेषण विभागातले जिओन मिन सु म्हणतात. गेल्यावर्षी सायबर बुलिंगच्या दीड लाख केसेस समोर आल्या, तर गेल्या दोन वर्षांतील 11,200 केसेस या छुप्या कॅमेर्‍याने केलेल्या चित्रणाविरोधात आहेत. यावरूनच याप्रकाराची तीव्रता कळते. दक्षिण कोरियामध्ये सायबर बुलिंगच्या विरोधात ठोस कायदा करण्याची मागणी जोर धरते आहे. 
 

Web Title: 'My life is not your porn' -after Goo Hara & suli's death why women are restless in Korea.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.