Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > मनातला संताप-दु:ख जगजाहीर सांगतात आपले कपडे आणि डिझाइन्स, पाहा ट्रॉमा आऊटफिट म्हणजे काय..

मनातला संताप-दु:ख जगजाहीर सांगतात आपले कपडे आणि डिझाइन्स, पाहा ट्रॉमा आऊटफिट म्हणजे काय..

Trauma Outfit Trend : हल्लीच्या तरूणाईमध्ये हा ट्रेंड बराच बघायला मिळतोय. कारण आजच्या तरूणांची व्यक्त होण्याची पद्धत जरा वेगळी आहे. पण अजूनही बऱ्याच लोकांना या ट्रेंडबाबत हवीतशी माहिती नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:29 IST2026-01-19T14:28:46+5:302026-01-19T14:29:54+5:30

Trauma Outfit Trend : हल्लीच्या तरूणाईमध्ये हा ट्रेंड बराच बघायला मिळतोय. कारण आजच्या तरूणांची व्यक्त होण्याची पद्धत जरा वेगळी आहे. पण अजूनही बऱ्याच लोकांना या ट्रेंडबाबत हवीतशी माहिती नाही.

What is trauma outfit ? Dose this fashion trend reveal wounds in youngsters | मनातला संताप-दु:ख जगजाहीर सांगतात आपले कपडे आणि डिझाइन्स, पाहा ट्रॉमा आऊटफिट म्हणजे काय..

मनातला संताप-दु:ख जगजाहीर सांगतात आपले कपडे आणि डिझाइन्स, पाहा ट्रॉमा आऊटफिट म्हणजे काय..

Trauma Outfit Trend : आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा राग आला तर आपण चिडतो, ओरडतो, वस्तू फेकतो इत्यादी इत्यादी गोष्टी करतो. हे काय झालं तर भावना, म्हणजे आपण आपला राग या गोष्टींमधून व्यक्त केला. पण आता आपल्या मनातील राग, निराशा, एकटेपणा दर्शवण्यासाठी कळत म्हणा किंवा नकळत म्हणा कपड्यांची मदत घेतली जात आहे. ज्याला म्हणतात ट्रॉमा आऊटफिट. हल्लीच्या तरूणाईमध्ये हा ट्रेंड बराच बघायला मिळतोय. कारण आजच्या तरूणांची व्यक्त होण्याची पद्धत जरा वेगळी आहे. पण अजूनही बऱ्याच लोकांना या ट्रेंडबाबत हवीतशी माहिती नाही. त्यामुळे आज आपण हा ट्रेंड काय आहे हे समजून घेणार आहोत. 

ट्रॉमा आऊटफिट

ट्रॉमा आऊटफिट एक असा फॅशन ट्रेंड आहे, ज्यात व्यक्ती आपल्या मनातील वेदना, भावना, निराशा कपड्यांच्या रंगाच्या आणि डिझाइनच्या माध्यमातून व्यक्त करतात. अनेकदा हे मुद्दाम केलं जातं, तर काही लोकांना याची कल्पना देखील नसते की, त्यांची ड्रेसिंग स्टाइल इतकी बदलली आहे की त्यांच्या मानसिक स्थितीची अवस्था त्यांच्या कपड्यांवरूनच लावता येते. आताच्या तरूणांमध्ये हा ट्रेंड बराच बघायला मिळतोय. कारण ते त्यांचा तणाव, एकटेपणा आणि त्रास थेट बोलण्यातून नाही तर लुकच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. याच ट्रेंडला ट्रॉमा ड्रेसिंग असंही म्हणतात.

सायकॉलॉजिस्ट काय म्हणतात?

बऱ्याच सायकॉलॉजिस्टचं मत आहे की, मनुष्याचे कपडे त्यांच्या मनाची स्थिती दर्शवतात. जेव्हा व्यक्तीला आतून खचल्यासारखं वाटतं, तेव्हा ते चमकदार आणि बोल्ड कपड्यांना दूर ठेवतात. फिक्कट रंगाचे आणि साध्या डिझाइनच्या कपड्यांमध्ये त्यांना सुरक्षित असल्याचं जाणवतं. 

असंच असेलच असं नाही, पण...

मात्र, असं काही गरजेचं नाही की, कोणतेही घातलेले कपडे ट्रॉमाचे संकेत असतील. पण अनेकदा हे मनात सुरू असलेल्या घालमेलीकडे, गोंधळाकडे इशारा करतात. सोशल मीडियावरही हा ट्रेंड बराच चालला. इतकंच नाही तर बरेच तरूण-तरूणी एखाद्या टॉक्सिक रिलेशनमधून बाहेर पडण्यासाठी फंकी कलरचे कपडे घालतात, तर जे लोक फार इमोशनल ब्रेकअपमधून जात आहेत, ते फिक्कट किंवा डार्क रंगाचे कपडे वापरतात. पण कधी कधी ही बाब पूर्णपणे आपल्या आवडीवर अवलंबून असते. 

ड्रेसिंग स्टाइलपेक्षा संवाद महत्वाचा

जर एखादा तरूण किंवा तरूणी निराशा, चिडचिड किंवा एकटेपणा गुरफटलेला असेल तर त्यांचे कपडे आणि ड्रेसिंग स्टाइलवर खूप जास्त प्रभाव पडतो. मात्र, अशा स्थितीत संवाद, सपोर्ट आणि गरज पडली तर प्रोफेशनल मदत फार गरजेची पडते. कपडे आपल्या भावना नक्कीच दर्शवू शकतात, पण आतून हीलिंगसाठी संवाद फार गरजेचा असतो.

Web Title : कपड़ों से ज़ाहिर होता है मन का दुख: ट्रॉमा आउटफिट ट्रेंड को समझें।

Web Summary : ट्रॉमा आउटफिट: एक फैशन ट्रेंड जिसमें कपड़े क्रोध और अकेलेपन जैसी आंतरिक भावनाओं को दर्शाते हैं। मनोवैज्ञानिकों का कहना है कि कपड़ों की पसंद मानसिक स्थिति को दर्शाती है। संवाद ज़रूरी है।

Web Title : Clothes reveal inner turmoil: Understanding the Trauma Outfit trend.

Web Summary : Trauma Outfits: A fashion trend where clothes reflect inner feelings like anger and loneliness. Psychologists say clothing choices mirror mental state. Communication is key.