Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > ऑफिसमध्ये आपण 'क्वाएट फायरिंग'चे शिकार तर नाही ना? पाहा याचे संकेत आणि वेळीच व्हा सावध

ऑफिसमध्ये आपण 'क्वाएट फायरिंग'चे शिकार तर नाही ना? पाहा याचे संकेत आणि वेळीच व्हा सावध

Quiet Firing : आपल्यासोबत तर 'क्वाएट फायरिंग' होत नाहीये ना...हे जाणून घेणं अजिबात अवघड नाहीये. याची माहिती आपण काही संकेतांद्वारे मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:12 IST2026-04-07T12:12:12+5:302026-04-07T12:12:52+5:30

Quiet Firing : आपल्यासोबत तर 'क्वाएट फायरिंग' होत नाहीये ना...हे जाणून घेणं अजिबात अवघड नाहीये. याची माहिती आपण काही संकेतांद्वारे मिळवू शकता.

What is quiet firing in office and its signs | ऑफिसमध्ये आपण 'क्वाएट फायरिंग'चे शिकार तर नाही ना? पाहा याचे संकेत आणि वेळीच व्हा सावध

ऑफिसमध्ये आपण 'क्वाएट फायरिंग'चे शिकार तर नाही ना? पाहा याचे संकेत आणि वेळीच व्हा सावध

Quiet Firing : कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या लोकांना 'क्वाएट फायरिंग' हा शब्द कदाचित माहीत असेल. असंही होऊ शकतं की, बऱ्याच लोकांना हा शब्द माहिती नसेल. पण हल्ली ऑफिसेसमध्ये या शब्दाचा ट्रेंड अधिक बघायला मिळतोय. ऑफिसमध्ये कॉस्ट कटिंगचं नाव ऐकताच सगळेच कर्मचारी घाबरतात. त्यामुळे अनेक ठिकाणी हा ट्रेंड चालवला जातोय, असं म्हटलं जातं. कर्मचाऱ्यांना थेट नोकरीहून काढून टाकण्याऐवजी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. बऱ्याच लोकांनी याचा थांगपत्ताही लागत नाही. शेवटी वैतागून कर्मचारी स्वत:च नोकरी सोडतो. आपल्यासोबत तर 'क्वाएट फायरिंग' होत नाहीये ना...हे जाणून घेणं अजिबात अवघड नाहीये. याची माहिती आपण काही संकेतांद्वारे मिळवू शकता.

क्वाएट फायरिंग नेमकं काय?

क्वाएट फायरिंग काय आहे हे जर सोप्या शब्दात सांगायचं तर ही एक विचारपूर्वक केलेली रणनीति असते. ज्यात कुणाला थेट नोकरीहून न काढता अशी स्थिती तयार करायची की, कर्मचारी स्वत:चा नोकरी सोडेल.

क्वाएट फायरिंगचे संकेत

प्रमोशन किंवा पगार टाळणं

जर आपण क्वाएट फायरिंगचे टार्गेट असाल तर आपलं प्रमोशन केलं जाणार नाही किंवा आपला पगारही वाढवला जाणार नाही. जर आपण याबाबत काही जाब विचारला तर त्यावर काही उत्तरही दिलं जाणार नाही.

मीटिंग्समध्ये टाळणं
 
जर आपल्यासोबत क्वाएट फायरिंग होत असेल तर हळूहळू आपल्याला सगळ्याच गोष्टींपासून दूर केलं जाईल. मीटिंग्सपासून आपल्याला दूर केलं जाईल. या सगळ्या गोष्टी अचानक आपल्यासोबत घडतील.

बोलचाल अचानक बंद
 
जर ऑफिसमधील बॉस किंवा मॅनेजरने आपल्यासोबत बोलणं अचानक बंद केलं असेल, आधीसारखे मोकळेपणाने बोलत नसतील तर समजा की, आपण क्वाएट फायरिंगचे शिकार आहात.

ना कोणतं काम, ना तक्रार

जर आपल्याला आधीसारखं कोणतं काम सांगितलं जात नसेल किंवा आपण केलेल्या कामाची काही तक्रार नसेल किंवा काही बदल नसेल तर नक्कीच आपण क्वाएट फायरिंगचे शिकार होत आहात. असंही होऊ शकतं की, छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या ओरडाही खावा लागू शकतो.

Web Title : क्वाइट फ़ायरिंग: क्या आप चुपचाप नौकरी से निकाले जा रहे हैं, पहचानें संकेत

Web Summary : क्वाइट फ़ायरिंग कर्मचारियों को इस्तीफा देने के लिए मजबूर करने की एक रणनीति है। प्रमोशन रुकना, बैठकों से बहिष्कार, संवाद में कमी और प्रतिक्रिया का अभाव इसके संकेत हैं। सतर्क रहें और कार्रवाई करें।

Web Title : Quiet Firing: Signs you're being subtly pushed out of your job.

Web Summary : Quiet firing is a deliberate strategy to make employees quit. Signs include stalled promotions, exclusion from meetings, communication breakdown, and lack of feedback. Be aware and take action.