Join us  

फार स्ट्रेस आला तर तुम्ही काय करता? फक्त ३ उपाय, व्हा स्ट्रेस फ्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 7:28 PM

Get Relax: कोणत्यातरी गोष्टीचा खूप ताण stress आलाय? स्वत:वर आणि दुसऱ्यांवर उगाच चिडचिड वाढलीये? मग मनावरचा ताण हलका करण्यासाठी आणि थोडं रिलॅक्स होण्यासाठी हे घरगुती उपाय करून बघा... 

ठळक मुद्देताण कमी कसा करावा हा प्रश्न पडला असेल, तर हे साधे सोपे उपाय करा... मग बघा मन अगदी हलकं- फुलकं आणि फ्रेश होऊन जाईल.

कधी- कधी एखाद्या गोष्टीचा आपण इतका ताण घेतो की त्या नादात आपण काय करतो आहोत, हेच आपल्याला कळत नाही. ताण साध्या- सुध्या गोष्टींमुळे आलेला असो किंवा मग कुठल्या मोठ्या गोष्टीमुळे.... मनावर ताण येतो आणि तो आपल्याला डिस्टर्ब करतो, हेच खरं. मनावर आलेलं हे दडपण, ओझं वेळीच उतरवलं नाही, तर त्यातून अनेक शारीरिक समस्याही निर्माण होऊ शकतात. शिवाय आपण दडपणात असलो, तणावात असलो की उगाच दुसऱ्यांवर चिडचिडही करू लागतो. यामुळे मग नात्यात दुरावा येण्याचीही शक्यता असते. म्हणूनच मनावरचा ताण चटकन उतरवून टाकत जा. ताण कमी कसा करावा हा प्रश्न पडला असेल, तर हे साधे सोपे उपाय करा... मग बघा मन अगदी हलकं- फुलकं आणि फ्रेश होऊन जाईल.

 

असा घालवा मनावरचा ताण१. झरझर लिहून काढाकधीकधी आपल्या मनात असा काहीतरी विचार चालू असतो, जो आपण इतर कुणाशीच शेअर करू शकत नाही. बोलल्यामुळे मनावरचा ताण कमी होतो असं म्हणतात. पण काहीकाही गोष्टी अशा असतात, ज्या आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीलादेखील सांगू शकत नाही. अशावेळी मग सरळ एक डायरी आणि पेन घ्या. तुमच्या मनातला गोंधळ झरझर त्यावर लिहून काढा. त्यावर काय उपाय करता येईल, ते सगळंही लिहून ठेवा आणि हा कागद घरातलं दुसरं कुणीच वाचू शकणार नाही, अशा जागी ठेवून द्या. हवं तर मनातला गोंधळ कमी झाल्यावर हा कागद फाडून फेकून दिला तरी चालेल. करून बघा हा उपाय, कुणाशीच बोलता आलं नाही, तर कागद- पेन घेऊन मांडा मनातला गोंधळ आणि मोकळं करा तुमचं मन.

 

२. व्यायाम कराव्यायाम केल्याने फक्त शरीरच मोकळं होतं, असं नाही. व्यायाम केल्यामुळे तुमच्या मनालाही आराम मिळतो. व्यायाम केल्यामुळे शरीरासोबतच आपलं मन देखील फ्रेश होतं. सकारात्मक विचार मनात येतात आणि आपोआपच मनावरची मरगळ दूर होऊन ताणतणाव कमी व्हायला मदत होते. हॅप्पी हार्मोन्सचे शरीरातील प्रमाण वाढवायलाही व्यायाम उपयुक्त ठरतो. त्यामुळे तणावात असाल, तर जरूर व्यायाम करा. तुम्हाला जो व्यायाम आवडत असेल तो करा. हवं तर मोकळ्या हवेत फिरायला जा किंवा घरच्याघरीच एखादं म्युझिक लावून व्यायाम करा. लवकरच रिलॅक्स वाटू लागेल. 

 

३. छंदासाठी वेळ द्या खूप तणावात असताना एक गोष्ट आपण करू शकतो, ती म्हणजे आपले छंद जोपासण्याची. मान्य आहे की तणावात असताना काहीच करावंसं वाटत नाही. पण असं नाही. जी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडते, ती गोष्टी तुम्ही कितीही ताण असला तरी करू शकता. त्यामुळे गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं, गार्डनिंग करणं असं काहीही जे तुम्हाला आवडतं ते करा आणि रिलॅक्स व्हा.

 

४. छान स्वयंपाक करास्वयंपाक करणं हे काम नाही, तर मनावरचा ताण, थकवा घालविणारी ती एक सकारात्मक ॲक्टीव्हिटी आहे, असं काही अभ्यासकांनी सांगितलं आहे. रोज- रोज तोच स्वयंपाक करायचा असला की कंटाळा येतो. पण आपण जेव्हा एखादा आपल्याला येत नसलेला नवा पदार्थ करायला घेतो, तेव्हा नक्कीच आपल्याला नवा हुरूप आलेला असतो. हा अनुभव स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकीने कधी ना कधी घेतलेला आहे. त्यामुळे जर उदास, नाराज वाटत असेल, तर सरळ स्वयंपाक घरात जा आणि एखादा आजवर न बनविलेला किंवा तुम्हाला खूप आवडत असणारा पदार्थ बनवायला सुरूवात करा. बघा पदार्थ जसा तयार होत जाईल, तसं तुमचं मन हलकं आणि रिलॅक्स होऊ लागेल. 

 

टॅग्स :आरोग्यफिटनेस टिप्समानसिक आरोग्यव्यायाम