Lokmat Sakhi >Mental Health > सॉरी बाय मिस्टेक! सोशल मीडीयातला मनस्ताप छळतो तुम्हाला?

सॉरी बाय मिस्टेक! सोशल मीडीयातला मनस्ताप छळतो तुम्हाला?

आपण ग्रुपवर काय शेअर करतो यावरुन जर आपली मनशांती ढळणार असेल, ताप होणार असेल डोक्याला तर शेअरिंग काय कामाचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 05:29 PM2021-04-03T17:29:13+5:302021-04-03T17:35:00+5:30

आपण ग्रुपवर काय शेअर करतो यावरुन जर आपली मनशांती ढळणार असेल, ताप होणार असेल डोक्याला तर शेअरिंग काय कामाचं?

social media, wrong post, mental trouble & restlessness | सॉरी बाय मिस्टेक! सोशल मीडीयातला मनस्ताप छळतो तुम्हाला?

सॉरी बाय मिस्टेक! सोशल मीडीयातला मनस्ताप छळतो तुम्हाला?

Highlightsआपण जे विनोद ढकलून फॉरवर्ड करतो, त्याचा अर्थ नंतर काय काढला जाईल याचा फक्त तारतम्याने विचार करायला हवा.

-निशांत महाजन

आपण एखाद्या ग्रूपवर काहीतरी बोलतो, मग लोक आपल्याला घेरतात. पोस्ट करतो आणि त्याचे भलतेच अर्थ काढत अनेकजण आपल्याला टोल करतात. मनस्ताप होतो. पण या साऱ्याचा आपल्या जगण्यावर त्याचा काय परिणाम होतो? मनस्ताप होतो. काहीकाळ आपण सोशल मीडीयापासून लांब राहतो. बायकांना समाजमाध्यमात जास्त त्रास होतो, नाहीतर मग अकाऊण्ट बंद करुन बसावं लागतं. अमूक विषयावर नका बोलू असे सल्ले मिळतात.
मात्र आपल्या आरोग्यासह मानसिक स्वास्थ्यावर त्याचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास अमेरिकेतल्या सोशल मीडिया बिहेव्हिअर नाऊ नावाच्या एका उपक्रमानं केला आहे. त्यातून त्यांनी पाच धोके सुचवले आहेत.


1) अती शेअरिंगमुळे आलेलं रिकामपण
काहीजण खूप शेअर करतात. त्यांना बरं वाटतं. इतर लोकही त्यांच्या पोस्टवर बोलत असल्यानं त्यांचा एकटेपणाही कमी होतो. पण आतून एक प्रकारचं रिकामपण हळूहळू घर करू लागतं. अती शेअर करणारे नंतर नंतर एक्झॉस्ट व्हायला लागतात आणि औदासिन्य त्यांना गाठतं.


2) जवळच्या माणसांत दुरावा
विशेषत: इंटिमेट रिलेशनशिपमधे ताण येतो. तो कुणाशी काय आणि ती कुणाशी किती काय काय शेअर करतो यावरून संशयकल्लोळ सुरू होतो आणि प्रत्येक पोस्टचा स्वत:ला सोयीचा अर्थ काढायला लागण्याची सुरुवात होते. त्यातून मग दुरावा आणि भांडणं सुरू होतात. मला असं म्हणायचं नव्हतं हा जप सुरू होतो.


3) व्यावसायिक परिणाम
काही लोक आपल्या कंपनीविषयी, धोरणांविषयी किंवा स्वत:च्या कामाविषयी इतकी शेरेबाजी करतात की त्यामुळे ते कंपनीशी एकनिष्ठ नाहीत असा अंदाज बांधला जातो. दुस:या कंपनीतही त्यांना काही फार चांगली ऑफर मिळत नाही, कारण ही माणसं जरा जास्तच शहाणी आहेत असा एक निष्कर्ष काढून एचआरवाले मोकळे होतात.


4) इमेजचं काय?
बोलके पोपट अशी इमेज होते. त्यातच काही उद्धट तर काही शहाणे  वाटतात. काहींना काहीच काम नाही असा समज होतो. सतत चुकीच्या पोस्ट टाकून सॉरी म्हणणारे बावळट समजले जातात.

5) मनस्ताप-बदनामी अटळ
बाकी काहीच झालं नाही तरी सतत हुज्जत घालून, सतत भांडून, वाद घालून मनस्ताप तरी होतो नाहीतर काही लोक ठरवून आपली बदनामी तरी करतात. त्यामुळे आपली पोस्ट, त्याचा उद्देश राहतो बाजूलाच, नको तो मनस्तापच वाटय़ाला येतो.

हे सारं टाळायचं कसं?


सोशल मीडीया वापरुच नका हे काही या साऱ्यावर उत्तर नाही. तो आपण वापरणारच. पण त्यावर उपाय इतकाच की आपण काय कुठे शेअर करतो. काय फॉरवर्ड करतो. आपण जे विनोद ढकलून फॉरवर्ड करतो, त्याचा अर्थ नंतर काय काढला जाईल याचा फक्त तारतम्याने विचार करायला हवा.
नाहीतर सॉरी, राँग पोस्ट याला काही अर्थ उरणार नाही.

Web Title: social media, wrong post, mental trouble & restlessness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.