Lokmat Sakhi >Mental Health > लोकांनी मारले टोमणे-चिडवलं -नावं ठेवली; न खचता उभं राहण्याची हिंमत मात्र कमावलीच..

लोकांनी मारले टोमणे-चिडवलं -नावं ठेवली; न खचता उभं राहण्याची हिंमत मात्र कमावलीच..

Overcoming criticism: Mental strength: bullying: लोक काय कुणाला उंचीवरुन बोलतात, कुणाला रंगावरुन, कुणाला वजनावरुन, लोकांच्या नजरेतून स्वत:ला जोखणं बंद केलं की सापडते स्वत:ची सुंदर ओळख.

By कोमल दामुद्रे | Updated: August 7, 2025 11:09 IST2025-08-07T11:07:23+5:302025-08-07T11:09:35+5:30

Overcoming criticism: Mental strength: bullying: लोक काय कुणाला उंचीवरुन बोलतात, कुणाला रंगावरुन, कुणाला वजनावरुन, लोकांच्या नजरेतून स्वत:ला जोखणं बंद केलं की सापडते स्वत:ची सुंदर ओळख.

Mental Health bullying people How to stay strong when people criticize you Dealing with taunts and negativity with courage Mental strength | लोकांनी मारले टोमणे-चिडवलं -नावं ठेवली; न खचता उभं राहण्याची हिंमत मात्र कमावलीच..

लोकांनी मारले टोमणे-चिडवलं -नावं ठेवली; न खचता उभं राहण्याची हिंमत मात्र कमावलीच..

- कोमल दामुद्रे

'मम्मी को बोलो कॉम्प्लान पिलाए', बुटकी, ठेंगणी... अशा विविध नावांनी जन्मापासून चिडवलं जायचं. कधी रडून, गोंधळ घालून वेळ मारुन निघून जायची.(Mental Health) शाळेतही आपल्या उंचीवरुन सतत कुणीतरी हिणवत राहायचं. सकाळच्या दिवसाची सुरुवात रांगेतल्या प्रार्थनेने व्हायची पण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या उंचीमुळे आपल्याला पुढच्या रांगेत उभं राहावं लागयचं.(Bullying) शाळेतला बाक असो किंवा पीटीचा तास असो. उंचीमुळे नेहमीच मार खाल्ला, आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत एकाच बाकावर बसताही यायचं नाही. कायमच पुढचा बाक... हळूहळू या सगळ्या गोष्टींची मनाला सवय होऊ लागली.(Overcoming criticism) या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.(How to stay strong when people criticize) आपली उंची कमी असली म्हणून काय झालं? आपल्याला नेहमीच पहिल्या बाकावर बसायला मिळतं, पिटीच्या तासाला सगळ्यात आधी रांगेत आपल्याला उभं राहावं लागतं अर्थात शाळेतल्या सरांचं किंवा बाईचं लक्ष आपल्याकडेच राहतं. त्यामुळे आपला अभ्यासही होतो. 

मित्रांशी झालेलं भांडण ठरतंय जीवघेणं, असुरक्षितता आणि संतापाने उडतोय मैत्रीसह जगण्यावरचाच विश्वास

वय वाढतं गेलं पण उंची मात्र थोडी का होईना वाढली. शाळेतून कॉलेजमध्ये आणि मग त्यानंतर करिअरच्या मागे धावत सुटलो. ज्या क्षेत्रात जास्त रस होता तिथेही आड आली ती उंचीच. शाळेत असताना सेल्फ डिफेंन्सचा कोअर्स लावला होता परंतु स्पर्धेत भाग घेताना नेहमी उंची मार खायची. आपणही सैन्यात भरती व्हावं असा मनात निश्चय केला पण आपल्या उंचीवरुन पुन्हा पदरी अपयशच पडलं तर? मनात आलेला विचार तिथल्या तिथेच मोडून काढला. मग डोक्यात खूळ आलं ते हवाई सुंदरी होण्याचं पण तिथेही आपल्या उंचीवरुन, रंग-रुपावरुन डावललं गेलं. आपल्याच शरीरावरुन, उंचीवरुन मनात एक वेगळाच प्रकारचा न्यूनगंड तयार झाला. पुढे काय करावं काहीच सुचेना.

स्वत:ला ग्रुम करण्यासाठी आत्मपरीक्षण केलं. पण खरं सांगायचं झालं तर रंग, रुप आणि उंची यावरुन झालेली उपेक्षा ही शरीरावर नाही तर आत्म्यावर ओरखडा उमटवते. लहानपणापासून तू गोरी नाही, सावळी आहेस. किती बुटकी आहे. तुझं लग्न कसं होणार? तुला तुझ्या उंचीचा मुलगा मिळेल का? असे अनेक टोमणे ऐकायला मिळाले. हसण्यावारी नेलं पण आतून मन मात्र पोखरुन निघायचं. कधीकधी तर स्वत:ला आरशात बघणं ही आवडायचं नाही.


पण एकदा मनाने कौल दिला आणि बसल्या जागी स्वत:ला विचारलं.  "हे माझं शरीर आहे, मग दुसऱ्यांच्या मतांनी मी ते नाकारायचं का?" आजही ट्रेनच्या गर्दीत वर हात पोहोचत नसला तरी बघणाऱ्यांचे डोळे अक्षरश: घारीसारखे वाटू लागतात.  मग पुढची बाई नुसत बोंबलत राहते अगं वर पकड की धक्का नको मारु, मग पुन्हा मागे खेचल्यासारखं वाटतं.  पण स्वत:च्या डोळ्यांमधला विश्वास आणि आत्मपरीक्षण करत स्वत:ला नव्याने ओळखलं. हे सारं काही अपवाद नाही अनेकजण असतात ज्यांना आजही त्यांच्या रंग-रुपावरुन किंवा उंचीवरुन चिडवलं जातं असेल. टोमटे मारले जात असतील, कमी लेखलं जात असेल.. खरं सांगायचं तर त्यांना माफ करुन टाकायचं. स्वत:ला सांगायचं की जगात कोणताच माणूस परफेक्ट नसतो.

अमिताभ बच्चन यांनी अती उंच म्हणून, आवाज चांगला नाही म्हणून नकार पचवले. सुनील गावसकरांनी उंची कमी म्हणून वाईटसाईट ऐकले. ही दोन उत्तुंग उदाहरणं. बोलणारी हजार तोंडं आपलं व्यक्तिमत्व एका वाक्यात मोडीत काढू शकत नाही. आपण आपल्या जगण्याला नवी दिशा देत राहायचं. सांगायचं स्वत:ला मी सुंदर आहेच!
शरीराने तर सुंदर आहेच पण मनाने, विचाराने, आत्मविश्वासाने, जगण्यातल्या सकारात्मकतेने... आणि स्वत:च्या कर्तबगारीने!

 

Web Title: Mental Health bullying people How to stay strong when people criticize you Dealing with taunts and negativity with courage Mental strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.