Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नही नको नी मूलही नको! जगभर गाजते आहे महिलांची 4B movement, भारतीय सोशल मीडियातही पेटलेत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2026 18:42 IST

Marriage - Motherhood it is an option, it is not an obligation, we will not get married - 4B movement started in Korea because : नक्की काय कारण आहे महिलांच्या या टोकाच्या भूमिकेसाठी. मागणी फक्त एकच.

जगभरात विविध प्रकारच्या स्त्रिवादी चळवळी कायम होत आल्या आहेत. एका देशात सुरु होणारी ही गोष्ट जगभरात हळूहळू पसरु लागते. मग त्यावर टिका करणारे आणि त्याला सहमती दर्शवणारे दोन्ही मतांची लोकं या चर्चांमध्ये जोडले जातात. (Marriage - Motherhood it is an option, it is not an obligation, we will not get married - 4B movement started in Korea because...)अशीच एक चळचळ सध्या कोरियामध्ये सुरु आहे. 4B Movement ही महिलांनी स्वतःच्या आयुष्याबाबत ठाम निर्णय घेण्यासाठी सुरु केलेली चळवळ आहे. या चळवळीची सुरुवात दक्षिण कोरिया येथे झाली. तिथे महिलांना लग्न, नातेसंबंध आणि मातृत्व याबाबत मोठा सामाजिक दबाव सहन करावा लागत होता. त्याचबरोबर असमान वागणूक, सुरक्षिततेचा अभाव आणि करिअरमध्ये येणारे अडथळे यामुळे अनेक महिलांनी या व्यवस्थेलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली.

4B म्हणजे B ने सुरु होणाऱ्या चार गोष्टी नाकारणे. पहिली गोष्ट म्हणजे लग्न(Bihon) . अनेक महिलांना लग्नानंतर स्वत:ची ओळख गमवावी लागते, करिअर सोडावे लागते किंवा दुहेरी जबाबदारी स्वीकारावी लागते. त्यामुळे काही महिलांनी लग्नालाच नकार दिला. दुसरी गोष्ट म्हणजे डेटिंग किंवा प्रेमसंबंध (Bi-yeonae). भावनिक शोषण, असमान वागणूक आणि मानसिक ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे महिला सांगतात. तिसरी गोष्ट म्हणजे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ((Bi-seong gwan-gye). यातून महिलांना त्यांच्या शरीरावर आणि निर्णयांवर स्वतःचा हक्क अधोरेखित करायचा आहे. लग्न झाले असले तरी जबरदस्ती असे संबंध बनवण्याचा अधिकार पुरुषांना नाही असे त्यांचे मत आहे.  चौथी गोष्ट म्हणजे आई होणे ((Bi-chulsan). मातृत्व हा स्त्रीवर लादलेला नियम नसून तो तिचा वैयक्तिक पर्याय असावा, असा या चळवळीचा विचार आहे. मुलांना जन्म दिल्यावर फक्त बाईच त्यांची काळजी घेते इतर जर मदत करायला तयार आहेत तरच मुलांना जन्म देणे योग्य आहे असे या महिला म्हणतात. 

ही चळवळ पुरुषांविरोधात नाही, तर महिलांवर लादल्या जाणाऱ्या अन्यायकारक अपेक्षांविरोधात आहे. स्त्रीने लग्न केलेच पाहिजे, मुलं जन्माला घातलीच पाहिजेत, घर-संसार सांभाळलाच पाहिजे, असे समाजाचे ठरलेले नियम आहेत. 4B Movement हेच नियम प्रश्नांकित करते आहे. त्या भूमिकांच्या शेवटी लागणारे 'च' समाजातून काढण्यासाठी ही चळवळ सुरु केली आहे. असे आंदोलक सांगतात. 

या चळवळीमागे महिलांची महत्त्वाची भूमिका अशी आहे की, महिलांना स्वतःच्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. लग्न, नातेसंबंध आणि मातृत्व हे पर्याय असावेत, सक्ती नसावी. महिलांना सुरक्षित वातावरण, समान संधी, समान वेतन आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार हवा आहे. घरकाम आणि मुलांची जबाबदारी ही फक्त स्त्रीची नसून दोघांची असावी, अशीही अपेक्षा या चळवळीद्वारे मांडण्यात आली. काही लोकांना 4B Movement खूप टोकाची वाटते, तर काहींना ती अगदी योग्य वाटते. सध्या या आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : No marriage, no kids: 4B movement sparks debate globally.

Web Summary : The 4B movement, originating in South Korea, challenges societal pressures on women regarding marriage and motherhood. It advocates for women's autonomy in choosing their life paths, rejecting traditional expectations and demanding equal rights and respect. The movement sparks discussions worldwide.
टॅग्स :महिलासामाजिकसोशल व्हायरलदक्षिण कोरियासोशल मीडिया